"सरकार" राष्ट्रवादीचे, "मुख्यमंत्री" शिवसेनेचा अन "मंत्री" काँग्रेसचे".!
मुंबई (प्रतिनिधी) :-
राज्यात "सत्ता स्थापनेचे वादळ" सुरु असताना "शिवसेना" हा "राष्ट्रवादी व काँग्रेस" यांच्या मदतीने "सत्ता स्थापन" करेल. असे, ९९ टक्के वाटत होते. तशा हलचाली देखील पहायला मिळत होत्या. पण, "धुरंधर राजकारणी" शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी साधी एकच चाल खेळली की काय आणि राज्यात शिवसेनेचा "फडकता भगवा स्थिर झाला". कारण, "राज्यपाल" भगतसिंह काश्येरी यांनी शिवसेनेला २४ तासांचा अवधी दिला होता. त्यात, आघाडीच्या आमदारांचे "संमतीपत्र" राज्यपालांकडे जमा झाले नाही. अर्थात यासाठी शिवसेनेने तीन दिवस मागितले. मात्र, राज्यपालांनी त्यास "नकार" देताच मोठी खळबळ उडून गेली. त्यामुळे, शिवसेना "बहुमत" सिद्ध करू शकली नाही. हा "शिवप्रेमींसाठी" मोठा "धक्का" होता. तर, पवार साहेबांसह काँग्रेस नेत्यांनी देखील हात वर केले. त्यामुळे, शिवसेनेची सर्वात मोठी "कोंडी" झाल्याचे पहायला मिळाले. आता राज्यापालांनी "राष्ट्रवादीला बहुमत" सिद्ध करण्यासाठी २४ तासांचा आवधी दिला आहे. त्यामुळे, "शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस" अशी "युती" होऊ शकली नाही. मात्र, आज "राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना" अशी "युती" होते की नाही. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ही युती वरिष्ठांच्या पत्थ्यावर.!! |
कोणीही मिठीत या ! फक्त मुख्यमंत्री द्या.! |
वास्तव पाहता, शिवसेनेसोबत जाण्यापुर्वी काँग्रेसच्या गोटात वाद उफाळून आला होता. ही असली अभद्र युती पुरोगामी विचारसारणीला रुजू शकली नाही. त्यामुळे, १९७८ साली भाजपला मदत करणारे सुशिलकुमार शिंदे देखील आज शिवसेनेसोबत जायचे नाही. असे म्हणू लागले. तर, दुसरीकडे मुस्लिम समाज्याचे नेते देखील श्रेष्ठींना नकारात्मक संदेश पाठवू लागले होते. यावर तोडगा काय ? तर शिवसेनेला पाठिंबा नाही म्हणजे नाही. तर, राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ. जर शिवसेनेचे सरकार स्थापन करून त्यात काँग्रेसचे आमदार मंत्री होणे हे थोडे दुष्मणाच्या घरात महिनाभर हतबल होऊन मुक्कमी राहिल्यासारखे वाटले असते. त्यापेक्षा अलिप्त बरे..! मग बाहेर तरी का बसायचे.? राष्ट्रवादीचे सरकार स्थापून शिवसेनेचा मुख्यमंत्री करून काँग्रेसकडे काही खाते दिले. तर, विघडलं काेठे ? म्हणून सरळ-सरळ न खाता उलटं-पालटं खायचं आणि "मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली" असेच काहीसे दाखवायचे. असेच "दिशाभूल" करणारे "राजकारण" सुरु आहे.
सरकार कसं स्थिर-अस्थिर करता येईल.! |
अचूक व अभ्यासपुर्ण विश्लेषण |
२४ तासाचे काऊंट-डाऊन.!
आता भाजपचे ७२ दिवस संपले, शिवसेनेचे २४ तासही संपले, आता राष्ट्रवादीच्या घड्याळाचेच २४ तासाचे "काऊंट-डाऊन" सुरु झाले आहे. त्यांची वेळ संपली. तर, या सर्वात राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. ते पुढे काँग्रेसला देखील कदाचित २४ तासांचा आवधी देतील. तसेही राजपालांवर माध्यमांकडून सडकून टिका होऊ लागली आहे. कारण, जसे भाजपने सांगितले. की, आम्ही संख्यबळ सिद्ध करू शकत नाही. त्यानंतर त्यांनी २४ तासावर धडाका धरला आहे. नियमानुसार घटनेच्या कलम १७२ अनुच्छेदानुसार राज्यपाल सरकार स्थापन करायला सकारात्मक असले पाहिजे. मात्र, राज्यपाल महोदय महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीकडे घेऊन चालले आहेत की काय ? असे वाटू लागले आहे. तसे नसते. तर, त्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने तीन दिवसाचा अवधी मागितला होता. तो देखील देऊ शकले नाही. इतकेच काय ! आता राष्ट्रवादीने रात्री ८:३० वाजेपर्यंत बहुमत सिद्ध केले नाही. तर, त्यांनी देखील आगाऊ वेळेची अपेक्षा ठेऊ नये. पुढे कोणी बहुमताचा आकडा सिद्ध करू शकले नाही. तरी, राजपाल विधानसभेला स्थगिती देऊ शकतात. बिन सनदी अधिकाऱ्यांच्या मार्फत शासन चालवू शकतात. कोणी सरकार स्थापन करण्याचा दावा करतात का.? याची वाट पाहु शकतात. त्यानंतर, राष्ट्रपतींना पत्र पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. या पलिकडे. जर, कोणी बहुमत सिद्ध करू शकले. तरी राज्यात सत्ता स्थापन होऊ शकते. अन्यथा राज्यात सहा महिने राष्ट्रपती राजवट लागू होते.पाहु आता कसे चालवतात सरकार.! |
ती प्रति सहा महिने त्यास संसदेच्या सभागृहाची परवानगी घेऊन अशी तीन वर्षे राष्ट्रपती राजवट कायम ठेवता येते. यापुर्वी महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० अशी ११३ दिवस. तर, २८ आँगस्ट २०१४ ते ३१ आॅक्टेंबर २०१४ अशी ३२ दिवस राष्ट्रपती राजवट लागू होती. आता जर कोणी बहुमत मांडले नाही. तर, किती काळ राष्ट्रपती राजवट राहिल. हे सांगता येत नाही. कारण, भाजपनेते प्रचंड नाराजीच्या भुमिकेत आहेत. त्यामुळे त्यांचे सुदैवै असे की, केंद्रात भाजपची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रपती काय निर्णय घेतील ते नव्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे, "धुरंधर बारामती" हा प्रश्न इतक्या दुरवर नेणार नाही. हेच वास्तव आहे.
- सागर शिंदे
==================
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९२ दिवसात १७७ लेखांचे १२ लाख १२ हजार वाचक)