"वैभव पिचड" साहेबांना "राष्ट्रवादीच्या" "कार्यकर्त्यांचे" पत्र..! साहेब..! "जिगर" सोडू नका..!!

...तरीही आभार..!!

भाऊ......
     "प्रिय" म्हणूू की "आदरणीय"..!! माहित नाही. पण, "श्वासाहुन प्रिय" आम्ही तुम्हाला मानलं आहे. तुमच्या पराभवाचे "प्रतिबिंब" आमच्यावर पडले आणि म्हणूनच, "बोलायची हिंमत" राहिली नाही. 
             तुम्हाला आठवतय..!! शरद पवार साहेब आले होते. तेव्हा, तुमचा किती "जीव तुटला" होता. पण, लोकं किती "सहज" बोलून गेले. "गुच्छ देखील" दिला नाही. पण, त्याची खंत तुमच्या काळजात किती "सलत" होती. हे त्यांना काय माहीत. पवार साहेबांविषयी "प्रचंड आत्मियता" असूनही त्यांना "सामोरे जाण्याचे धाडस" अगदी कोणातच नव्हते. यापेक्षा "सर्वोच्च सन्मान" कोणताच नसावा. असे मला वाटते. पण,  हे फक्त कळेल त्यालाच. अगदी त्याच "धाग्याला अनुसरून" आम्ही देखील तुम्हाला "सामोरे जाऊ शकत नाही" हेही तितकेच खरे आहे. म्हणून हे पत्र. साहेब..! आई तुळजा भवानीची "शप्पत" घेऊन सांगतो. कोणत्याही "स्वार्थापोटी" आम्ही तुमच्याशी नातं जोडलं नाही. म्हणून, नेहमी पडद्याआड राहिलो. तुम्ही मोठे झालात. की, आम्ही आपोआप मोठे होतो. याच "उदात्त हेतून" तुमचा "दुर्लक्षित कार्यकर्ता" म्हणून लढत राहिलो. कधी मनाला वाटलं की, "तुमच्यासोबत एखादा फोटो" काढावा. म्हणून जवळ यायचा प्रयत्न केला. पण, काही "नेत्यांनी" नेहमीच आमचे हात धरून मागे खेचले. तरी, मनातून तुमच्या "ओढीचा हव्यास" उतरता झाला नाही. 
         पण, खरं सांगू..!! जेव्हा तुम्ही गावात आलात, आणि तुम्हाला गावकरी "प्रश्न" विचारु लागले. एक विरोधाक म्हणून त्यांचा तिळपापड झाला.  तेव्हा माझ्या काळजाचे अगदी पाणी-पाणी झाले होते. वाटलं होतं, सगळ्यांच्या उरावर बसून तुम्हाला "व्यासपिठ" निर्माण करून द्यावं. पण, जेव्हा एक फोटो घेताना जे लोक मला बाहेर ओढत होते. तेव्हा गावकरी विरोध करताना हेच तुमचे "संधीसाधू निष्ठावंत" अगदी खूप दूर-दुर ऊभे होते. हेच "वास्तव" मी अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. "सुखातला गोतावळा" कमी नसतो. पण, "दु:खात" कोण "सारथी" होतो. हे तुम्ही देखील जाणू शकले नाही. जो "भेटेल" तो आपला. जो "सोबत", तोही आपला, जो "स्पर्धक", तो देखील आपलाच. इतक्या "उदात्त अंत:करणाचे राजकारण" माझ्या समजण्यापलिकडचे असावे. म्हणून मी आजवर "शब्दांना आवर" घातला होता. पण, काल तुमचा पराभव झाला आणि एक "अनभिज्ञ" म्हणा की "दुर्लक्षित" कार्यकर्ता. पण, "रोखठोक सार्वभौम"च्या माध्यमातून विनंतीपुर्वक थोडे बोलून व्यक्त व्हावे वाटले. कारण, "संयमालाही अंत असतो" आणि तो तुमच्या पराभवानंतर राहिला नाही. म्हणून "क्षमा" मागतो.

जनतेचा कौल विनम्रपणे मान्य.!

               साहेब..! कदाचित मी "कार्यकर्ता" नाही. पण, लोकांना जशी "शरद पवार" साहेबांविषयी "आत्मियता" आहे. अगदी तशीच मला त्यांच्यासह तुमच्याबाबत देखील आहे. पण, तुमच्या "पक्षप्रवेशाने" मन अगदी "चलबिचल" झाले. मनात एक सहज प्रश्न डोकावून गेला. माझ्या एकट्याच्या जाण्याने काय होतय.! साहेबांकडे काय कमी नेते आहेत का ? म्हणून  मी "राष्ट्रवादीच्या प्रवाहात" वाहिलो गेलो.   "महायुतीत" भाजप, शिवसेना, रिपाई, रासप आणि "व्यक्तीनिष्ठ" राष्ट्रवादी हा सगळा "लावाजमा" असताना माझ्यासारख्या "किड्या मुंग्यांना" कोण विचारतय..! म्हणून, मी कळत नकळत माणसाला माणूस जोडीत गेलो. का कुणास ठाऊक, लोकं "तुमच्यावर कमी" आणि "तुमच्यासोबत आसणाऱ्यांवर टिका" करताना दिसून आले. इतकेच काय !! "विरोधकांसह तुमचे समर्थक" देखील नको तशी "गरळ" ओकताना लक्षात आला. साहेब..! खरोखर ही "सल" घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो देखील. पण, "आपले नेते" इतके "हवेत" होते. की, त्यांना "वास्तवाची जाणिव" करुन देत असताना त्यांनीच '२०-२५ हजारांचा हिशोब' समोर मांडला. तेव्हा लक्षात आले. "आती शाहना, त्याचा बैल रिकामा" असे का म्हणतात. पण, या सगळ्यात तुमचा "बळी" जात आहे. हे दिसून सुद्धा मी काहीच करु शकलो नाही. ही खंत मनाला "बोचते" आहे.
           
