...तर "बाळासाहेब" थोरात साहेबांचा "पराभव" अटळ.!!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
भाजपने गेली दोन टर्म "राष्ट्रीय अस्मिता" जनतेच्या डोळ्यासमोर ठेऊन लोकसभेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. त्यामुळे विकास आणि निष्ठा हे राजकारणाचा अंग राहिले नाहीत की काय ? असा प्रश्न सुजान नागरिकाला पडू लागला आहे. राज ठाकरे म्हणतात, निवडणूक आली की, कोठेतरी धमाका होणार, हल्ला होणार किंवा लोकांच्या भावनिक मुद्यावर निर्णय घेतला जाणार. याचेच भांडवल करून भाजप निवडणुका जिकत असल्याचे आरोप होऊ लागले आहे. पुलवामा, बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक, पायलट अभिनंदनची वापसी राफेल आणि जम्मू कश्मिरचा ३७० कलम रद्द यांच्या जोरावर राष्ट्रीय अस्मिता उभी करून जनतेच्या मनात देशप्रेम उभे करण्यात भाजप यशस्वी झाली.
आता इतिहासाची पाने चाळली. तर, एक गोष्ट लक्षात येईल. की, बाळासाहेब थोरात यांचा पराभूत करणे सोपे नाही. परंतु, तितकेच अवघडही नाही. कारण, १९९० साली राम जन्मभूमीच्या वादाचे पडसाद देशात उमटले होते. विश्व हिंदू परिषदेने "शिला" पूजन करून हिंदुत्वाचे वातावरण निर्माण करुन जनमानसांच्या ह्रदयावर "जय श्री राम चा नारा" कोरला होता. त्यामुळे शहरच नाही. तर, ग्रामीण भागही भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. हीच लाट संगमनेर तालुक्यात पहायला मिळाली आणि त्याचे भांडवल करत भाजपाने वारकरी सांप्रदायातील "जय हारी" वसंतराव गुंजाळ यांच्या गळ्यात माळ टाकून संघ परिवारात स्वागत केले. राम मंदीराच्या शिला पुजनात वसंतरावांनी मोठे योगदान दिले. या "धार्मिक परिघावर हिंदुत्ववाद" असेलही. पण, याचा केंद्रबिंदू राजकीय हेतू हाच होता. असे अभ्यासकांचे मत आहे. त्याला अनुसरून भाजपाने १९९० च्या विधानसभा निवडणुकीत थोरांतापुढे गुंजाळ यांचे आव्हान दिले. तेव्हा अवघ्या ४ हजार ८६२ मतांनी वसंतरावाचा पराभव झाला. त्यामुळे अपराजित साहेब पराजित होऊच शकत नाही. असे कोणाला वाटत असेल तर तो "दुधखुळेपणा" ठरेल. असे जाणकारांना वाटते. आता त्याच वसंतराव गुंजाळ यांनी निवडणुकीची काही सुत्रे हाती घेतली आहेत.
आता हा सगळा इतिहास सांगण्याचे कारण की, जी राजकीय परिस्थिती १९९० ला झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता २०१९ मध्ये पहायला मिळेल की काय ? असे वाटू लागले आहे. तेव्हाही लढत एकास एक होती, आताही आहे. तेव्हा थोरातांच्या विरोधात प्रचंड नकारात्मक वातावरण तयार झाले होते. तशी आताही सुप्त लाट असल्याचे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपुर्वी तालुक्यात चांगले वातावरण फिरले होते. ना. विखे साहेबांनी संगमनेरात स्थानिक स्वराज्य संस्थांना पळता भुई थोडी केली होती. परंतु सगळे फटाके "फूस" गेले. ना थोरातांच्या विरोधात विखेच्या घरातील विरोधक उभे राहिले. ना विखेच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्याचा चंग थोरात साहेबांनी बांधला. त्यावेळी फक्त "तू मारल्यासारखे कर, अन् मी रडल्यासारखे करेल" अशी नौटंकी करण्यात आली आणि "निश्तेज" कार्यकर्त्यांच्या अंगात हावा भरून विखे साहेब पिन मारुन निघून गेले. अर्थात राजकारणात जो-तो आपापला मतदारसंघ सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करु पाहतो. मरण, हे फक्त कार्यकर्त्याचे होते. हेच वास्तव आहे. पण, हे जनता डोळसपणे स्विकारत नाही. जर, विखे साहेबांनी कसोशीने प्रयत्न केला आणि संगमनेर तालुक्यातील राष्ट्रीय अस्मिता जागी झाली. तर, येथे "परिवर्तन" होऊ शकते. असे जाणकारांना वाटते आहे.
