"सत्यजित" तांबेंचे "आदित्यवचन" राज्यात "आणिबाणी" घेऊन आले !!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
चांगला "गुरू" मिळाला तर "शिष्य" अनपेक्षित यश अपेक्षेपेक्षा जास्त हस्तगत करतो. तर, कधी काळी तो इकता "शार्प" होतो. की, "गुरूची विद्या, गुरुवरच" उलटली जाते. म्हणूनच म्हणतात "पेरलं तसच उगत असतं", अर्थात राजकारणात देखील असेच आयाम पहायला मिळत आहेत. जसे १९९९ ला भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेवले. त्याचीच पुनरावृत्ती म्हणून २०१९ ला भाजपला शिवसेनेने मुख्यमंत्रीपदापासून वंचित ठेऊ पाहिले आहे. त्यामुळे, कोणाची बाजू कधी आणि कशी पलटेल. याचा काहीच नियम नाही. अशीच एक "पडद्याआडची" बाजू पलटणविणारी घटना म्हणजे "सत्यजित तांबे" आणि आदित्य ठाकरे यांची "खुनवाखूनव" नकळत शिवसेनेला जागी करुन गेली आणि "अभी नाही, तो कभी नही" हाच अदित्य ठाकरे यांचा "बालहट्टाप्रमाणेचा" पाढा कुटुंबाने कायम ठेवला. तो एकच "संदेश" आणि "बालहट्ट" राज्यात आणिबाणी घेऊन आले की काय ? असा प्रश्न अभ्यासकांना पडला आहे.
पापा..! हात जोडतो पण...मुख्यमंत्री..! |
थोडा "महाभारताचा" दाखला घेतला. तर, लक्षात येते की, "पाच पांडवांना" एक "श्रीकृष्ण" मार्गदर्शक लाभला तर शुन्य साम्राज्याचे मालक "हस्तिनापुरचे" राजे झाले. तर, "शंभर कौरवांना" एक "शकुनिमामा" मार्गदर्शक झाला तर शंभरपैकी एकही जगला नाही. याचा मतितार्थ घेतला. तर, लक्षात येते. की, दिशादर्शक योग्य मिळाला तर साम्राज्य आणि चुकीचा मिळाला तर सर्वनाश..!! म्हणून केव्हर शिवसेनेने भाजपची गुलामी करायची ? केव्हर नाममात्र सत्तेत सहभाग घ्यायचा ? आज राज्याचा मुख्यमंत्री होण्याची वेळ आला आहे. तर, "बाळराजे" संधी सोडू नका. असेच स्पष्ट शब्दात "सत्यजित तांबे" यांनी अदित्य ठाकरे यांच्या कानाभोवती "चिवचिव" (ट्वीट) केली आणि ठाकरे यांना खडबडून जाग आली. अर्थात "सत्यजित" यांचे हा "सत्यवचन" असले. तर, त्याला "राजकीय पार्श्वभुमी" आहे. त्याचे काही अंशी फलित म्हटले तर भाजप आज सत्तेबाहेर फेकली जाऊ लागली आहे. तांबे यांना माहित असावे. या पृथ्वीतलावर तीनच हट्ट आहेत. ज्याला पर्याय नाही. एक म्हणजे "राजहट्ट" दुसरा "स्री-हट्ट" व तिसरा "बालहट्ट" या त्रिकालबाधी सत्याचा प्रत्येय नगर जिल्ह्याने यापुर्वीच अनुभविला आहे. जो सुरू झाला होता, डॉ. सुजय विखे यांच्यापासून तर येऊन थांबला पिचड कुटुंबापर्यंत. शेवटी दोन्ही बालहट्टापोटी इतिहास घडून गेला. अगदी त्याचाच आधार घेत. तांबे यांनी अदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याचे "दिवास्वप्न" दाखविले.
मोके बार बार नाही आते दोस्त..! |
प्रिय बाळराजे..! तुम्ही लहान आहात म्हणून जर तुम्हाला कोणी महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यास विरोध करत असेल. तर, अशा विचारांना आपण कलम करून टाकावे. "जेणे संधी आली तेणे सेवली पाहिजे". असेच काहीसे म्हणत. त्यांनी स्वत:च्या जीवणातील प्रासंगिक दाखला दिला. ते म्हणतात, २००७ साली मी २४ वर्षाचा होतो. त्यावेळी अ.नगर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यामुळे, मी जिल्हा परिषदेवर निवडून गेलो. काँग्रेस बहुमतात असल्याने अनेकांना मीच अध्यक्ष व्हावेसे वाटत होते. पण, वय कमी असल्याचे कारण सांगत पक्षातील काही जणांनी माझ्याकडून ही संधी हिसकावून घेतली. त्यावेळी सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले होते. पण, त्यानंतर ठरल्याप्रमाणे अध्यक्षांनी काही आपले पद सोडलेच नाही. अखेर अडीच वर्षांनी पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि काँग्रेसने मला उमेदवारी दिली. मात्र, विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला. त्यामुळे माझी अध्यक्षपदाची संधी हुकली. हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत शक्यतो येत नाही. संधीही पुन्हा-पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती.
कहानीमे ट्वीस्ट है..! |
भाजपच्या दिव्यात शिवसेनेचे तेल, आग मात्र कॉन्ग्रेसची |
एक अजून महत्वाची बाजू अशी की, पुरोगामी आणि डाव्या विचारांच्या काँग्रेसने शिवसेनेसोबत जाणे. हे आज गोड वाटत असले. तरी, दिर्घकाळाने त्याचे निगेटिव्ह परिणाम पहायला मिळू शकतात. कारण, राष्ट्रवादी व शिवसेना स्थानिक पक्ष आहे. तसे काँग्रेसचे नाही. १९८० साली राज्यात पुलोद होते आणि केंद्रात पुन्हा काँग्रेस आली. तर, जनतादलात फुट पडून राज्यातले सरकार बरखास्त करावे लागले होते. त्यामुळे, देशपातळीचा परिणाम राज्यावर कसा होतो. हे नव्याने सांगायला नका. तर, दुसरीकडे ज्या पिचड कुटुंबाने आजवर १९८० ते १९९९ पर्यंत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढविली. तरी मुस्लिम समाज त्यांच्या सोबत होता. तर, १९९९ ते २०१४ पर्यंत राष्ट्रवादीतून लढले तरी हा समाज त्यांच्या सोबत होता. पण, जसा त्यांनी भाजपत प्रवेश केला. तसे त्यांना मुस्लिम समाज्याने ८० टक्के नाकारले. परिणामी मोठ्या पराभवाला सामोरे लागले. स्पष्टच सांगायचे ठरले. तर, काँग्रेसची अल्पसंख्यांक, मागासवर्गिय आणि संस्थात्मक मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या धार्मिक व जातीय अस्मितेला धक्का लागला. तर, गांधी कुटुंबाचाही पराभव होतो. हे देशाने अनुभविले आहे. असे असताना राज्यात "महाशिवआघाडी" घडवून आणण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठी सकारात्मक नसली. तरी, गांधी कुटुंबाने देखील एक बालहट्ट पुरविला आहे की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
इथे संयम संपतो..! |
- सागर शिंदे
- सुशांत पावसे
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०० लेखांचे १२ लाख ४५ हजार वाचक)