"लांडगा आला रे आला !! शरद पवार साहेबांवर विश्वास बसेना.!
अकोले (प्रतिनिधी) :-
शरद पवार, हे नाव अगदी "दिल्लीपासून" तर आता "गल्लीपर्यंत" तोंडातोंडी येऊन पोहचले आहे. त्यांची "ओळख" करुन देताना "जाणता राजा" ते "धुरंधर राजकारणी" अशी अनेक "विशेषने" वापरुन त्यांचा "रुबाब" वर्णन केला जातो. याचा "महाराष्ट्रला" नक्कीच "अभिमान" आहे. परंतु, उभी हयात त्यांनी जे "फोडा-फोडी" पासून ते "जोडा-जाेडी" पर्यंतचे राजकारण केले. त्यामुळे, आज त्यांच्या पक्षातच सोडा कुटुंबातून "बंड" बाहेर पडला आहे. याची त्यांना "कानोकान खबर" नाही. एकीकडे "पुतण्याने" सरकार स्थापन करून देखील पवार साहेब हार मानायला तयार नाहीत. तर दुसरीकडे ते दुनियेला ओरडून सांगत आहेत. अजित पवारांचा निर्णय हा पक्षाचा नाही. तरी देखील जनता हे अंत:करणातून मानायला तयार नाही. की, ही खेळी पवार साहेबांची नाही. त्यामुळे, नकळत एक लहानपणाच्या गोष्टीची आठवण होते. एक मेंढपाळ लोकांना ओरडून सांगतो, लांडगा आला रे आला.! माझ्या मेंढ्या खाल्ल्या. लोक धावत पळत येतात, बघतात तर काय ! मेंढ्या शांतपणे चरत असतात. लोक रोष व्यक्त करुन नारज होऊन निघून जातात. हेच "कृत्य वारंवार" होते. पण, "दुर्दैव" असे. की, एकदा सायंकाळी खरोखर "लांडगा" येतो आणि "मेंढ्या" फस्त करुन जातो. हा "मेंढपाळ" बेंबीच्या देठापासून ओरडतो.
कालपर्यंत शरद पवार "चाल खेळून" राज्याच्या "राजकारणाची दिशा" ठरवत होते. आज, त्यांच्याच सारीपाठात एक वजिर असा निघाला. की, राजाशेजारी उभा राहुन त्याचाच घात केला. त्यामुळे, ही "अशक्यप्राय गोष्ट" शक्य झाल्याने प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत. जेव्हा राधाकृष्ण विखे यांच्या मुलाने बंड पुकारला. तर, राज्यभर त्यांच्या नावाचा डंका पिटताना राष्ट्रवादी कोठेच कमी पडली नाही. आता मात्र, "घरचा भेदी लंका दहन" असेच काहीसे झाले आहे. त्यामुळे, देशभर पवार कुटुंबाची "ठ्याठ्या" होताना दिसत आहे. अर्थात हे "घडलय" की "घडवलय" आणि या बंडखोरीमागचा खरा सुत्रधार साहेबच तर नाही ना ? हे दोन प्रश्न जनतेच्या मनात अगदी प्रकर्षाने वळवळत आहेत. जर, घडलं असेल. तर, पवार साहेबांनी आजवर जे केले. तेच त्यांच्या बोटाला धरुन राजकारणात आलेल्या दादांनी केले. म्हणजे याला म्हणतात पाऊलावर पाऊल टाकणे होय.! पण, यात साहेब ! हकनाक बदनाम होऊ लागले आहेत. कारण, निवडणुकीपुर्वी २३ बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी सोडली. त्याचा "सदमा" न बाळगता साहेब स्वत: ताकतीने मैदानात उतरले. भर पावसातील सभा आणि पुरोगामी विचार घेऊन ईडीच्या भांडवलावर त्यांनी ऊभारी घेतली. अखेर यश देखील आले. आज भाजपला शह देण्याची वेळ आली. तर, बारामती दिल्लीसमोर झुकली !! असेच मेसेज बाहेर पसरु लागले आहेत. ज्या विश्वासाने जनतेने पवार साहेबांना कौल दिला. तो विश्वास गहान पडताना दिसू लागला आहे. खरे पाहता.
