"धर्मनिर्पेक्ष" सरकारचा "अधर्मी" शपथविधी.! हेच का पुरोगामीत्व ?


अकोले (प्रतिनिधी) :-
                    एका "जातीयवादी" भाजपला "सत्तेपासून दुर" ठेवायला दोन "पुरोगामी" विचारांचे पक्ष एकत्र आले. तेही "कट्टर हिंदुत्ववादी" पक्षासोबत. की जो  "मुख्यमंत्री पदासाठी" अगदी सर्वकाही विसरला आणि "मैत्री" सोडून चालता झाला. त्यामुळे, अगदी कालपर्यंत ज्या राऊतांना हा देश "धर्मनिर्पेक्ष" नको. ते नाव सुद्धा "संविधानात नको" असे वाटत होते. त्यांना आज अचानक देश, महाराष्ट्र "धर्मनिर्पेक्ष" झालाच पाहिजे, असे वाटू लागले आहे. का बदलली ही विचारधारा ? का कालचे "दरोडेखोर व शेणखाऊ" आजचे "शुद्ध शाकाहारी" वाटू लागले आहे.?  होय..! केवळ सत्तेच्या "लालसेपोटी". या सगळ्यांनी "एकात्मतेचे गाठोडे" बांधले खरे. पण, "वेश बदलला तरी बेस" बदलत नाही. हे "नैसर्गिक गणित" आहे. त्यामुळे कोणी कितीही "सेक्युल्यारिझमचा" आव आणला. तरी "जी कधीच "जात" नाही. ती म्हणजे "जात" होय".! याचा प्रत्येय, काल 'शपथविधीत' आला. त्यात प्रकर्षाने जाणून आले. की, निट "निरिक्षण" केले. तर, प्रत्येकाने आपापल्या जाती धर्माच्या विचारांचा "वरसा व वसा" मनात ठेऊन तो 'व्यक्तही' केला. काल एकूण सात "शपतविधी" घेण्यात आले. अक्षरश: "जात निहाय" महापुरुषांची नावे घेतली गेली आणि "अनावधानाने टाळली" देखील गेली. त्यामुळे, "सेक्युलरचा बुरखा" घालून जे "सरकार स्थिर" होऊ पाहत आहे. त्याची 'चर्चा' पहिल्याच दिवसापासून 'रंगू' लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, "येतो अभी झांकी हैं.! पिक्चर और भी बाकी हैं"! अशी "टिका" होऊ लागली आहे.
             
 उद्धव ठाकरे.! महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री. जे संसद ते विधीमंडळ अगदी कशाचेही सदस्य नाहीत. तरी त्यांना संविधानाने मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. जे ठाकरे संविधानाला मानायला तयार नव्हते.  जे ठाकरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्विकारायला तयार नव्हते. त्यांनी धर्मनिर्पेक्षतेची शपथ घेतली. पण, छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांना फुले, शाहु, आंबेडकर कोठेच आठवले नाही. एव्हाना स्टेजवर राजे वगळता एकाही महापुरुषांच्या प्रतिमेला स्थान देऊ वाटले नाही. "सर" असे तर "सेनापती" असणार तरी कसे ? त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांच्याकडून अपेक्षा करणे हेच चुकीचे होते. पण, पहायचा फक्त सेक्युलरपणा होता. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीने जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. पाटील साधाभोळा माणून आहे. पण, भुजबळ साहेबांनी माता जिजाऊ, सावित्रीबाईपासून तर फुले, शाहु, आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांपर्यंत नावे घेत चक्क स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्मरण केले.  या म्हणतात पुरोगामीत्व. ज्यांच्यामुळे जन्माचा अर्थ कळाला, ज्यांनी संधी दिली, ज्यांनी पाठीवर हात ठेवला. ज्यांनी बळ दिले. जे आदर्श आहेत अशी सर्व समावेशक शपथ घेऊन त्यांनी हिंदुत्ववाद आणि पुरोगामी विचार यांच्यातील फरक स्पष्ट करून दिला.
           
