संगमनेरचे "कार्यकर्ते" म्हणजे, "उताविळ" नवरा "गुढग्याला" बाशिंग..!!

बॅनरबाजी..!

संगमनेर (प्रतिनिधी) :- 
                        "उथळ" पाण्याला फार "खळखळाट" असतो. ही जूनी 'म्हण' आहे. पण, तिचा 'प्रत्येय' संगमनेरात "उताविळ कार्यकर्त्यांच्या कृतीतून" वारंवार दिसून येते. राज्यात जरा काही झालं..!! की त्याची खात्री करायची नाही. संयम ठेवायचा नाही, विचारपूस करायची नाही. "उचलायची जीभ आणि लावायची टाळूला" कोण म्हणे भाजपची सत्ता येणार नको तसे ढूंमके कुटले. पडले ना आता तोंडावर !! कोण म्हणे काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळनार.! झाला ना भ्रमनिराश.! कशाला हवा इतका "अट्टाहास" ? नेते वर काय खलबते करताय याची यांना जरा देखील कल्पना नाही. माध्यमांचा अतिरेख डोक्यावर घ्यायचा आणि काहीही घेऊन पळत सुटायचं. लगेच "बॅनरबाजी, आतिशबाजी आणि डिजेच्या तालावर ताल" धरायचा. यालाच तर म्हणतात, उताविळ नवरा गुढग्याला बाशिंग.!
                  दिड महिन्यापुर्वी मावळते मुख्यमंत्री महोदय म्हणाले.! आमच्या २३० ते ४० जागा येतील. तेव्हाच संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु झाला. हो..!! तुम्ही भविष्यकार नक्की आहात. पण काही दम अजब.? अखेर दि. २४ तारखेला निकाल लागला आणि असमाधानी आकडा समोर आला. कार्यकर्त्यांची तोंड वाकडी तिकडी झाली. ! पण, तरी समाधान मानत महायुतीची सत्ता स्थापन होतेय. या दिवास्वप्नामुळे हे अपयश धकून गेले. पण, त्यावर जल्लोष करणार नाही. ते संगमनेर कसले.? पेढ्यांचे खोके हातोहात फिरले. शिवसेना व भाजपची गळाभेट झाली. पण, इकडे प्रेम ऊतू जाऊन फायदा नाही ना ! वरिष्ठ पातळीवर महायुतीचे बारा वाजले आणि नकळत झोपलेल्या काँग्रेसला जाग आली. आते संगमनेरात राष्ट्रवादीची केंद्रात सत्ता असली काय, अन नसली काय.! हे कार्यकर्ते बिचारे पीडितच म्हणायचे. कारण, देशात समान सत्ता वाटपच्या नावाखाली अभद्र युती होईल. पण येथे राष्ट्रवादीला सत्तेत सहभाग नसतोच. त्यामुळे, म्हातारी मेली काय आणि सगळ्यांना सुतक पडलं काय ! येथे घड्याळ २४ तास आणि ३६५ दिवस न्युटरल पोझीशनमध्ये काम करते. त्यामुळे, नगरपालिकेचा उत्सव वगळता त्यांचे फटाके आणि आनंद संगमनेरसाठी अगदी दुर्मिळ झाला आहे. त्या  तुलनेत काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या उत्सवाची जुगलबंदी शहराच्या अंगवळणी पडलेली दिसून येते.
         राज्यात जेव्हा महायुतीला ग्रहण लागले. तेव्हा शहरात काँग्रेसने पोर्णिमा साजरी केली. थोरात साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, महसुल मंत्री, प्रदेशाध्यक्ष अशा सगळ्याच पदांवर विराजमान होऊ लागले. जणूकाय ते सोडून काँग्रेस शुन्य झाली की काय ? असा प्रश्न फक्त संगमनेरमध्ये आल्यानंतर वाटू लागला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बॅनर झळकू लागले. मिठाईच मिठाई चोहीकडे असे दिसू लागले. यावेळी संगमनेरची भाजपच काय ! देशातली भाजप अगदी शांत होती. मी पुन्हा येईन..! मी पुन्हा येईन..! या आभासापलिकडे कमळाच्या पाकळ्या एका बाणाच्या निशान्याने अस्तव्यस्त झाल्या होत्या. हजारो भेटली आणि शेकडो बैठका सुरु असताना थोरात साहेब काँग्रेसच्या परिघाचे केंद्रबिंदू ठरल्याने. ते वारंवार माध्यमांवर झळकत होते. त्यामुळे,  मीडियाचा एक अतिरेख व काँग्रेस प्रेमींचा दुसरा उताविळपणा. यामुळे काँग्रेस जणू बहुमतात आहे आणि बाकी त्यांचे मित्रपक्ष असा अविर्भाव नाचविला जात होता.
             
पण, नकळत रातोरात बाजू पडलटी. भाजपने अशी कुस बदलली की सगळ्यांच्या झोपा उडून दिल्या. पहाटे-पहाटे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली, सकाळी- सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी  मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देशाचे आणि राज्याचे सोडा. संगमनेरमध्ये १५ दिवसांपासून झळकणारे बॅनर भर दिवसा काढावे लागले. फटाके आणि गोडधोड खाऊन सत्तेच्या जीभल्या चाटणारे पुन्हा कोमात गेले. आता मात्र भाजप कार्यकर्त्यांना खडबडून जाग आली. मनात इतका आवेश साचला होता की तो अंगातून घाम निघाल्याशिवाय स्वस्थ बसणार नव्हता. त्यामुळे, संगमनेरच्या बस स्थानकासमोर डिजे लावून कार्यकर्ते बेभान होऊन नाचले. आता कशी झाली.? असे म्हणत टाळीवर टाळी पडत होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खापर फोडायला सुरुवात केली. काय तुमचे दादा..!! पण, ज्या काँग्रेसने नेहमीच राष्ट्रवादीला गृहीत धरले. ते कार्यकर्ते एकुण घेतील तर बीशाद काय ? पण, हा जल्लोष शमतो कोठे नाहीतर अवघ्या ८० तासात भाजपचे सरकार बहुमत सिद्ध करु शकले नाही. त्यामुळे, रातोरात शहरातील भाजपचे बॅनर उतरले गेले.
           
हा डाव राज्यपातळीवर इतका रंगला. की सगळी जनता हैरान झाली. तरी देखील संगमनेरकर थकले नाही. बाजू पलटली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुन्हा शहरात थोरात साहेब उपमुख्यमंत्री झाल्याचे बॅनर लावले. पण, दुर्दैव असे की त्यांनी काल मंत्री होण्याची शपथ घेतली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद नसून विधानसभा अध्यक्ष पद आहे. त्यामुळे, न राहुन ते बॅनर उतरविण्याची नामुष्की कार्यकर्त्यांवर आली. आता काल रात्री बस स्थानकाबाहेर लावलेला फ्लेक्स उतरविला असून मंत्रीपद कोणते हे निच्छित झाल्यानंतर बॅनर लावला तर ठिक नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या. हेच चित्र पहायला मिळेल. यात शंका नाही. सगळ्यात थोरात साहेबाचा रोल कोठेच नाही. पण, "कार्यकर्ता"  नावाचा प्राणी किती उतावीळ असतो. याचे ज्वलंत प्रदर्शन संगमनेरमध्ये पहायला मिळाले. हेच या लेखातून मांडले आहे.

- सुशांत पावसे
 - सागर शिंदे

=============

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ११५ दिवसात २१५ लेखांचे १३ लाख ४५ हजार वाचक)