तुमचे "एक मत" काय "परिवर्तन" घडवू शकते, वाचा शेअर करा.!!
अकोले (प्रतिनिधी) :-
"विश्वरत्न" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतात "लोकशाहीचा" पाया भरुन "कळसापर्यंत" बांधनी केली. या लोकशाहीचा श्वास म्हणजे "मतदान प्रणाली" होय. "मी जर नाही गेलो. तर, काय होईल माझ्या एक मताने" ? हाच प्रश्न "बेजबाबदार नागरिकाला" पडतो. आणि मग "एक दिवसाचा" प्रश्न "पाच वर्षे" वारंवार भेडसावतो. जेव्हा आपण मतदान करत नाही ना ..! तेव्हा नैतिक मुल्याचा आधार घेता मला वाटते की, आपल्याला हक्कच नाही लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा. की काय केलं तुम्ही आमच्यासाठी. तेव्हा पहिला प्रश्न स्वत:ला विचारा. तुम्ही काय केलय, लोकशाहीच्या बळकटीसाठी.! जेव्हा मतदान होते आणि टक्केवारी बाहेर पडते. तेव्हा खरोखर अंत:करणातून वेदनांचा मारा होतो. ज्या देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य दिले. तेच लोक गुलामीतून मुक्त झाले. मात्र, आजूनही इथे ५० टक्के लोकांच्या रक्तात मानसिक गुलामी सळसळते आहे. जे नागरिक मतदान करतच नाहीत. का ? तर म्हणे काय फायदा त्यातून, ते काय करणार आहेत, त्यांनी काय केलय आजवर, मला सुट्टी नाही, वेळ नाही, कंटाळा आलाय ही मानसिक गुलामी नाही, तर काय आहे ?
कधीकधी अस्वस्थता वाटते या लोकशाहीला घेऊन. एक आनंद असा वाटतो की, वाडी-वस्ती, गल्ली-बोळ, चौक-कॉलनी आणि गावा-गावात राहणारे सगळे गोरगरिब अगदी आनंदाने मतदान करतात. भलेही त्यांच्या मुलभूत गरजा अपुर्ण असूद्या, दोन वेळच्या अन्नास ते महाग असूद्या. पण ते लोकशाहीचा उत्सव अगदी जुन्या फाटक्या कपड्यावर जाऊन साजरा करतात. पण, दुर्दैव आणि खंत अशी. की, जे शिकले सवरले. गडगंज मालमत्ता उभी केली. त्यांना रांगेत उभे राहण्याची लाज वाटू लागली आहे. औंदा मतदानाचा टक्का घसरला अशी वाल्गना करणाऱ्या अति शहण्यांची संख्या वाढत चालली आहे. यांचा खरा उत्सव दिवाळी असतो. पण, आपण भारताचे नागरिक आहोत. हा देश "सार्वभौम" घडविण्याची जबाबदारी आपली आहे. असे प्रत्येकाने विचारमंथन केले. तर, नक्कीच लोकशाहीला बळकटी येईल. असे सुज्ञ नागरिकांना वाटते आहे. त्यामुळे चला मतदान करूया. चुकूनही म्हणू नका. की माझ्या एक मताने काय होईल. एका-एका थेंबाने समुद्र तयार झालाय. हे विसरु नका. तुमच्या एक मताची किंमत भाजी भाकरी इतकी नाही. असे डॉ. बाबासाहेब सांगतात. त्याची किंमत काय आहे. हे खालील उदाहरणे तुमच्या काळजात घर करून जातील आणि तुम्ही नक्कीच मतदान करायला जाल. याची मला खात्री आहे.
तो काळ १९९९ चा होता. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांना १३ महिन्यात केंद्रातून पायऊतार व्हावे लागले होते. कारण, एआयएडीएमके यांनी भाजपचा पाठिंबा काढला आणि त्यांना बहुमत सिद्ध करावे लागले. अखेर विश्वास प्रस्तावाच्या बाजूने २६९ आणि विरोधात २७० मते पडली आणि वाजपेयी सरकार पडले. केवळ एक मताने सरकार कोसळले. ही आहे एक मताची किंमत.
