"वैभव पिचड" यांच्या "पराभवाचे" खरे "शिल्पकार" कोण...?
मी पुन्हा येईल..!! |
आज तालुक्यात "राष्ट्रवादीसाठी सुवर्ण दिवस" असावा तर "भाजपसाठी" भाजप..! छे..! पिचड कुटुंब व अगदी जीव गेला तरी "भाऊच" अशा निष्ठावंतांसाठी "काळा दिवस" असावा. कारण, गेली ४० वर्षानंतर "पिचड पर्वांचा खंड" पडला आहे. अर्थात, "पडला" की "पाडला". हे साहेबांच्या "सत्तेची मिजास" उपभोगून देखील त्यांच्या गावातील बुथ तपासले. की, पुढे काहीच सांगायची गरज पडणार नाही. त्यामुळे, पिचड साहेब. हा पराभव तुमचा नाहीच. पण, तुमच्या भोवती असणाऱ्या "पिलावळींचे" तुम्ही "बळी" आहात. असे जनतेला वाटते आहे. त्यामुळे, पुढाऱ्यांच्या "मक्तेदारीला" कंटाळून तुम्हाला "पराभव" सहन करावा लागला आहे. उद्या तुम्ही जनतेत उतरा. पुढचा आमदार तुम्हीच असाल. यात "तिळमात्र" शंका नाही. साहेब..! "नाका परिस जड, एक नाही धड, भारा भर चिंध्या"..!! ही म्हण या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवून गेली. पण, तुमच्या पराभवाने अनेकांचे "उर भरुन" आले आणि "धाय मोकलुन रडताना" काल काही "तरुण" पाहिले. साहेब..! तुम्ही अपक्ष लढा. ही जनता डॉ. लहामटेंना ५७ हजारांनी निवडून देते. तर, तुम्हाला दुप्पट मतांनी निवडून देईल. पण, तुम्हाला सांगावं कोणी ? तुमच्या भोवती जे "सत्तापिपासू", "जातीयवादी" आणि "कर्मठ" बुद्धीचे जाळे विनले आहे. ते पार करून तुम्हापर्यंत येता करता. जीव नको-नकोसा होतो. त्यामुळे, तुमचा पराभव नाही. तर, तो घडवून आणलेली "व्युव्हरचना" होती. हेच "त्रिवार सत्य" आहे. असे तुमच्याच प्राणप्रिय व्यक्तींसह जनतेला वाटते आहे.
"इतिहास" काय सांगतो..? १९९५ ला जे लोक तुमच्या सोबत होते. ते सोडून गेले. आणि जनतेला प्रचंड "आनंद" झाला. त्याचे "फलित" म्हणून तुम्हाला ३४ हजार मतांनी निवडून दिले. का ? तर केवळ तुमच्या आजुबाजूची "पिलावळ" कमी झाली म्हणून. तेव्हा पिचड कुटुंबावरील प्रेम वाढते झाले. मात्र, कमी नाही. आज २०१९ ला याच्या "उलट परिस्थिती" निर्माण झाली आणि ३४ च्या "दुप्पट मतांनी" तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. म्हणजे, "ताटात घात" होतोय. हे आता तुम्ही न समजण्याईतके "अनभिज्ञ" नाहीत. याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे, तुमच्यासोबत राहुन, ज्यांनी कोणी झोपेचं सोंग घेतलय..! त्याचे पांघरुन ओढून दुष्मनाची पारख कराल. तरच, पुढे सुगीचे दिवस आहेत. नाहीतर ४० ला ४० वर्षे देण्याची तयारी ठेवा. या परखड भाषेत जाणकारांनी रोष व्यक्त केला आहे.
खरंतर, "राष्ट्रवादीतून" भाजपात हा "पक्षबदलच" जनतेला "पचला" नाही. तो तुम्ही "सहकाऱ्यांना" समजून सांगितला. पण, त्यांनी तो "जनतेला" पटवून दिला नाही. इतकेच काय..! "घड्याळाचे कमळात" रुपांतर झाले आहे. हे देखील "ग्रामीण भागात" माहित नव्हते. मग, "महायुतीने" कालं काय ? केवळ, तुमच्याकडून "पेट्या" उचलायच्या आणि "स्वत:च्या घरात" नेऊन "दडपायच्या". हिच "जोखीम" अगदी "शिताफीने" पार पाडली आणि तुमच्या "विश्वासाचं देणं" म्हणून, "पदरात अपयश" टाकलं. तुमचा "भाजप प्रवेश" आणि "महायुतीचा" योगायोग म्हणजे, "दुष्काळात" भुकेलेल्या "कोल्ह्यांना मांसाहाराचं घबाड" सापडावं असंच काहीसं झालं. सगळे "आतृप्त आत्मे" एक झाले आणि त्यांनी "तिजोरीला सुरुंगच" लावला. असुद्या हरकत नाही. पण, त्याचे "फलित" काय आले ? इतके मोठे "अपयश" ? त्यामुळे, ज्या-ज्या "लुटारुंच्या" हातात "चाव्या" होत्या. त्यांचे "बुथ" तपासा. यांनी तुमच्याच "ताटात बसून" तुमच्याच "पाठीत खंजिर खुपसला" आहे. असे भाऊप्रेमींचे मत आहे.
