...अखेर "शिवसेना", "राष्ट्रवादी" व "काँग्रेस" युतीवर "शिक्कामुर्तब"..! - संजय राऊत

आता हाताची घडी तोंडावर बोट..!

मुंबई (प्रतिनिधी) :-
                   "भाजपने" राज्यपालांना सांगितले की, आम्ही ७२ तासानंतरही सरकार स्थापन करण्यास "असमर्थ" आहोत. "शिवसेना" आमच्यासोबत यायला तयार नाही. त्यामुळे, त्यांना "बहुमत" सिद्ध करण्याची संधी द्यावी. आता शिवसेनेला बहुमतासाठी अवघ्या २४ तासांचा कालावधी देण्यात आला आहे. तेव्हा शिवसेनेच्या "संजय राऊत" यांनी "पत्रकार परिषदेत" सांगितले. की, आजवर  "राष्ट्रवादी व काँग्रेस" ओरडून सांगत होती. काही झाले तरी चालेल. परंतु, "भाजपचा मुख्यमंत्री" होता कामा नये. आता आम्ही "सरकार स्थापन" करण्यासाठी "एक पाऊल पुढे" टाकले आहे. त्यांनी "त्यांच्या मतांवर ठाम" रहायला हवे. 
           

साहेब..! हे शेवटपर्यंत राहतील ना ?

            आम्ही या "महाराष्ट्रला" एक "स्थिर सरकार" स्थापन करून दाखवू. असे म्हणत राऊत यांनी "शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस" अशी "युती" झाल्याचे जवळपास "निच्छित" केले. तसेच, शरद पवार, सोनिया गांधी यांच्याशी देखील "सलोख्याने चर्चा" झाल्याचे त्यांनी नमुद केले. या पलिकडे राऊत म्हणाले. की, राज्यात "राष्ट्रपती राजवट "लागू करून "केंद्राच्या पडद्याआडून" राज्य करायचे हे "षड़यंत्र" चालु आहे. ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे, भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर "टिका" करणे थांबवावे असे म्हणत भाजला "रामराम" ठोकल्याचे पत्रकार परिषदेत सिद्ध झाले.
           
  राज्यात जे "राजकीय अस्थैर्य" निर्माण झाले आहे. त्याचे "जनक" शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपण "धुरंधर राजकारणी" कसे आहोत. हे सिद्ध करून दाखविले आहे. शिवसेनेला स्वत:च्या  किंमतीची ओळख करून देत. केंद्रात "एक" मंत्रीपदासाठी "लाचार" होण्यापेक्षा राज्यात "किंग" होण्याचे "भाग्य" पदरात पाडून घ्यावे. त्यामुळे, केंद्रातील अरविंद सावंत देखील संध्याकाळपर्यंत माघारी येणार आहेत. राऊत म्हणाले, राष्ट्रवादी व काँग्रेसला घेऊन शेतकरी, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य यांसाठी महत्वाचे काम करणार आहे. आमचे स्थिर सरकार राहण्यासाठी जे कोणी सत्तेत असेल.  त्यांना देखील सत्तेत वाटा दिला जाईल.

पाय....गूण

         या दरम्यान, एका पत्रकाराने राऊत यांना प्रश्न केला. की हे सरकार तुम्ही स्थापन केले. तरी, २०२० पर्यंत टिकेल असे वाटते का ? त्यावर सहकारी पक्षांना सत्तेत वाटा हा उपाय आहे. तर, येणाऱ्या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. तरी केंद्राच्या आडून भाजप राज्य चालवेल. सर्वांना बाहेर ठेवेल. हेच त्यांचे षड़यंत्र आहे. त्यामुळे, आम्ही पाच वर्षे स्थिर सरकार चालवू असे ते म्हणाले.

-  सागर शिंदे 

==================

              "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे १२ लाख १२ हजार वाचक)