संगमनेर तालुक्यात थोरतांच्या विरुद्ध सुप्त लाटेची भावना महायुतीच्या उमेदवारांसाठी फायद्याची असली तरी. एवढ्यावरच विजयी होणे तसेच सोपे नाही. त्यामुळे, राम मंदिराचा निकाल लागला. तर, संदिग्ध मतदान महायुतीकडे वळू शकते. तालुक्यात भाजप सेनेला मानणारा वर्ग मोठा आहे. मागील निवडणूकीची आकडेवारी पाहता भाजपा सेनेच्या उमेदवाराला थोरातांच्या जवळपास मताधिक्य मिळाले होते. आता तर तरुण मतदारांची संख्या वाढली आहे. हा तरुण मतदार काँग्रेसच्या पाठीमागे जाण्यास तयार नाही. पुलवामा घटनेनंतर ज्या पद्धतीने मोदींनी या निर्णयाचा लाभ लोकसभा निवडणुकीत उठवला. तर, जम्मु-कश्मिर मधील ३७० कलम रद्द करून देशाच्या नागरिकांमध्ये वेगळे वातावरण निर्माण केले. त्यामुळे देशाची प्रतिमा उंचवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस. यांनी राज्यात स्वतः ची निर्माण केलेली प्रतिमा ग्रामीण भागात महायुतीच्या मतांच्या टक्केवारीत वाढ करणारी ठरेल. याचे उदाहरण लोकसभेमध्ये सर्वांना दिसुन आले. खा. सदाशिव लोखंडेंना याच संगमनेर मतदात संघातुन दोनदा मोठ्या मताधिक्यचे लीड भेटले. राष्ट्रीय मुद्द्यावरचा परिणाम हा ग्रामीण भागात होतो हे लोकसभेला जाणवले. आता राम मंदिराचा मुद्दा पुन्हा विधानसभा निवडणुकीत किती प्रभावी ठरेल. हा येणारा काळच ठरवेल.
सुप्रीम कोर्टाने त्री सदस्य समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी १८ तारीखला आहे. या सुनावणीचा अंतिम निकाल निवडणुकीच्या आधी दिला गेला. तर, पुन्हा एकदा राम मंदिराच्या उभारणीचा विषय घेऊन भाजपा मतदारांना साकडे घालेलं. असे चित्र आता दिसत असल्याचे बोलले जात आहे.
भाजपने गेली दोन टर्म "राष्ट्रीय अस्मिता" जनतेच्या डोळ्यासमोर ठेऊन लोकसभेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. त्यामुळे विकास आणि निष्ठा हे राजकारणाचा अंग राहिले नाहीत की काय ? असा प्रश्न सुजान नागरिकाला पडू लागला आहे. राज ठाकरे म्हणतात, निवडणूक आली की, कोठेतरी धमाका होणार, हल्ला होणार किंवा लोकांच्या भावनिक मुद्यावर निर्णय घेतला जाणार. याचेच भांडवल करून भाजप निवडणुका जिकत असल्याचे आरोप होऊ लागले आहे. पुलवामा, बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक, पायलट अभिनंदनची वापसी राफेल आणि जम्मू कश्मिरचा ३७० कलम रद्द यांच्या जोरावर राष्ट्रीय अस्मिता उभी करून जनतेच्या मनात देशप्रेम उभे करण्यात भाजप यशस्वी झाली.
आता इतिहासाची पाने चाळली. तर, एक गोष्ट लक्षात येईल. की, बाळासाहेब थोरात यांचा पराभूत करणे सोपे नाही. परंतु, तितकेच अवघडही नाही. कारण, १९९० साली राम जन्मभूमीच्या वादाचे पडसाद देशात उमटले होते. विश्व हिंदू परिषदेने "शिला" पूजन करून हिंदुत्वाचे वातावरण निर्माण करुन जनमानसांच्या ह्रदयावर "जय श्री राम चा नारा" कोरला होता. त्यामुळे शहरच नाही. तर, ग्रामीण भागही भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. हीच लाट संगमनेर तालुक्यात पहायला मिळाली आणि त्याचे भांडवल करत भाजपाने वारकरी सांप्रदायातील "जय हारी" वसंतराव गुंजाळ यांच्या गळ्यात माळ टाकून संघ परिवारात स्वागत केले. राम मंदीराच्या शिला पुजनात वसंतरावांनी मोठे योगदान दिले. या "धार्मिक परिघावर हिंदुत्ववाद" असेलही. पण, याचा केंद्रबिंदू राजकीय हेतू हाच होता. असे अभ्यासकांचे मत आहे. त्याला अनुसरून भाजपाने १९९० च्या विधानसभा निवडणुकीत थोरांतापुढे गुंजाळ यांचे आव्हान दिले. तेव्हा अवघ्या ४ हजार ८६२ मतांनी वसंतरावाचा पराभव झाला. त्यामुळे अपराजित साहेब पराजित होऊच शकत नाही. असे कोणाला वाटत असेल तर तो "दुधखुळेपणा" ठरेल. असे जाणकारांना वाटते. आता त्याच वसंतराव गुंजाळ यांनी निवडणुकीची काही सुत्रे हाती घेतली आहेत.
