माझी जनतेकडे "शेवटची" इच्छा "वैभवला" विजयी करा..!! पावसामुळे "शहांची" सभेला "गैरहजेरी"
अकोले (प्रतिनिधी) :-
मी लोकविकासाची कामे केले. आदिवासी बजट, पेसा कायदा हे महत्वाचे काम मी करु शकलो. देश भक्कम करायला आपण मदत करायला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी निर्णय घेतला. काल राष्ट्रवादीला शिव्या घालणारे आत त्याच व्यासपिठावर ते नेते झाले. फडणविस यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसी आरक्षण यावर योग्य निर्णय घेतला. शिव्या शाप, निंदा नालस्त याचे उत्तर मतदानातून देणार आहे. ४० वर्षे मी प्रत्येकाचे काम केले. विकासासाठी कोणाचे वैर केले नाही. म्हणून ८० व्या वर्षी हात जोडून विनंती करतो. उतारवयात चांगल्या व्यक्तीच्या हाती सोपवायचा आहे. माझे या वयात स्वप्न पुर्ण करण्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. मी विनंती करतो. २१ तारखेला वैभव पिचड यांना मतदान करा. बारामतीवरुन मानसे आली. पण, बटन दाबायला ती मानसे येणार नाही. १९९५ ला मधुकर पिचड एकटा पडला होता. तरी जनतेने मला निवडून आणले. ती वेळ आज पुन्हा आली आहे. मला खात्री आहे. की, जनता माझ्या पदरात अखेरचे यश टाकेल.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवर राष्ट्रवादीच्या जाहिराती पहात होतो. खोटं बोल पण, रेटून बोल. असे दिसत आहे. काँग्रेसचे अस्तित्व संपले आहे. जनतेने ठरविले आहे. १२-० असा निकाल करायचा आहे. पिचड साहेब आम्हीला सांगत असे. आदिवासी भागात स्टोरेज होणारे पाणी पहिल्यांदा आदिवासी समाज्याचे आहे. मग बाकी जनतेचे. त्यांनी कधी सत्तेसाठी तडजोड केली नाही. भाजपत पक्षप्रवेश करताना पिचड साहेबांनी २० मागण्या केल्या होत्या. त्या सर्व मुख्यमंत्र्यांनी पुर्ण केल्या. त्यांनी स्वत:साठी काही मागितले नाही. एक आदिवासी नेते म्हणून राष्ट्रवादीने तुमचा वापर केला. म्हणून तुम्ही भाजपत या. तुमचा सन्मान केला जाईल. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला. गेली अनेक वर्षे विरोधी बाकावर बसून संघर्ष केला आहे. आणि उद्या देखील महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे, विरोधी बाकावर बसण्यापेक्षा वैभव पिचड यांना निवडून द्या. ते तुमचे प्रश्न विधानसभेत मांडतील. तोलार खिंड फोडायची असेल. तर, संसदेत सुजय विखे व खा. लोखंडे प्रयत्न करतील व विधानसभेत वैभव पिचड. त्यामुळे, विरोधी पक्षात बसणाऱ्यांना निवडून देऊन पुन्हा अकोल्याचे वाटोळे करू नका. ज्यांना जनतेने नाकारले आहे. त्यांना साथ देऊ नका. आज वैभव पिचड यांना मोदी साहेबांचा आशिर्वाद लाभला आहे. तुमचा आशिर्वाद हवा आहे. तुमची साथ लाभली तर विजय नक्की आहे.
वैभव पिचड म्हणाले की, विरोधकांनी केवळ शिव्याशाप द्यायचे काम केले. डॉ. असूनही शिव्या कसे देतात. हिच यांची संस्कृती आहे का ? म्हणून कोणताही अजेंडा समोर घेऊन न येता तुमच्याकडे लोक येतील. त्यांच्या भुलथापांना थारा देऊ नका. जालिंदर वाकचौरे म्हणाले. वैभव पिचड राष्ट्रवादीतून निवडून आले असते. परंतु, सर्वांना माहित आहे. पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे. त्यामुळे विकासासाठी ते भाजपत आले आहे. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. गायकर पाटील म्हणाले मुळा, आढळा व प्रवरा खोऱ्यातील सर्व शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम पिचड साहेबांनी केले आहे. निळवंडे धरण, कालवे यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. अजून तालुक्यात प्रलंबित आहेत. ती कामे पुर्ण करायची आहे. मुळा नदीवर आंबिलला दोन टिएमशी धरण झाले पाहिजे. बिताक्याचे काम बाकी आहे. त्यासाठी स्थानिक प्रतिनिधींनी प्रयत्न करावा. ज्यांनी ४० वर्षे स्वार्थ पाहिला नाही. त्यांची उतराई होण्याची वेळ आली आहे. ती वैभव पिचड यांना निवडून देऊन पुर्ण करा.
शिवाजी धुमाळ म्हणाले, अकोल्यात अगदी खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे. ज्यांनी दारुच्या बाटल्या पकडून दिल्या. ते आज एकच गाडीत फिरत आहे. ज्यांनी शपता घेतल्या. त्यातले मधुकर तळपाडे व सतिश भांगरे कोठे आहे. यांच्यातील काही लोक म्हणतात, युती काय भंडारदाऱ्यात नेऊन गाडायची आहे का ? त्यामुळे, अकोल्यात लाट वैभव पिचड यांची आहे. या डॉ. लहामटेना आम्ही झेडपीला पैसे काढून उभे केले. त्यानंतर या पठ्ठ्याला पैसे मागायची सवय लागली. हे स्वत:ला डॉक्टर म्हणून घेतात. त्यांनी कधी एखाद्या व्यक्तीला सुई टोचली दाखवून द्या. मग कोटी-कोटी रुपयांचा बंगला आला कोठून. यांनी माझ्यावर टिका केली. पण, मी कष्टाने पैसै कमविला आहे.यावेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री मधुकर पिचड, उमेदवार वैभव पिचड, खा. सदाशिव लोखंडे, मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे, सिताराम पाटील गायकर, रिपाई राज्यसचिव विजय वाकचौरे, मधुभाऊ नवले, मिनानाथ पांडे, शिवसेनेचे खावरे नाना, मच्छिंद्र धुमाळ, जालिंदर वाकचौरे, सिताराम भांगरे, शिवाजी धुमाळ, सोनाली नाईकवाडी, हेमलता पिचड, गिरजाजी जाधव आदी नेते उपस्थित होते.