"खासदार" गेला "कुण्या" गावा, "सैनिकांनो" शोध त्यांचा "लावा"..!! "मिस्टर इंडिया लोखंडे झाले ट्रोल..!!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
नगर दक्षीणचे खासदार उत्तरेत प्रचलित आहे. परंतु, उत्तरेला देखील खासदार आहेत. असे कोणी म्हणताच दोन कानाखाली खाल्ल्या तर वाईट वाटू देऊ नका. कारण, गेली पाच वर्षे "खासदार हरविला" आहे. अशा बातम्या माध्यमांना येऊन देखील तोच व्यक्ती पुन्हा खासदार म्हणून निवडून येतो आणि पुन्हा गायब होतो. हे शिवसैनिकांचे दुर्दैव नाही का ? असा प्रश्न जनतेला पडतो आहे. एकीकडे अकोल्यात वैभव पिचड यांनी खासदाराला ३१ हजारांची "पिछाडी" दिली. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तेथे गैर काहीच वाटत नाही. परतु, ज्या संगमनेरात बलाढ्या थोरातांच्या बालेकिल्ल्यातून शिवसैनिकांनी सात हजारांचे लिड दिले. तेथे खासदार डोकून पहात नसतील तर भगव्यात संताप सहाजिक आहे. खरंतर ना. विखेंच्या वरदहस्तेचे हे पार्सल जनतेला नको होते त्यामुळे, त्यांना मतदान केले कोणी आणि ते निवडून आले कसे. असे प्रश्न जनतेच्या मनात आजही घोळत आहे. लाट नाही, विकासांचा घाट नाही. तरी हा रिकामा थाट कोणाच्या आशिर्वादाने ? हेच कळायला तयार नाही. त्यावेळी अनेकांच्या शंका "इव्हीएम"वर बळावल्या. मात्र, त्या "अर्थशुन्य" ठरल्या. मागिल पाच वर्षात हे महोदय "कार्यक्षम" दिसले नाही. बाबांचे दर्शन सोपे इतके साहेबांचे दर्शन दुर्मिळ झाले होते. मात्र, अखेरच्या सहा महिन्यात त्यांनी भाषणांच्या जोरावर जनतेला भरमसाठ आश्वासने दिली आणि ते पुन्हा संसदेच्या रांगेत बसले. आज, विधानसभेचा "फड" गाजवायची वेळ आली. तर, त्यांचे "आवाज" बसले की काय ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. या सगळ्या प्रश्नांच्या गर्भात संगमनेरमध्ये लोकसभेत मिळालेले लिड हे शिवसैनिकांचे की थोरातांच्या अंतर्गत सलोख्याचे ? हा प्रश्न देखील जनतेला शंकेच्या "गुदगुल्या" करीत आहे. खा. लोखंडे यांचे "मौन" म्हणजे लोकसभेचे विधानसभेला "साटेलोटे" फेडायचे काम सुरू आहे की काय ? असा सवाल संगमनेरकरांच्या मनात घोळत आहे. त्यामुळे साहेब गेले कुण्या गावा, सैनिकांनो कोणी शोध त्यांचा लावा. अशी मिश्किन टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे.
खा. सदाशिव लोखंडे हे लोकसभेच्या निवडणुकी नंतर पुन्हा सिनेमा मधील "मिस्टर इंडिया" झाल्याचे दिसते आहे. ऐन निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान अदृश्य झाल्याने जनतेत ते चर्चेचा विषय ठरत आहे. लोकसभा निवडनुकीत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यानी संगमनेरात जाणता राजा मैदानावर सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केले. परंतु, जनतेने थोरतांच्या प्रतिष्ठेवर पाणी फेरले. संगमनेर मतदार संघाने खा. लोखंडेंना ७ हजार ६२५ मतांचे लीड दिले होते. परंतु, लोखंडेंना थोरतांच्या विरोधात कार्यकर्त्यांची मुहूर्तमेढ रोवता आली नाही हे स्पष्ठ दिसते. त्यांनी संगमनेरात उपकाराची फेड अपकाराने केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा संगमनेरात होताच खा. लोखंडे यांनी हजेरी लावली. त्यांच्या पाठोपाठ विद्यार्थ्याने हेडमास्तर समोर हजेरी लावल्याची टिका संगमनेरात झाली. तरी स्थानिक जनतेने नेहमीच त्यांना डोक्यावर घेतल्याचे पहायला मिळाले. परंतु, काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी कुठली ही व्युव्हरचना आखण्यासाठी लोखंडे सरसावल्याचे दिसत नाही. संगमनेरात थोरातांच्या पुढे सोडा. पण, त्यांनी पाऊले नेहमी मागे पडताना दिसली आहे. नगर जिल्ह्याची ओळख नेहमी "साखर सम्राट" व प्रस्थापित नेत्यांनची म्हणून राहिली आहे. परंतु, आता ते वातावरण मोडकळीस आल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात कोपरगाव, अकोले, राहता, श्रीगोंदा व नेवासा हे पाच मतदारसंघ शिवसेनाला सोडावे लागले.
