"पवार "साहेब" आम्हाला "क्षमा" करा..! अकोलेकरांना "गहिवरुन" आले ! हा तर घोर अपमान..!
अकोले (प्रतिनिधी) :-
राष्ट्रवादीेचे "फाऊंडर मेंबर" मधुकर पिचड साहेब यांनी पवार साहेबांचा हात सोडल्यानंतर ते पहिल्यांदाच अकोल्यात आले होते. त्यांना "प्रतिसाद" म्हणून पवार प्रेमींचा "जनसागर" अकोल्यात उसळला. लोकांनी साहेबांवर भरभरुन प्रेम केले. पण, ज्या साखर कारखान्याच्या पाया भरणीत पवार साहेबांच्या "घामाचे थेंब" टपकले. त्याच बळावर आजही तो कारखाना येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी अगदी "सह्याद्रीसारखा" खंबीरपणे उभा आहे. पण, ज्या पालकाने है वैभव उभे केले. आज तो पालक त्याच कारखान्यातून अक्षरश: "अपमानित" होऊन माघारी जाताना दिसला. निर्ढावलेले कातडे सोडा. पण, जर कधी या "इमारतीला" भावनांची "कळा" असती. तर, तीच इमारत, पवार साहेबांकडे पाहुन "ढसढसा" रडली असती. अगदी "सासरला" जाताना "बापाच्या" गळ्यात पडून धाय मोकलून रडणाऱ्या "पोरी" सारखी. कारण, पवार साहेब आले तेव्हा "प्रशासनाचा" एकही "जाणकार" माणूस त्यांच्या स्वागतासाठी आला नाही. ज्यांना साहेबांनी "बोटाला धरुन" राजकारण शिकविले. त्यांच्या "निष्ठा" या तालुक्यातील नेत्यांनी अगदी "पायंदळी" तुडविल्या आणि हीच सल मनात ठेऊन अकोलेकरांचे ह्रदय गलबलून गेले. ज्या "जाणत्या राजाला" अकोल्यात आणायला कालपर्यंत लोक तरसत होते. ते साहेब अकोल्यात आल्यावर "लोकं दडून" बसले. हीच का या "मातीची संस्कृती" आणि हाच का तुमच्या "पुरोगामीत्वाचा" पुरवा. अन् म्हणे "डाव्या चळवळीचा" आमचा तालुका. लाज वाटते असले शब्द बोलताना आणि उच्चरताना. असे वैचारिक जनतेला आज प्रकर्षाने वाटू लागले आहे.
गेल्या महिन्यात २४ तारखेला मुख्यमंत्री मोहदय अकोल्यात येणार होते. त्यांना हवेतून खाली घेण्यासाठी याच साखर कारखान्याच्या प्राणांगणात येथील कामगारांनी घाम गाळून "हेलीपॅड" तयार केले होते. पण, दैवाला ते मान्य झाले नाही. आणि महोदय शिर्डीहुन अकोल्यात आले. त्यानंतर काल शरद पवार साहेब येणार म्हणून हेलीपॅडची गरज होती. तेव्हा वाटले होते. की, जो कारखाना साहेबांच्या बळावर उभा राहिला आणि हजारो लोकांच्या कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागला. ते सगळे झपाटून कामाला लागतील. पण, ज्याला पुरोगामी तालुका म्हणतात, तेथे उपकाराची फेड अपकाराने झाल्याचे पहायला मिळाले. ज्या मुख्यमंत्र्यासाठी "चार डझन" कामगार घाम गाळत होते. तेच पवार साहेबांसाठी कोठे संपावर गेले होते. देव जाणे..! त्यामुळे चक्क "निष्ठावंत" महेश तिकांडे, भाऊसाहेब साळवे, ऋषीकेश वैद्य, अमित नाईकवाडी, व संतोष नाईकवाडी यांनी शेनाने सारवून "सफेद सर्कल" मारुन "हेलीपॅड" तयार केले. एक सल जनतेने व्यक्त केली. की, ज्या राजाने पिंपळगाव खांड, निळवंडे आणि अंबित सारखी अनेक धरणे उभी करून तालुक्याला "पाणी" दिले. त्या व्यक्तीच्या स्वागतासाठी हेलीपॅड तयार करताना कारखान्याने पाणी दिले नाही. तर, जी सुरक्षा यंत्रणा म्हणून अग्निशामक वाहन दिले. त्याचे भाडे घेऊन रितसर पावती दिली.
