"सौ-शेर" को एक "सव्वा-शेर" बाळासाहेब थोरात, "विजयश्री"
संगमनेर (प्रतिनिधी) :-
कोणी कितीही लावा शक्ती, कोणी कितीही लढावा युक्ती, कोणी कितीही करा ओ हल्ला लय मजबुत बाळासाहेबांचा किल्ला. हे गाणं एकलय ना सर्वांनी. आज त्याचाच प्रत्येय पहायला मिळाला. संगमनेर मतदारसंघावर पुन्हा एकदा आ. बाळासाहेब थोरतांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. संगमनेर मधील जनतेने आ. थोरतांना मतांचा कौल देत मोठ्या मताधिक्याने दर्शविला आहे. परंतु, २०१४ साली मोदी लाट आली व अनेक वर्षे एकाच मतदारसंघावर पकड असलेले नेते पराभुत झाले होते. यात अनेक प्रस्तापितांना धक्का बसला होता. सहकाराचा दरारा असलेल्या नेत्यांचा ही पराभव झाला. परंतु आ. बाळासाहेब थोरात यांची ३५ वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. व पुन्हा एकदा आ. थोरतांना संगमनेरच्या जनतेने स्वीकारले.बुंद-बुंद से सागर बनता है !, तशी ही नदीकाठची छोटी-छोटी गावे आ. थोरतांचा किल्ला लढवतात. जोर्वे गटातून रायते, वाघापुर, खराडी,देवगाव, शिरापूर, निमगाव टेंभी ही गावे आ. थोरतांची ढाल बनवुन किल्याचे संरक्षण करताना आपण पाहिले. विरोधकांनी नेहमी प्रमाणे साकुर पठारभाग व तळेगाव येथील पाण्याचा मुद्दा हातात घेत थोरतांनवर टीका केली. परंतु, पाण्यानेच विरोधकांच्या मानसुब्यावर पाणी फेरले आणि आ. बाळासाहेब थोरतांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाला.
संगमनेर मतदारसंघात राष्ट्रीय मुद्द्यांचे वारेवाहू लागले होते. हे लोकसभेला खा. सदाशिव लोखंडे यांना ७ हजार ६२५ मत मिळाल्याने दिसुन आले. त्यातच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला. व भाजपने अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी गृहमंत्री राधाकृष्ण विखेंनवर सोपवली. युतीचा धर्म स्वीकारत त्यांनी जिल्ह्यात १२-० करण्यासाठी पुढे सरसावले. व ही संधी त्यांना चालुन आल्याने एका दगडात दोन पक्षी मारण्याची सुवर्ण संधी सापडली. एकीकडे जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी व काँग्रेस प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी व संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर आपली पकड जमवण्यासाठी.
ज्या-ज्या वेळी थोरतांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक संपूर्ण शक्तीनिशी करतात. त्या-त्या वेळी स्व. भाऊसाहेब थोरातांनी संगमनेरला घालुन दिलेली सहकाराची तटबंदी ही आ. थोरतांनची मताधिक्य वाढवते. असे जाणकारांना वाटते. स्व. भाऊसाहेब थोरात हे दूरदृष्टी असणारे सेनानी होते. त्यांनी भविष्याच्या राजकारणाचा वेध घेत सहकारी संस्थांची निर्मिती केली. व पुढे हे जाळे प्रत्येक गावात पसरले. हा सहकारच आ. बाळासाहेब थोरतांनचा परिवार झाला. येणारे संकट सर्व जण मिळवुन नेटाने परतावून लावत गेले. आ. थोरतांचा पारदर्शी कारभार व विकासकामे हे सहकाराचेच फळ आहे. आणि हा सहकाराचा वटवृक्ष सर्वांना आपल्या छायेत घेतो. असे संगमनेरकारांना जाणवते. त्यामुळे संगमनेरच्या जनतेने आ. थोरतांना पुन्हा एकदा जोरदार प्रतिसाद दिला.
विरोधक हा नेहमी प्रवहात असला पाहिजे याचे उत्तम उदा. डॉ, सुजय विखे अहमदनगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे हे गेली दोन वर्षांपासुन त्यामतदार संघात संघटन बांधून विजयी झाले. परंतु, संगमनेर मतदारसंघात आजपर्यंत बीजेपी-शिवसेनेला आ.थोरतांनच्या विरोधात उमेदवार शोधून देखील सापडेना. पाच वर्षात कुठेही चर्चेत नसलेले व जनसंपर्कात नसलेले साहेबराव नवले यांची ऐन निवडणुकीत वर्णी लागली. त्यामुळे आ. थोरतांना १९९० ची पुणावृत्ती होईल, असा विरोध आत्ता शिल्लक राहिलेला दिसत नाही. असे राजकीय अभ्यासकांना वाटते.
२०१४ साली मोदींचा प्रभाव महिलांवर पडलेला दिसुन आला. सोशल मीडिया, जहिराती मात्र सत्तेत आल्यानंतर उज्वला योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, निर्भया, सौभाग्य योजना यासर्व बाबींन मधुन महिलांनच्या मनावर मोदींची छबी उमटली होती. महिलांचे मतदान हे युती सरकारकडे आकर्षित झाले होते. मात्र संगमनेर मतदारसंघात वडिलांनचे मताधिक्य वाढविण्यासाठी व महिलांना आकर्षित करण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांनी महिलांनचे मेळावे घेत प्रचार केला. कुंकू-हळद कार्यक्रम ते गौरी पूजनाचे कार्यक्रम आयोजित करून घरा-घरात बाळासाहेब थोरात हे व्हिजन संपूर्ण तालुक्यात केले. यात दुर्गाताई, सत्यजित व सुधीर तांबे यांच्यासह सामान्य कार्यकर्त्यांचे खूप मोठे योगदान आहे.साहेबांना पाडण्यासाठी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, ना. विखे, खा. विखे, खा. लोखंडे अशा अनेकांनी कंबर कसली. मात्र, "सौ-शेर" एक "सव्वा-शेर" अशी परिस्थिती संगमनेरात दिसून आली. रोखठोक सार्वभौम च्या वतीने थोरात साहेबांना मनस्वि शुभेच्छा. साहेब 61 हजार 853 मतांनी विजयी होतील.