संगमनेर नगरपालिकेचे उप-नगरअध्यक्ष जावेद भाई जहागीरदार, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे, संग्राम पतसंस्थेचे चेरमन डॉ. जी. पी.शेख, सहयाद्री बहुजन विद्या प्रसारकचे विश्वस्त रघुनाथ सतुजी शिंदे, आणि कालच माजी बाजार समितीचे उपभापती विठ्ठल गायकवाड यांनी विखे यांच्या उपस्थितीत बीजेपीत प्रवेश केला. ना. विखे यांनी संगमनेरमध्ये १० सभा घेऊन थोरतांवर सडकून टीका केली. परंतु, खा. लोखंडेची अजूनही संगमनेर प्रचार यंत्रणेत सहभागी होण्याची इच्छा तयार झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे, सैनिकांमध्ये आजही लोखंडे यांच्याबाबत नाराजी दिसते आहे. शिवसेनेच्या काही जबाबदार तोंडलपवू लोकांमुळे, संगमनेर विधानसभेत शिवसेना उमेदवारावर कितपत परिणाम होऊ शकतो. या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर दक्षीणचे खासदार उत्तरेत प्रचलित आहे. परंतु, उत्तरेला देखील खासदार आहेत. असे कोणी म्हणताच दोन कानाखाली खाल्ल्या तर वाईट वाटू देऊ नका. कारण, गेली पाच वर्षे "खासदार हरविला" आहे. अशा बातम्या माध्यमांना येऊन देखील तोच व्यक्ती पुन्हा खासदार म्हणून निवडून येतो आणि पुन्हा गायब होतो. हे शिवसैनिकांचे दुर्दैव नाही का ? असा प्रश्न जनतेला पडतो आहे. एकीकडे अकोल्यात वैभव पिचड यांनी खासदाराला ३१ हजारांची "पिछाडी" दिली. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तेथे गैर काहीच वाटत नाही. परतु, ज्या संगमनेरात बलाढ्या थोरातांच्या बालेकिल्ल्यातून शिवसैनिकांनी सात हजारांचे लिड दिले. तेथे खासदार डोकून पहात नसतील तर भगव्यात संताप सहाजिक आहे. खरंतर ना. विखेंच्या वरदहस्तेचे हे पार्सल जनतेला नको होते त्यामुळे, त्यांना मतदान केले कोणी आणि ते निवडून आले कसे. असे प्रश्न जनतेच्या मनात आजही घोळत आहे. लाट नाही, विकासांचा घाट नाही. तरी हा रिकामा थाट कोणाच्या आशिर्वादाने ? हेच कळायला तयार नाही. त्यावेळी अनेकांच्या शंका "इव्हीएम"वर बळावल्या. मात्र, त्या "अर्थशुन्य" ठरल्या. मागिल पाच वर्षात हे महोदय "कार्यक्षम" दिसले नाही. बाबांचे दर्शन सोपे इतके साहेबांचे दर्शन दुर्मिळ झाले होते. मात्र, अखेरच्या सहा महिन्यात त्यांनी भाषणांच्या जोरावर जनतेला भरमसाठ आश्वासने दिली आणि ते पुन्हा संसदेच्या रांगेत बसले. आज, विधानसभेचा "फड" गाजवायची वेळ आली. तर, त्यांचे "आवाज" बसले की काय ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. या सगळ्या प्रश्नांच्या गर्भात संगमनेरमध्ये लोकसभेत मिळालेले लिड हे शिवसैनिकांचे की थोरातांच्या अंतर्गत सलोख्याचे ? हा प्रश्न देखील जनतेला शंकेच्या "गुदगुल्या" करीत आहे. खा. लोखंडे यांचे "मौन" म्हणजे लोकसभेचे विधानसभेला "साटेलोटे" फेडायचे काम सुरू आहे की काय ? असा सवाल संगमनेरकरांच्या मनात घोळत आहे. त्यामुळे साहेब गेले कुण्या गावा, सैनिकांनो कोणी शोध त्यांचा लावा. अशी मिश्किन टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे.
शांततेत "क्रांती" |
नाव खराब केलं राव यांनी !! |
जिल्ह्यात शिवसेनेकडे राहिलेल्या मतदारसंघात तारेवरची कसरत दिसत आहे. संगमनेरात ३५ वर्षांची निर्विवाद सत्ता असलेले थोरातांना शह देण्यासाठी खा. लोखंडे यांना कार्यकर्त्यांनची मोट बांधण्यात अपयश आल्याचे दिसते आहे. मागील पाच वर्षात सेनेची ताकद उभी करून संगमनेर आखाड्यात थोरतांना चितपट करेल असा पहिलवान तयार करायला हवा होता. परंतु, खा, लोखंडेंकडे ते कौशल्या असल्याचे दिसून आले नाही. परंतु, एकीकडे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये स्थानिक थोरात विरोधी नेत्यांनचे अंतर्गत "शीतयुद्ध" मिटवत, सर्वांना एकत्र करून एकास-एक उमेदवारीचा लढा उभारला आहे. विखे पाटील यांनी नेहमी संगमनेर मधील भाषणांमध्ये वाळुमाफिया, ठेकेदार, एमआयडीसी, निळवंड्याचे पाणी, या मुख्य विषयांना हात घालून ही उमेदवारी प्रतिष्ठेची केली आहे. त्यांनी संगमनेरात काही "फासे" टाखले आणि थोरतांचे निकटवर्तीय त्यांच्या गळाला लागले.
घ्या संभाळू ऐवढी टर्म |
-- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८० दिवसात १६२ लेखांचे ९ लाख २० हजार वाचक)