या सगळ्या प्रक्रियेत शिवसेनेची सर्वात मोठी कोंडी झाली आहे. कालवर पवार साहेबांना वारंवार भेटायला जाणाऱ्या संजय राऊत यांचा "सामना" आता थेट भाजप-राष्ट्रवादीशी असणार आहे की काय ? असा प्रश्न पडतो. एक मात्र नक्की.! जर या तांत्रीक बाबीतून न्यायनिवाडा झाला नाही. तर, भाजप राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिल आणि तुर्तास साहेब सेफ राहतील, येणाऱ्या काळात सुप्रिया ताई केंद्रात मंत्री, साहेब राष्ट्रपती पदाच्या चर्चेत आणि सर्व गुन्हे माफ झाले. तर, ईडीने त्यांना येडं केलं आणि त्यांनी आपल्याला. असे झाले तर नवल वाटू देऊ नका. काही झालं तरी, साहेबांना समजून घ्यायला १०० जन्म घ्यावे लागेतील. हा धडा शिवसेनेने घेतला तरी पुरे.! बाकी काँग्रेसला ते नव्ह नाहीत. राहिला प्रश्न जनतेचा.! आपल्याला काय ! सरकार कोणाचेही येवो जावो.! जो निवडून आला. तो आपलाच.!
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ९५ हजार वाचक)
शरद पवार, हे नाव अगदी "दिल्लीपासून" तर आता "गल्लीपर्यंत" तोंडातोंडी येऊन पोहचले आहे. त्यांची "ओळख" करुन देताना "जाणता राजा" ते "धुरंधर राजकारणी" अशी अनेक "विशेषने" वापरुन त्यांचा "रुबाब" वर्णन केला जातो. याचा "महाराष्ट्रला" नक्कीच "अभिमान" आहे. परंतु, उभी हयात त्यांनी जे "फोडा-फोडी" पासून ते "जोडा-जाेडी" पर्यंतचे राजकारण केले. त्यामुळे, आज त्यांच्या पक्षातच सोडा कुटुंबातून "बंड" बाहेर पडला आहे. याची त्यांना "कानोकान खबर" नाही. एकीकडे "पुतण्याने" सरकार स्थापन करून देखील पवार साहेब हार मानायला तयार नाहीत. तर दुसरीकडे ते दुनियेला ओरडून सांगत आहेत. अजित पवारांचा निर्णय हा पक्षाचा नाही. तरी देखील जनता हे अंत:करणातून मानायला तयार नाही. की, ही खेळी पवार साहेबांची नाही. त्यामुळे, नकळत एक लहानपणाच्या गोष्टीची आठवण होते. एक मेंढपाळ लोकांना ओरडून सांगतो, लांडगा आला रे आला.! माझ्या मेंढ्या खाल्ल्या. लोक धावत पळत येतात, बघतात तर काय ! मेंढ्या शांतपणे चरत असतात. लोक रोष व्यक्त करुन नारज होऊन निघून जातात. हेच "कृत्य वारंवार" होते. पण, "दुर्दैव" असे. की, एकदा सायंकाळी खरोखर "लांडगा" येतो आणि "मेंढ्या" फस्त करुन जातो. हा "मेंढपाळ" बेंबीच्या देठापासून ओरडतो.
लांडगा आला रे..! आला ..! |
आरे..!! यारे या..!! लांडगा खरोखर आलाय रे..! मेंढ्या खातोय.! विश्वास ठेवा.! पण, त्याची जूनी खोड त्याला घातक ठरते. काहींना खरे वाटून देखील मनात कोठेतरी शंकेची सल वळवळ करत असते. शेवटी काय होते. हे प्रत्येकाला माहित आहे. आज अगदी तसेच झाले आहे की काय.! मला देखील शंका आहे. की, पवार साहेब आणि अजित पवार यांच्यात "तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे" करतो. असे "नौटंकीचे" प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्याला "प्रमाण" आहे, इतिहासाचे "दाखले" आहेत. म्हणून तर आमदार "बच्चु कडू" माध्यमांसमोर म्हणाले की, शरद पवारांवर मला "विश्वास" नाही. जोवर "शपथविधी" होत नाही. तोवर साहेबांचे काहीच सांगता येत नाही. त्यानंतर "रात्र उजडते" कोठे.! नाहीतर पहाटेच अजित पवार महाराष्ट्राचे "उपमुख्यमंत्री" झाल्याचे पहायला मिळाले. आता साहेब "जीव तोडून" सांगत आहेत. तो अजित पवारांचा "वैयक्तीक" निर्णय आहे. माझा यात काही एक "संबंध नाही". पण, साहेबांच्या निर्णयांची "पार्श्वभूमी" लक्षात घेता. सगळ्यांच्या कानाभोवती "शंकेचा किडा" गुनगून करतो आहे. आता येणारा काळच ठरवेल. खरं काय अन खोटं काय !! जनता मात्र, मीडिया आणि राजकारण्यांना पुरती वैतागली आहे. हे त्रिवार सत्य आहे.
