ठाकरेंना "क्षुद्र" समजून "मुख्यमंत्री" होऊ न देण्याचा "संघवाद्यांचा" डाव..!! प्रा. सुषमा अंधारे
संघ की एक चाल, सेना बेहाल.! |
आजची "राजकीय परिस्थिवता" पाहता, "घटनात्मक महामहीम" राज्यपाल पदाचा आदर ठेवून मी हे लिहिलेच पाहिजे, असे मला "प्रकर्षाने" वाटू लागले आहे. कारण, जे दिसते ते मांडणे हिच "वास्तवाची कास" आहे आणि ती जर "संवैधानिक" मार्गाच्या "विरुद्ध" वाटत असेल. तर, कोणी नाही बोलले. तरी, माझ्यासारख्या व्यक्तीतील "प्रकटन" बाहेर पडले नाही. तर, ती एक "घुसमट" ठरेल आणि अन्याय देखील. म्हणून, अगदी "स्पष्टपणे" विस्तवावरील "निखारा" सारताना मी नमुद करते की, "मुख्यमंत्री" पद अन् "सत्तेचा हव्यास" असणाऱ्या भाजपाने केवळ "सत्तापिपासू" हट्टापोटी शिवसेनेशी असणारी वर्षानुवर्षाची "युती" तोडली आहे.
आपली चाल, यांना कशी कळली ! |
एकवेळ आम्ही "सत्तेपासून दूर" राहू पण "ब्राम्हणेतर मुख्यमंत्री" होऊ देणार नाही.. !! हा "सुप्त मनुवादी डाव" सर्वसामान्यत: लक्षात येणार नाही. पण, "खोलात जाऊन" विचार केल्यास कळेल की, "निवडणुकपूर्व" युतीला "स्पष्ट बहुमत" जनतेने दिले असताना देखील. निव्वळ "सत्तेच्या हव्यासापोटी" भाजप किती टोक गाठू शकते. हे महाराष्ट्राने आज पाहिले आहे. "सरकारचा" आणि ठराविक लोकांचा "उदोउदो" करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम "बहुजनांनी" आता डोळे उघडे करून हा धडा घेणे गरजेचे आहे. की, ब्राम्हणच मुख्यमंत्री झाला पाहिजे. यावर "संघी भाजप" किती "क्रूर" पद्धतीने "घटनात्मक पदांचाही गैर वापर" करू शकतात. याचे "दर्शन" आज पहायला मिळत आहे. "राज्यपालांच्या" या वागणुकीमुळे खऱ्या अर्थाने "संघी" भाजपचा "खरा चेहरा" आता "बहुजन" समाज्यापुढे आला आहे. त्यातून आता तरी जनतेला "सामाजिक शहानपण" येईल, अशी अपेक्षा आहे.
आपलं काय नाय बुवा.! वरुन सांगेल तसं.! |
"निवडणुका" झाल्या. त्यानंतर १५ दिवस भाजपचे "सत्तानाट्य" सुरु होते. अपने तो, "अपने होते है" ! या म्हणीप्रमाणे "महामहिम" महोदय "मौन" धारण करून "बघ्याच्या भुमिकेत" होते. भाजपने एक "पाऊल मागे" टाकले कोठे. नाहीतर, "राज्यपाल" अचानक "सक्रिय" झाले.! भाजप ला "बहुमत सिद्ध" करायला ७२ तास, आणि "शिवसेना" "राष्ट्रवादीला" अनुक्रमे २४ तास. वा रे राज्यापालाचे "सार्वभौमत्व"..!
ताईंच्या बोलण्यात तत्थ्य आहे. ! |
एवढा मोठा प्रेशर असतो वरून..! |
काय राव.! इतका मोठा जातीवाद.! |
- प्रा सुषमा अंधारे
{लेखिका संविधानाच्या
अभ्यासक आहेत}
(संपादकीय सुचना:- फोटो व कॅप्शन सोशल मीडियातून घेण्यात आले आहे.)
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०० लेखांचे १२ लाख ४५ हजार वाचक)
अभ्यासक आहेत}
(संपादकीय सुचना:- फोटो व कॅप्शन सोशल मीडियातून घेण्यात आले आहे.)
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०० लेखांचे १२ लाख ४५ हजार वाचक)