थांबा ! नो धर्मवाद |
संगमनेर तालुक्यात थोरतांच्या विरुद्ध सुप्त लाटेची भावना महायुतीच्या उमेदवारांसाठी फायद्याची असली तरी. एवढ्यावरच विजयी होणे तसेच सोपे नाही. त्यामुळे, राम मंदिराचा निकाल लागला. तर, संदिग्ध मतदान महायुतीकडे वळू शकते. तालुक्यात भाजप सेनेला मानणारा वर्ग मोठा आहे. मागील निवडणूकीची आकडेवारी पाहता भाजपा सेनेच्या उमेदवाराला थोरातांच्या जवळपास मताधिक्य मिळाले होते. आता तर तरुण मतदारांची संख्या वाढली आहे. हा तरुण मतदार काँग्रेसच्या पाठीमागे जाण्यास तयार नाही. पुलवामा घटनेनंतर ज्या पद्धतीने मोदींनी या निर्णयाचा लाभ लोकसभा निवडणुकीत उठवला. तर, जम्मु-कश्मिर मधील ३७० कलम रद्द करून देशाच्या नागरिकांमध्ये वेगळे वातावरण निर्माण केले. त्यामुळे देशाची प्रतिमा उंचवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस. यांनी राज्यात स्वतः ची निर्माण केलेली प्रतिमा ग्रामीण भागात महायुतीच्या मतांच्या टक्केवारीत वाढ करणारी ठरेल. याचे उदाहरण लोकसभेमध्ये सर्वांना दिसुन आले. खा. सदाशिव लोखंडेंना याच संगमनेर मतदात संघातुन दोनदा मोठ्या मताधिक्यचे लीड भेटले. राष्ट्रीय मुद्द्यावरचा परिणाम हा ग्रामीण भागात होतो हे लोकसभेला जाणवले. आता राम मंदिराचा मुद्दा पुन्हा विधानसभा निवडणुकीत किती प्रभावी ठरेल. हा येणारा काळच ठरवेल.
सुप्रीम कोर्टाने त्री सदस्य समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानंतर सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी १८ तारीखला आहे. या सुनावणीचा अंतिम निकाल निवडणुकीच्या आधी दिला गेला. तर, पुन्हा एकदा राम मंदिराच्या उभारणीचा विषय घेऊन भाजपा मतदारांना साकडे घालेलं. असे चित्र आता दिसत असल्याचे बोलले जात आहे.
सगमनेरमध्ये काही निवडक गोष्टींचा विकास झाला. हे नाकारुन चालणार नाही. मात्र, त्यातून ठराविक दलाल मोठे होऊन अनेकदा संगमनेरच्या भावना दुखावल्या हे देखील तितकेच खरे आहे. त्यात प्रवरा नदिचे "वस्रहरण" असले किंवा "पर्यावरणाची हानी", अशुद्ध पाणी असेल किंवा कत्तलखान्यांमुळे उद्भवणारे प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते असतील तर तरुणांची बेरोजगारी. अशा एक ना अनेक समस्यांनी साहेबांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. इतकेच काय ? निळवंड्याचे पाणी ढवळून नेहमीच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी साहेबांनी पळविले आहे. त्यामुळे तळेगाव पट्टा साहेबांच्या विरोधात चांगलाच दांडपट्टा फिरवेल असे नेत्यांना वाटते आहे. त्यामुळे बारामतीसारखी ही सेफ जागा आहे. असे जर कोणाला वाटत असेल. तर, तो निव्वळ मुर्खपणा ठरेल. जनता एकदा फिरली. तर, काय होते. हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गजांनी पाहिले आहेे. त्यामुळे, उद्या संगमनेरची देखील बारी असू शकते. यात शंका नाही. फक्त ना. विखे साहेबांना श्रीकृष्णाची भूमिका बजावून कार्यकर्त्यांनी कर्णाच्या भूमिकेत लढले तर संगमनेरच्या कुरुक्षेत्रावर नक्कीच पाणिपथ घडेल.
-- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८० दिवसात १६३ लेखांचे ९ लाख ५० हजार वाचक)