खरच कल्पनेच्या विश्वात गेल्यावर वाटतं. या कारखान्याला भावना असत्या. तर, त्याच्या काळजाचे पाणी-पाणी झाले असते. एखाद्या सासुरवाशीनी सारखी ती इमारत रडून रडून खिन्न झाली असती. कारण, तिने तिचा बाप सासरहुन अपमानीत होऊन जाताना उघड्या डोळ्यांनी पाहिला. जे "वैभव" याच बापाने उभे केले. ते क्षणात मातीमोल होऊन तेथून परक्या सारखे येणे-जाणे झाले. कदाचित पवार साहेबांच्या देखील डोळ्यांच्या कडा दाटल्या असाव्यात. काल छिन्न विछिन्न पडलेली ही लक्ष्मी आज सौंदर्यांने नटली आहे. याचा मालक मी जरी नसलो. तरी पालक मी आहे. पण, पाहुना म्हणून आलो आणि पाहुना म्हणून चाललोय की काय ? असा प्रश्न त्यांच्या मनाला भेडसावला असेल. त्यांनी जाताना एकदा मागे वळून पाहिले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण प्रेम होते. का कुणास ठाऊन हात उंचाऊन त्यांनी संदेश दिला. धन्यवाद मायभूमी अकोले. सेनापती सोडून गेले. पण, मावळ्यांनी अजूनही किल्ला लावून धरला आहे. मी पुन्हा येईल. असेच काहीसे म्हणत ते चालते झाले. ज्या कारखान्यात साहेबांचा फोटो होता. तो कोण्या कोपऱ्यात खितपत पडला असेल. पण, त्या इमारतीच्या प्रत्येक विटेच्या रुपाने साहेबांना काल निरोप देताना जनसागर गलबलुन गेल्याचे पहायला मिळाले.

आता या खर्चाने कारखाना अजून किती मजली ईमारत बांधणार आहे.? असा प्रश्न निष्ठावंतांनी केला आहे. साहेब येणार होते. त्या रात्री पावसाचे वातावरण तयार झाले. तेव्हा कारखाना व्यवस्थापनाला हेलीपॅडची सुरक्षा करावी वाटली नाही. शेवटी महेश तिकांडे व भाऊसाहेब साळवे यानी रात्री-अपरात्री जाऊन ते ताडपत्रीने झाकले. तेव्हा कोठे दुसऱ्या दिवशी साहेब तेथे उतरू शकले. यश खूप मोठे दिसते. पण, त्यामागे झिजणारे देह कोणाला दिसत नाहीत. ज्या तरुणांनी कधी उभ्या आयुष्यात शेनाला हात लावला नाही. त्यांनी शेनात हात घालून साहेबांच्या निष्ठेचा दाखला दिला. पण, साहेबांच्या दर्शनाची वेळ आली तेव्हा त्यांना स्टेजवर सोडा, जवळ देखील उभे राहु दिले नाही. पोलिसांनी त्यांच्या माना धरुन बाहेर लोटले. पवार साहेबांनी कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून स्टेजच्या पश्चिम बाजुला उभ्या असणाऱ्या हजारो तरुणांना समोर बसण्याची संधी दिली. त्यांचे कौतुकच. पण, गर्दीपेक्षा दर्दी तरुण टाचा वर करुन साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपतांना तालुक्याने पाहिले.एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली. डॉ. लहामटे यांनी या तरुणांची जरा देखील दखल घेतली नाही. जे घाम गाळून काम करीत होते. ते मागेच राहिले आणि जे "चाटूगिरी" करीत फिरले त्यांच्या पाठीवर नेहमी हात पडत राहिला. अर्थात हा "पायंडा" तालुक्याला नवा नाही. ते पिचड साहेबांकडून ४० वर्षे जनतेने अभ्यासले आहे. पण, हवेत गेलेल्यांचा नकाब उतरायला वेळ लागत नाही. हे प्रस्तापित होऊ पाहणाऱ्यांनी विसरु नये. असे जनतेचे मत आहे. सद्या लहामटे साहेब जोरात आहेत. अनेकजन त्यांच्या जवळ आले, त्यांना लुटू पाहिले आणि निघूनही गेले. पण, निष्ठवंत म्हणून जे काम करू पहात आहे. ते खरोखर दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे, यांचीही उद्या काय परिस्थिती होईल हे वेळच सांगेल. परंतु, पवार साहेबांच्या निष्ठेला सद्यातरी "सवतीचा" दर्जा दिला जातोय असे राष्ट्रवादीच्या गोटातून आवाज बाहेर येत आहे. त्यामुळे पवार कुटुंबाने तालुक्याला खूप काही दिले. त्याची जाण लोकांनी ठेवली नाही. मात्र, या कुटुंबासाठी जे कोणी काही करू पहात आहे. तेच उद्या वंचित राहिले. तर कोणाला नवल वाटू नये. असे जाणकारांना वाटते आहे.
पवार साहेब खरोखर धुरंधर राजकारणी आहेत. अजित पवारांची जीब घसरते. मात्र, मोठ्या साहेबांना जे व्यक्त व्हायचे ते वेगळ्या भाषेत होऊन जातात. तालुक्याला ४० वर्षे सत्ता दिली. त्यावेळी त्यांनी काय "गवत" उपटले का ? असा टोला त्यांनी लावला. मात्र, खरे काय म्हणायचे होते. हे "समझदार को एक इशारा काफी हैं" ! त्यामुळे, खरोखर ४० वर्षाच्या प्रेमापोटी साधा एक बुके पवार साहेबांना दिला गेला नाही. ही किती खेदजनक बाब आहे. भलेही त्यांच्यात समोर जायचे धैर्य नाही. पण, कारखान्याचे जबाबदार प्रशासन, जुने पदाधिकारी किंवा कालवर जे साहेब-साहेब नाचवत होते. त्यांचेही धाडस नव्हते का ? भले काही का असेना. पण, आयएएस झालेल्या लेकाच्या भरल्या घरातून बाप उपाशी आणि अपमानित होऊन जावा. अशी परिस्थिती काल तालुक्याने अनुवविली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर निषेधाचे संदेश फिरु लागले आहे.