त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे बाळासाहेब थोरात वाच्चतेने भलेही विसरले असतील तरी त्यांच्या कृतीत नक्कीच पुरोगामी आणि डाव्या चळवळीचे विचार रुजलेले आहेत. अर्थात हे बाळकडू घरातूनच अंगभूत आहे. कारण, भाऊसाहेब थोरात यांनी गेली अनेक वर्षे कम्युनिष्ठ पक्षाची विचारधारा संगमनेरात पसरविली आहे. थोरात यांच्यानंतर
         सर्वात चर्चेचा विषय ठरलेला शपथविधी म्हणजे नितीन राऊत यांचा. कारण, शिवतिर्थावर हजारो झेंडे फडकले. त्यात भजवा आणि तिरंग्यात घड्याळ व पंजाचा डौल होता. मात्र, या सगळ्यात साधा एक देखील निळा झेंडा कोठे पहायला मिळाला नाही. असावा तरी का ? आणि आणणार तरी कोण ? प्रकाश आंबेडकरांची ही असली वंचित आघाडी आणि रामदास आठवले यांचा तो तसला रिपाई पक्ष. कवाडे गट कोठे होता हे सत्ता वाटपात कदाचित पुढे कोठेतरी काहीतरी मागणी करताना दिसेल. या सगळ्यात कोणीतरी बाबासाहेबांचा उल्लेख करील असे जनतेला वाटत असताना. अचानक कोण कुठले नितीन राऊत डॉ. बाबासाहेबांसह भगवान गौतम बुद्धांचे देखील नाव घेताना दिसून आले. मग काय !! सगळा समाज खडबडून जागा झाला. राऊत यांचा शपथविधी मागासवर्गीयांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला.

मंत्री नितीन राऊत

            जे छत्रपती शिवरायाचे स्वराज्य होते. ते गोरगरीब रयतेसाठी होेते. म्हणून गोरगरीबातून आलेला आमदार कधी शिवरायांचे नाव घ्यायला विसरत नाही. त्यानंतर फुले, शाहु, आंबेडकर, लहु, बिरसा, राघोजी यांची नावे घ्यायला विसरत नाही. कारण, जे इतिहास विसरतात ते कधीच इतिहास घडवू शकत नाही. बाप परंपरेने आलेले घराणेशाहीचे राजकारण वगळता.
              ज्यांनी चळवळी उभ्या केल्या ते लोकप्रतिनिधी म्हणून पुढे आले. ते खरे पुरोगामी विचार सारणीचे आमदार. बाकी ज्यांना सत्ता हवी आहे. पदे हवी आहेत. घराणेशाहीचा वारसा आणि भल्याभल्यांचे हात डोक्यावर आहे. त्यांना कसले आले पुरोगामीत्व आणि कसली डावी चळवळ. केवळ लवचिक राजकारण करून धर्मनिर्पेक्ष म्हणायचे आणि पोळ्या भाजून घ्यायच्या. हेच राजकारणाचे वास्तव आहे. नाहीतरी निष्ठ, विचारधारा, चळवळ, तत्व हे सगळं ढाब्यावर बसलेलं पाहिलय की आपण. गेली ३४ दिवस. त्यामुळे, कालचा शपथविधी हा केवळ नावाला धर्मनिर्पेक्ष होता. बाकी प्रत्येकजन आपापल्या तत्वांवर ठाम होते. हेच दिसून आले. आता फक्त एखादी दंगल होऊद्या. किंवा अस्मितेचा प्रश्न अथवा अराज वातावरण निर्माण होऊद्या. मग कळेल या महाराष्ट्राला. विचारधारेशी विसंगत युती आणि धर्मनिर्पेक्षता म्हणजे काय.! तोवर शांतता.....

- सागर शिंदे

=============



                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे

Rajratna.sagar@gmail.com

                  -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 110 दिवसात 220 लेखांचे  13 लाख 34 हजार वाचक)