होय.! मी बाळासाहेब थोरात उर्फ भाजपचा "शिरच्छेद" करणारा "बाजीप्रभू"..!
उर्फ बाळासाहेब थोरात.! |
नोव्हेंबर १६५९ साली "मुघल सल्तनत" स्वराज्यावर चालून आली होती. रयत सोडा, रयतेचा "राजाच" धोक्यात आला होता. पण, 'जीव गेला तरी बेहत्तर'.! कारण, "लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे". अशी निष्ठा त्यावेळी मावळ्यांची होती. म्हणून तर "तान्हाजी, बाजी आणि मुरारजी" धारातीर्थ पडले. पण, रयतेच्या पडत्या काळात "लालसेपोटी दगाबाजी" आणि "निष्ठेवर पाणी" सोडले नाही. हेच राजकारणात रुजू पाहित होते. भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीवर अशी चाल केली. की, दोन्ही पक्ष अगदी "नेस्तनाबुत" झाले. बडे-बडे नेते बीजेपीला "फितुर" झाले. अनेकांनी "वाड्यावर" बैठका घेतल्या आणि "आघाडीत-बिघाडी" घडवून आणली. अगदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सैन्याला 'पळता भुई थोडी' केली. पण, तरी दोन्ही पक्षातील "बाजीप्रभू" अगदी अखेरच्या क्षणापर्यंत पाय रोवून मैदानात उभे होते. ते म्हणजे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी "खिंड लढविली" आणि "जिंकलेही". फरक फक्त इतकाच १०५ सारखं मनुष्यबळ असताना देखील "धारातीर्थ" पडण्याची नामुष्की भाजपवर ओढविली. नाहीतर ३५ दिवस चाललेले "सत्तायुद्ध" पावनखिंडीपेक्षा कमी नव्हते. हे महाराष्ट्राने पाहिले आहे. काही जरी असले. तरी मंत्री महोदय थोरातांनी मी काँग्रेसचा "बाजीप्रभू" ही उपमा स्वत:ला लावून घेतली होती. ती अगदी "तंतोतंत खरी" ठरवून दाखविली आहे. हिच चर्चा राज्यात जोरदार सुरु आहे.
राजे ...................मावळे |
काँग्रेसचे देखील असेच काहीसे झाले. देशात पक्षाचे अस्तित्व सोडा. अध्यक्ष राहुल गांधी यांना सुद्धा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेसवर इतकी मोठी बला आली. की, राहुल गांधी यांनी नैतिकतेच्या आधारावर राजिनामा दिला. तेव्हा एक लढाऊ योद्धा म्हणून पहिले नाव बाळासाहेब थोरात यांचे पुढे आले. याच दरम्यान त्यांना गुजरातची मोहिम हाती दिली होती. तेव्हातर थोरातांनी चक्क मोदीजींची सुरतच लुटून आणली. त्यानंतर, महाराष्टात तीच वेळ आली तेव्हा त्यांनी मोठ्या धैर्याने ती जबाबदारी स्वत:वर घेतली. तुम्हाला आठवत असेल. "पुरंदरचा वेढा व तह" दिलेरखानाने मुरारबाजीस बादशाहला कौल देण्यास विनंती केली. बादशाह तुला धन,दौलत आणि सत्तेत चांगले स्थान देईल. "गृह"(वाडा) देईल. पण, कडाडला तो मुरारबाजी. शिवबांच्या राज्यात आम्हा काय कमी आहे.!! तुझ्या असल्या लालसेला मी भिक घालत नाही. अगदी तसेच बाळासाहेब थोरात यांच्याविषयी पहायला मिळाले. त्यांनी भाजपकडून मंत्रीपदाच्या आॅफर आल्याचे बोलले गेले. त्यांच्या आमदारांचा घोडेबाजार करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची लालुच दाखविण्यात आली. पण, हे सगळे मुरारजी निघाले. याचाही अभिमान श्रेष्ठींनी व्यक्त करुन दाखविला आहे. त्यामुळे, बाळासाहेबांनी सत्तेच्या लालसेपोटी निष्ठा गहान ठेवलेली आजवर दिसून आली नाही. त्यामुळे, बाजीप्रभू बरोबर ते मुरारजी देखील ठरले आहेत.
बाजी मारली प्रभू ..! |
खरोखर बाळासाहेब थोरात ७ वेळा आमदार झाले. गणपतराव देशमुख ११ वेळा आमदार झाले. पण यांनी कधी सत्तेसाठी, इडीच्या भितीने किंवा कलहाने कधीच पक्ष बदलला नाही. पक्षाच्या पडत्या काळात अगदी बाजीप्रभुसारखे लढत राहिले. त्यांचे सहकारी सुर्वे व जावळे झाले खरे.! त्यांची नावे सर्वश्रृत आहेत. पण, ज्या भाजपने आपल्या राज्याला लोकसभेत पराभूत केले. त्याचा बदला आ. थोरातांनी महाराष्ट्रात घेतला.
आता सबंध काँग्रेस बाजीप्रभू.! |
आता शिवसेनेसोबत युती झाली आहे. तरी आठवण येते की, संगमनेरच्या प्रचारात हेच उद्धव ठाकरे म्हणाले होते. थोरात आणि बाजीप्रभु यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. राजे गडावर पोहचले तेव्हा बाजीप्रभुनी प्राण सोडले होते. आता तुम्ही निवांत घरीच बसा. पण, ठाकरे साहेबांच्या म्हणण्यानुसार साहेब घरात बसले असते. तर, राज्यात शिव-सेनेचे काय झाले असते. हे न बोललेलं तेच बरं. आता फक्त एकच ख्वाईश आहे. उद्धव ठाकरेंनी यदाकदाचित संगमनेरला येण्याचे धाडस केलेच. (येथे येणारा मुख्यमंत्री परत कधीच तो त्या पदावर बसत नाही.) तर, त्यांना हा प्रश्न नक्की विचारला जाईल. की, आ. थोरात बाजीप्रभू आहेत का ? बेशक उत्तर हो असेल. तर, सत्तेसाठी खिंड लढवत आहे. असे म्हणणाऱ्या नामदारांना सत्तेपासून दुर ठेवत थोरातांनी बिनबोल तलवारबाजी केली आहे. त्यामुळे, साहेब. ! तुमची मोहिम फत्ते झाली आहे. तुम्ही भाजपचा शिरच्छेद करून खरोखर बाजीप्रभू ठरला आहात. अशीच चर्चा राज्यात जोरदार सुरु आहे.
- सागर शिंदे
=============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ११५ दिवसात २१५ लेखांचे १३ लाख ४५ हजार वाचक)