सन २००८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत सी. पी. जोशी हे मुख्यमंत्री होणार होते. तेव्हा त्यांना ६२ हजार २१५ आणि कल्याण सिंहांना ६२ हजार २१६ मते मिळाली. जोशी अवघ्या एक मताने पराभूत झाले. विशेष बाब म्हणजे, त्यांची पत्नी आणि ड्रायव्हरने वेळेआभावे मतदान केले नव्हते. या बेजबाबदार पणाचा फटका इतिहास रचून गेला.
१८७५ ला फ्रान्समध्ये लोकशाही ठेवायची राजेशाही यावर मतदान घेण्यात आले होते. तर फक्त एका मताच्या विजयामुळे राजेशाहीच संपुष्टात आली आणि तेथे लोकशाही गणराज्य उभे राहिले. इतके महान मुल्य आहे. लोकशाहीचे.
सन १९२३ साली जर्मनीत मतदान झाले होते. तेव्हा केवळ एका मताने "नाझी दल" सत्तेत आलाे आणि त्यानंतर हिटलरशाही सगळ्या जगाने अनुभवली. ती केवळ एक मताच्या जोरावर. तेव्हा 'माझ्या एका मताने काय होईल ? असे म्हणणाऱ्यांनी विचार केला पाहिजे. कोण जाणे.! उद्याच्या इतिहासाचे शिल्पकार तुम्ही असू शकतात.
सन २००४ साली कर्नाटक विधानसभा निवडणुक लागल्या होत्या. तेव्हा जेडीएसचे ए.आर. कृष्णमूर्ती यांना ४० हजार ७५१ मते मिळाली आणि काँग्रेसच्या के.आर. ध्रुवनारायण यांना ४०,७५२ मते मिळाली होती. फक्त सुटी न मिळाल्याने त्यांच्या स्वत:च्या ड्रायव्हरला मतदान करता आले नव्हते. हा बेजबाबदारपणा किती अंगलट आला. त्या मताचे मोल आणि उत्तर काळानेच दिले.
१७७६ साली अमेरिकेत जर्मन भाषेचे वर्चस्व होते. मात्र, तेथे इंग्रजीला मातृभाषा म्हणून स्थान हवे होते. तेव्हा मतदान घेण्यात आले. केवळ, एक मतामुळेच जर्मनीच्या जागी इंग्रजीच्या रूपात अमेरीकेत मातृभाषा म्हणून मान्यता मिळाली होती.
१९१० मध्ये अमेरिकेत रिपब्लिक पक्ष सर्वात मोठा होता. परंतु, त्या पक्षाचा लोकप्रिय उमेदवार एका मताने पराभूत झाला होता. त्यामुळे हा पक्ष जणू शोकसागरातच बुडाला होता.
सन १८७६ साली १९ वे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका झाल्या होत्या. यावेळी, रुदरफोर्ड बी.हायेस यांना १८५ मते मिळाली होती आणि सॅमुअल टिलडेन यांना १८४ मते मिळाली. केवळ एक मताने ते पराभूत झाले. खरे तर प्राथमिक फेऱ्यांमध्ये टिलडेन २ लाख ५० हजार मतांनी जिंकले होते.
आम्ही "रोखठोक सार्वभौम" पोर्टलच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आहे. की, आपल्याला संविधानाने जो अधिकार दिला आहे. तो आपण समता, स्वतंत्र्य, न्याय आणि बंधुता असा "सार्वभौम" देश घडविण्यासाठी मतदान करा.
धन्यवाद..!!
सागर शिंदेसुशांत पावसे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८२ दिवसात १६२ लेखांचे १० लाख १० हजार वाचक)