१९९९ ची "पुनरावृत्ती" आली रे आली" आता "भाजपची" बारी आली !! "भाजपचे" आमदार पुन्हा "राष्ट्रवादीत"..!"
साहेब..! मुख्यमंत्रीपद द्या..! |
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जुलै १९६६ साली शिवसेनेला खऱ्या अर्थाने जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्या मनात दोन गोष्टी प्रकर्षाने खदखदत होत्या. एक म्हणजे "आयोध्येत राममंदीर" व दुसरी म्हणजे या महाराष्ट्रात "शिवसेनेचा मुख्यमंत्री". या भगव्या वादळाचे दैव इतके बलोत्तर की, एका वर्षाच्या अंतराने नव्हे तर एकाच महिन्यात हा योग जूळून आला आहे. काल आयोध्येत राममंदीरावर निर्णय झाला आणि आज विधानसभेवर भगवा फडकविण्यावर शिक्कमुर्तब झाले. त्यामुळे, बाळासाहेब असतांना सन १९९९ साली भाजपने जे आडमुठेपणाचे धारण आवलंबविले होते. त्याची पुनरावृतीत दैवयोगाने शिवसेनेच्या गोटात येऊन पडली आहे. त्यामुळे, "वेळ आणि संयम फार मोठा बलवान असतो" हा धडा आपल्याला पुन्हा गिरवायला मिळाला आहे.
राजकीय परिघाचा मध्य, पवार..! |
सन १९९९ साली राजकीय वर्तुळाच्या परिघावर मोठ्या प्रमाणात खलबते निर्माण झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ७५, शिवसेनेला ६९, राष्ट्रवादीला ५८, तर भाजपला ५६ जागांवर यश मिळाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. तरी जनतेने त्यांना चांगला कौल दिला होता. कारण, जागा वाटपात काँग्रेस राष्ट्रवादीला समाधानकारक जागा देऊ शकली नाही. तर, दुसरीकडे शरद पवार यांचे राज्यात वाढते प्रस्त होते. त्यामुळे, अलिप्त लढूनही दोन्ही पक्ष बरोबरी करू शकले. तर दुसरीकडे शिवसेना-भाजप यांची युती झालेली होती. त्यावेळी शिवसेनेकडून नारायण राणे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते तर, भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. १९९९ मध्ये भाजपने शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धुडकावून लावला. कारण, संख्याबळ हे शिवसेनेकडे जास्त होते. त्यामुळे, नियमानुसार शिवसेना हाच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होता. त्यामुळे, शिवसेनेने बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सरकार स्थापन करु शकले नाही.ही नामी संधी साधत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणुकोत्तर आघाडी स्थापन केली. काँग्रेस राष्ट्रवादी यांचे एकत्रित संख्याबळ १३३ झाले होते. त्यांनी अपक्ष आमदारांना सोबत घेऊन आघाडीने सरकार स्थापन केलं आणि विलासराव देशमुख यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. जर तेव्हा भाजपने शिवसेनेला पाठींबा दिला असता. तर, राणे हे शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले असते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेची प्रचंड कोंडी केली. तो नकार इतका ताणून धरला. की, तोवर आखाडीने बहुमत सिद्ध देखील केले होते.
सेनापती..! ते उचापती ..!! |
महत्वाचे
या सगळ्यात अणखी एक पुनरावृत्ती सुरू झाली आहे. जे राष्ट्रवादी सोडून गेलेले २४ जबाबदार नेते आणि ७ आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे अजित दादा पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे, ज्या आजगराने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते गिळले. त्याला अपचन होऊन उमदळीवाटे सगळे बाहेर पडू लागले आहे की काय ? अशी टिका भाजपवर होऊ लागली आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात बहुतांशी आमदारांची घरवापसी होईल आणि संख्याबळ मुबलक झाले. की, राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुका लागतील. हेच त्रीवार सत्य वाटू लागले आहे.
- सागर शिंदे
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे १२ लाख १२ हजार वाचक)