साहेबांचं दिवाळं; नेत्यांची दिवाळी |
कदाचित, तुम्ही त्यांच्या "जाणत्या राजा" सोबत जे केलं. त्याचा बदला म्हणून, परतफेड करण्याचे काम. या मावळ्यांनी केले तर नाही ना..!! ही चर्चा सद्या तालुक्यात जोरदार सुरु आहे. असे नसते. तर, पिचड साहेब म्हणून सोडा. यांच्या गावात यांनाच माननारा १०० लोकांचा देखील समुदाय नसावा ? ज्यांना "जिल्ह्याच्या" ठिकाणी मोठमोठी पदे दिली. त्यांच्या "बँकेत" ११५ आणि ८३५ मतांची "पिछाडी" असावी. हा तर "कळसच" म्हणायचा. साहेबांच्या स्टेजवर "डबड-डबल" भाषण गर्जना करणारे "राजे"..!, कायद्यावर बोट ठेवणारे "आण्णा" तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि "धुमाळवाडीत" तिसरे "मच्छिंद्र" हे सगळे साहेबांच्या पाचविला पुजले गेलेत की काय ! देव जाणे. तरी धुमाळवाडीला साहेबांनी काय कमी केले होते. ? कारखाना, नगरपंचायत, दुधसंघ. पण, त्याची परतफेड म्हणून तेथून ६५५ मते तर विरोधकांना ७६४ चे लिड दिले. यापेक्षा दुसरं "दिवाळं" गिफ्ट काय असू शकतं...!! जुन्याकाळी लोकं म्हणायचे. "चार घरच्या चार सुना पण, कोणीच पाणी देईना" तसेच काहीसे साहेबांचे झाले. शिवसेना, रिपाई, रासप आणि भाजप यांच्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आले खरे. पण, सगळ्यांनी त्यांना सुड बुद्धीने पाणि पाजले. इतकेच काय..! विरगाव सारख्या ठिकाळी चार घरचा हा पाहुना उपाशी मेला. येथे चक्क साहेबांना लाजवेल अशी १ हजार ६७० उदंड मते बहाल केली. तर डॉ. लहामटे यांना २ हजार ८४३ मताधिक्य दिले. त्यामुळे, साहेब..! तुम्ही पडले असे म्हणायला जीब रेटत नाही. पण, तुम्हाला पाडले गेले. यावर तुमचे निष्ठावंत ठाम आहेत.
तसेही, "अकोले विधानसभा" ही जागा "अनुसुचित जातीसाठी" राखीव असल्याने "बहुजनांचे बुरखे" घातलेल्या "प्रस्तापितांची पोटदुखी" ही कमी नाही. त्यात "साखर कारखाना" व दुधसंघाचे "चेअरमन" पद तसेच आमदारकी पिचड कुटुंबाकडे कायम होती. इतकेच काय ! इकडून तिकडून पंचायत समितीत ओपनची जागा निघाली. तर, तेथे घुसखोरी झाली. त्यामुळे, अनेक "अतृप्त आत्मे" साहेबांवर टपून बसले होते. यात सर्वात मोठी एक चुक अशी झाली. की, पवारांनी भाजपची "ईडी" - "येडी" करून ठेवली आणि "ईडीच्या" डावाला "रडीने" उत्तर देत. "दिल्लीचा डाव" उधळवून लावला. याच दरम्यान पवार साहेब अकोल्यात आले होते. त्यावेळी, जो अगस्ती कारखाना उभा करण्यात साहेबांचा मोलाचा वाटा आहे. तेथे प्रशासनाने साधा गुच्छ देऊन औपचारिकता देखील पार पाडण्याची तसदी घेतली नाही. त्यावर "रोखठोक सार्वभौमला" पवार "साहेब..! आम्हाला क्षमा करा" हा भावनिक लेख लिहीला गेला होता. त्यामुळे, अनेकांचे काळीज गलबलून गेले आणि जाणत्या राजाविषयी अकोलेकरांची अस्मिता जागी झाली. त्याच अनुषंगाने आ. धनंजय मुंडे यांनी भाषण केले. हे वातावरण राष्ट्रवादीला पुरक होऊन गेले. या सर्व परिपाकाचा उद्रेख होऊन या अपयशाची निर्मित्ती झाली. असे समजल्यास काही वावधे नाही.
घड्याळात "कमळाचा" टाईम OFF |
"वाटाघाटीत" सिट "बोंबललं" |
- सागर शिंदे
नक्की वाचा
साहेबांच्या पराभवात वजिर कोण ? सिताराम पाटील गायकर, मिनानाथ पांडे, कैलास वाकचौरे, विजय वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, शिवाजी धुमाळ, सर्व नगरसेवक, संचालक, एमडी साहेब यांच्यासह अन्य निवडकांची कोणाची काय भुमिका असायला हवी होती.भाग १ क्रमश:
-----------------------------
जाहिरात
दिपावलीचे आकाश कंदिल व अन्य साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण. संस्कृती मॉल. खटपट नाका.
प्रोप्रा : ९८९०१२०६६८
योगेश लाड
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८६ दिवसात १६९ लेखांचे १० लाख ३५ हजार वाचक)