"डॉक्टरांना "आमदार" झाल्यासारखं वाटतय !! ते गेले "हवेत" ! "निष्ठावंत" "नाराज", फोन झाला "सायलेंट".!
मला आमदार झाल्या सारखं वाटतयं !! |
जुने लोकं म्हणायचे, "चने आहे तर दात नाही अन् दात आहे तर चने नाही", असेच काहीसे वातावरण अकोल्याच्या राजकारणात दिसून येत आहे. डॉ. किरण लहामटे यांच्यामागे आता जनाधार आहे. तर आर्थिक बाजू व नियोजनाच्या आभवासह मनुष्यबळ कमी पडताना दिसत आहे. मात्र, याच ठिकाणी अशोक भांगरे असते. तर, त्यांनी आतापर्यंत साम, दाम, दंड, भेद सर्वांचा वापर करून प्रस्तापितांच्या पायाखालची वाळू सरकविली असती. मात्र, त्यांना इतका मोठा जनाधार लाभला नाही. त्यामुळे खरोखर चने आहे तर दात नाही. दात आहे तर चने नाही. ही म्हण येथे लागू होते. आता ही "कागाळी" इथेच थांबत नाही. तर, राष्ट्रवादीचे "निष्ठावंत" नाराज झाल्याचे दिसत असून त्यांनी नियोजनातून काढता पाय घेतल्याचे दिसत आहे. तरी त्यांची विचारपूस करताना डॉक्टर दिसत नाहीत. या पलिकडे जाऊन सामान्य कार्यकर्ता सांगतो आहे. साहेबांचा फोन वाजतो. मात्र, उत्तर दिले जात नाही. त्यामुळे डॉक्टर हवेत गेले की काय ? असा प्रश्न जनतेतून पुढे येऊ लागला आहे.
काल-परवा आदरणीय शरद पवार साहेबांची सभा झाली. आठवते का तुम्हाला ? कोणा कोणाची भाषणे झाली ? दत्ता नवलेंपासून तर डॉ. अजित नवलेंपर्यंत. यात कोठे तुम्हाला अशोक भांगरे नावाचे व्यक्तीमत्व संबोधीत करताना दिसले का ? नाही ना ? मग हे तर असेच झाले की, जंगलात वाघाने शिकार करणे सोडून दिल्यासारखे. कारण, १९८० पासून ते २०१९ पर्यंत हा वाघ पिचडांच्या विरोधात "गगनचुंबी गर्जना" देताना या सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या अकोल्याने पाहिला आहे. आणि काल अचानक त्यांना अमित रावांना जास्त वेळ वाढून दिला. ते ही शरद पवार साहेबांच्या व्यासपिठावर !!. आता, हा छावा उद्याचा शिकारी असेल यात शंका नाही. पण, भांगरे साहेबांनी १३ ते १४ हजार लोकांसमोर आपली भूमिका मांडू नये. !! हा राजकीय विश्लेषकांच्या बुद्धाला प्रश्न निर्माण करून देणारा क्षण आहे. यामागे नेमके काय "गौडबंगाल" असावे. ? अर्थात डॉ. लहामटे कमी पडतात. हे सगळ्याच भागातून चर्चा आहे. त्यामुळे ती राजकीय नेत्यांच्या तोंडातून बाहेर येणार नाही. असे नाही. पण, ती सल घेऊन भांगरे साहेब अस्थिर असल्याचे अनेकांना वाटते. जर, डॉ. लहामटे यांच्याकडे आर्थिक व मनुष्यबळ नव्हते. तर, निवडणुकीत दंड थोपटण्याचा काही एक गरज नव्हती. सक्षम उमेदवार देता आला असता. असे भांगरे समर्थकांच्या गोटात चर्चा आहे. आता समोरच्या धनशक्तीला थोडीफार तरी साथ धनशक्तीचीच आवश्यक होती. कारण, काही निष्ठावंत पेट्रोल व जेवणाला महाग झाल्याचे वास्तव चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे, खरोखर अजून आठ दिवस हे कार्यकर्ते टिकतील का ? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे.
हा प्रश्न इथेच थांबत नाही. तर, डॉक्टरांना कार्यकर्ते फोन करतात. "एक ना दोन" वारंवार प्रयत्न करतात. मात्र, त्यांचा फोन मनसोक्त वाजतो. पण, उत्तर मिळत नाही. साहेबांचा पुन्हा रिप्लाय येत नाही. त्यामुळे, साहेब आत्ताच हवेत गेल्याची टिका होऊ लागली आहे. त्यांना निवडून येण्यापुर्वीच "आमदार झाल्यासाठी वाटू लागले" आहे. मात्र, जनतेने तुमच्याकडे पर्याय म्हणून पाहिले आहे. आणि तुमचे फोन जनतेसाठी खुले रहात नसतील. तर, अजून वेळ गेलेली नाही. लोकं वंचितला मत करतील नाहीतर पुन्हा वैभव पिचड यांना संधी देतील. त्यामुळे, "देर हैं, तो दुरुस्ती होनी चाहिऐं" !! असे जाणकारांचे मत आहे.अणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे. लहामटे यांच्या नात्यातील एक व्यक्ती समशेरपूर भागात जनतेवर खेसाळली. त्यामुळे त्याचे विपरित परिणाम झाले. इतकाच काय !! डॉ. लहामटे साहेब माध्यमाशी आरेरावीच्या भाषेत बोलून जातात. पत्रकारांवर ताव काढतात असे बोलले जात आहे. त्यामुळे ज्या लोकशाहीला तुम्ही उभे करू पाहता तीच्या चौथ्या स्तभाला दाबने. हे कितपत योग्य आहे. असा प्रश्न जनतेने केला आहे.
थांबा !! विचार करा !! |
तसेही भाजपने मीडियाची मुस्कटदाबी करू पाहिली आहे. त्यामुळे डॉ. लहामटे यांचा पक्ष बदलला. तरी पुर्वाश्रमीचे ते आरएसएस प्रणित भाजपचे कट्टर समर्थक होते. हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे, भाजपचा नियोजनाचा गुण त्यांना लागल्याचे दिसत नाही. काही झाले तरी त्यांनी स्वभावात बदल करणे अपेक्षीत आहे. आमदार झाल्यासारखे वाटणे आणि वास्तवात ते नसणे. यात खूप मोठा फरक आहे. हे त्यांना कोणीतरी सांगणे गरजेचे आहे. असे जनतेला वाटते आहे.