एक डाव झपाटलेला..! चालबाज |
तेरी मेरी दुष्मनी, प्यार मी बदलगई. ! |
सकाळी-सकाळी जेव्हा जनता झोपेतून उठली. तेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवार यांना भाजपशी हात मिळवणी करताना पाहिले. तेव्हापासूनच सोशल मिडियावर राष्ट्रवादीसह पवार साहेबांविषयी नको नको तशा कमेंन्ट येऊ लागल्या होत्या. क्षणभर वाटलं, पाच वर्षानंतर राष्ट्रवादी औषधाला सापडते की नाही. देव जाणे. कारण, इतकी सगळी उठाठेव करून महाविकासआघाडीचा मंडप उभा केला आणि ऐनवेळी नवरी पळून गेली. तर, दुसरे काय होणार आहे.? त्यामुळे, जनतेच्या रोषातून साहेब प्रचंड ट्रोल झाले. परंतु, काही काळात पवार साहेबांनी ट्वीट केले. की, अजित पवारांनी घेतलेला तो निर्णय माझा नाही. त्यामुळे, संशयास्पद का होईना. पण, किमान जनतेला, शिवसेना व काँग्रेसला आधार तर मिळाला !! तेथून पुढे पवार साहेबांची विश्वासार्यता तिळतिळ वाढत गेली. नंतर त्यांनी गटनेता बदलापासून तर शिवसेनेसोबत पत्रकार परिषदा घेत कोर्टात अपिल केले. पण, खरं सांगायचं ठरलं. तर, राज्यात सत्ता स्थापन करताना दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहा, सोनिया गांधी यांना भेटणे. त्यांच्याशी गुप्तगू करणे आणि त्यानंतर राज्यात अजित पवार अचानक भाजपत जाणे. हे न समजण्याइतकी जनता "दुधखुळी" नाही. जर, दादा ते साहेब हे अंतर्गत कनेक्शन नसेल. पवार साहेबांची ही किती घुसमट म्हणावी लागेल. अर्थात साहेबांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी अशा अनेकांना पाठमोहरे करून ते पुढे आले होते. त्यामुळे, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे अनेकांना घाम फुटतो. म्हणून तर संजय राऊत म्हणतात. शरद पवार समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील. म्हणून तर जनतेची शंका त्यांच्यावर आजही कायम आहे.
तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो.! |
आता अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा पवार साहेबांसाठी अनभिज्ञ असला. तरी, तांत्रिक दृष्ट्या तो भाजपने अगदी फिट बसवून घेतला आहे. कालपर्यंत सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना आमदारांची ओळखपरेड घेऊ वाटत होती. आता, अचानक त्यांना आमदार नकोत, सह्यांचे पत्र चालते. इतकेेच काय ! एका रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठते आणि जनता झोपेत असतानाच लोकशाही देशातला मुख्यमंत्री लोकांना माहिती न देता शपथगृहण करतो. या सगळ्या हुकुमशाहीच्या प्रक्रिया वाटतात. तर, संविधानाचे कच्चे दुवे वापरुन म्हणा की संविधानाच्या अधिकाराचा पुरेपुर वापर करून म्हणा. पण, भाजप सारखी संवैधानिक चौकट अगदी कोणीच आखू शकत नाही. हे ३७० कलम रद्द व महाराष्ट्रात आज झालेली सत्ता स्थापना हे सिद्ध करुन जाते. स्पष्टच सांगायचे ठरले. तर, जर केंद्राने ठरविल्यास राज्यातील नियुक्त झालेले विद्यमान सरकार हे पाच वर्षे टिकवू शकतात. तेथे कोणताही न्याय व्यवस्था काही करु शकत नाही. ना पवार साहेब.
साहेब ..! कुठ चाललात ..! |
या लोकांना काय कळतय ! |
- सागर शिंदे
राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आमदारांचे पत्र घेऊन पाळ काढला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली कोठे नाहीतर पदापेक्षा गोड बातमी त्यांना मिळाली आहे. पवार यांना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आली आहे. अमरावती लाचलुचपत विभागाकडे या घोटाळ्याचा तपास सुरु होता. हे असे असले. तरी या फाईली तुर्तास बंद करण्यात आल्या असून वेळ पडल्यास त्या पुन्हा ओपन कराव्यात असे आदेशात म्हटले आहे.
=============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ९५ हजार वाचक)