आम्ही मैदानात काम करत असताना काही मित्रपक्षाचे नेते भेटत होते. त्यांच्यासोबत रोजगार हमीसारखे लोक होते. हे सगळं पाहताना प्रचंड वेदना होत होत्या. पण, काय करणार. "कोठे दुबळ्याघरी लगिन आहे" असे "शब्दप्रयोग" कानावर पडले आणि मी "गच्च डोळे बंद करुन" पुढे निघालो. आता काही झाले. तरी, मला माघारी परतण्याचा मार्ग नव्हता. कारण, काल तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी "यातायात" करावी लागत होती. त्या उलट आज नव्याने पाय रोवण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या "राष्ट्रवादीत" मला "मानाचे स्थान" होते. काम करताना डोळ्यासमोर "पवार साहेब" तर "मनात" तुम्ही होते. त्यामुळे, "तुमच्या पराभवासाठी" मी कधीच झटलो नाही. पण, साहेबांच्या निष्ठेत "छेद" करण्याची हिंमत देखील माझ्यात झाली नाही. त्यामुळे, नि:शब्द भावना घेऊन मी "राष्ट्रवादीच्या गोतावळ्यात" वावरत होतो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली. की, माझ्यासोबत जे कोणी राष्ट्रवादीचे काम करत होते. ते देखील तुम्हाला प्रचंड मानतात. पण, साहेब..! जो विरोधात जातो. तो प्रत्येकजण विरोधक नसतो. यावर मी ठाम झालो आहे. जर, तुम्ही आम्हाला एक साद घातली असती. तर, अगदी "बाळ आईकडे" धाव घेते. तितक्याच ओढीने आम्ही आलो असतो. पण, महायुतीच्या खिचडीत तुमचे समर्थक आम्ही. तुमच्याच पराभवाचा पाया भरतो आहे. हे मनाला देखील शिवले नाही. आणि तुम्ही देखील आम्हाला साद घातली नाही. त्यामुळे, एकाला एक माणसे जोडता-जोडता ५७ हजार लोकांची साखळी कशी झाली. हे आमच्याही लक्षात आले नाही.

पराभूत झालो, तरी जनतेच्या डोक्यावरील हात
कधीच काढणार नाही..!!

        साहेब..!! काल  आमच्या उमेदवाराचा "विजय" झाला. लोकांना वाटले आमची "पायपिट सार्थकी" लागली. पण, खरं सांगू..!! एका जाळीतून मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. कालचा सतेच चेहरा आज निश्तेज झाल्याचे हावभाव पाहुन नकळत माझ्या डोळ्यांना ओले करून गेले. लोक म्हणाले तुम्ही "जिंकलात". पण, आज खऱ्या अर्थाने आमचा "पराभव" झाला होता. "गड आला. पण, सिंह गेला" हे वाक्य त्या दिवशी "ह्रदयाला" छेदून गेले. कदाचित तुम्ही माझ्या जवळून गेलात. पण, तुमच्या "डोळ्यात डोळे" घालण्याची "हिंमत"  माझ्यात झाली नाही. तुमची "अस्थिर पाऊले" पाहिली आणि खरोखर एक "हुंदका दाटून" आला. तुमचे "हारणे" हा माझ्यासारख्या "हळव्या" मनाचा "पराभव" होता. मी शब्दात नाही मांडू शकत. पण, तुम्हाला शब्द देतो. आज मी "पवार साहेबांचा" होतो. पण, माझे पुढील पाऊल तुमच्यासाठी असेल. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पक्ष बांधनी नाही. तर, एक-एक माणूस उभा करून तुमचे सैन्य पुन्हा उभा करील. तेव्हाच तो माझा खरा विजय असेल. 

     तुमचा 

एक "निष्ठावंत"

    "कार्यकर्ता"
(कार्यकर्त्याचे नाव गुपीत ठेवण्यात आले आहे. आजकाल "निर्भिड लेखनाच्या" मलाच धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या बिचाऱ्याने भावनांना वाट मोकळी केली. त्यात गैर काय ? त्यामुळे नाव विचारु नका..!)
==================
                   - सागर शिंदे 
             "सार्वभाैम संपादक"
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८६ दिवसात १६९ लेखांचे १० लाख ५० हजार वाचक)