४० "वर्षे" काय केलं !! फक्त "एकच उदाहरण" तुमची "झांज" उडवेल..!
अकोले (प्रतिनिधी) :-
"विदर्भात" नजर पुरणार नाही. इतक्या दूर-दूर "ओसाड" जमिनी आहेत. का ? तर केवळ "पाणी" नाही म्हणून. हीच परिस्थिती अकोल्यासह संगमनेर, लोणी राहाता, कोपरगाव व नेवासा या तालुक्यांमध्ये असती. पण, साहेबांच्या सहकार्यातून तब्बल २०.७६ टिएमसी पाण्यामुळे ९१ हजार २५१ हेक्टर शेती ओलीताखाली आली आहे. हा विकास नाही तर काय आहे ? याच बळावर उत्तर नगर जिल्ह्याने हरित क्रांती केली आहे. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गेली ३५ वर्षे काय केलं ? याचे एक उदाहरण म्हणून पाणी व शेती हा विषय घेतला. तर, शासकीय अकडेवारी पाहुन विरोधकांनाही प्रश्न विचारताना लाज वाटेल. की साहेबांनी काय केलं.
असा प्रश्न पडणाऱ्या प्रत्येकाने काळजावर कोरून ठेवा. की, राज्यात अहमदनगर आणि त्यात अकोले तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने (१,५०,५०८) सर्वात मोठे आहे. यात राजुर, कोतुळ-ब्राम्हणवाडा, समशेरपूर असे तीन चार तालुके होतील इतकी मोठी गावे आहेत. तितका मोठा निधी येथे उपलब्ध होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी कसा सदन होईल. यासाठी गेली ३५ वर्षात साहेबांनी १२ लघुपाठबंधारे आणि ११ कोल्हापुर पॅटर्न प्रमाणे बंधारे केले आहेत. तर, भंडारदाऱ्याचे संगोपन आणि निळवंड्याच्या धरणात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. तसेच आढळासह तालुक्यात २३.४३ टिएमसी पाण्याचा साठा आहे. त्यातून निव्वळ बंधाऱ्यांचा विचार केला. तर, १७ हजार २२९ हेक्टर जमीन ओलीताखाली आलेली आहे. हीच अकडेवारी भंडारदरा, निळवंडे व आढळा धरणाची मिळून घेतली. तर, १०८,४८० हेक्टर जमीन संगमापर्यंत ओलीताखाली येते.
आता याला तुम्ही विकास म्हणू शकत नाही का ? साहेबांना "जलपुरुष" का म्हणावं हे या माहितीतून अगदी सहज स्पष्ट होते. साहेबांनी ३५ वर्षात लघुपाठ बंधारे मार्फत बोरी-बदगी, पाडोशी, सांगवी, घोटी शिळवंडी, अंबीत, कोथळे, शिरपुंजे, बलठण, टिटवी, वाकी, पिंपळगाव खंड या धरणांची कामे केली. यात २ हजार २६९.८ दशलक्ष घनफुट म्हणजे २.२६९८ टिएमसी पाणी साचते आहे. या परिसरात १३ हजार २९ हेक्टर शेती ओलीताखाली आहे. तर खडकी, शिसवद, साकीरवाडी, पैठण, पाडाळणे, धामनगाव पाट, पिंपळगाव खांब, लिंगदेव, लहित, चास व पिंपळदरी असे ११ कोल्हापुरी कॅनॉल बांधले. त्यात ४०३.२३ दसलक्ष घनफुट पाणी साचते. तर शासनाच्या सर्वेनुसार ३ हजार ९४० हेक्टर जमीनी ह्या या पाण्यामुळे ओलीताखाली येेतात. या व्यतिरिक्त भंडारदरा, निळवंडे व आढळा यांच्यात २०.७६ टिएमसी पाणि साचते. त्या पाण्यात सरासरी २० हजार हेक्टर शेती आलीताखाली येते. त्यामुळे तालुक्यातील २३.४३ टिएमसी पाण्यावर २७ हजार २२९ हेक्टर जामीन पाण्याखाली. येते. त्यामुळे ज्यांना विकास झाला असे वाटत नाही. त्यांनी ही शासकीय अकडेवारी डोळे उघडून पाहिली पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे, शेतीला मुबलक पाणी मिळल्याने जोड व्यावसाय म्हणून दुध उत्पादन सुरु झाले. शेळी, जनावरे, कुकुट पालन असे अनेक व्यावसाय पुढे आले. त्यामुळे अल्पभूधारक का होईना. पण, तो सदन शेतकरी आहे. हे संवेदनशिलता असणाऱ्यांना मान्यच करावे लागेल.
आता विरोधक म्हणतात, पाणि दिले. पण, "वीज" दिली नाही. पण, परंतु "शोकांतीका" आहे की ? विरोधकांना "करून सवरुन, नाव ना "उपकार" अशीच गत झाली आहे. परंतु, जनता पाहते आहे. की, पुर्वी अकोले शहरात १३२ केव्हीचे एकच विद्युत केंद्र होते. त्यावर लोड येत होता. परिणामी शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे, ३३ व ११ केव्हीचे १३ पेक्षा जास्त सबस्टेशन उभे केले. त्यात लिंगदेव, वाघापूर, कोतूळ, कोहने, ब्राम्हणवाडा, आंबड, विरगाव, केळी, शेंडी, शेलविरा, कुंभेफळ अशा अनेक ठिकाणी उपकेंद्र तयार करुन वीज पुरवठा केला. तर मुळा भागात गेल्या पाच वर्षात मवेशी ते कुमशेत, पाडाळणे येथे सबस्टेशन मंजूर करून आणले आहे. आता यात देखील काही प्रस्ताव प्रलंबित आहेत.
इतकेच काय !! वीज वाटप सोडा, निर्मितीसाठी पवनउर्जा, घाटघर प्रकल्प, भंडारदरा, निळवंडे हायड्रो प्रोजेक्ट यांची निर्मिती केली. तसेच तालुक्याला व राज्याला वीज पुरवठा करण्यासाठी सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प आपण हाती घेतला आहे. त्यात घाटघरचा अप्पर व लोअर प्रकल्प यात वीज निर्मिती केली जाणार आहे. ती तालुक्याला व राज्याला विद्युत वितरण करणार आहे. हे केवळ एक उदाहरण म्हणून मांडले आहे. या विकासामुळे मुळा सारख्या विभागात "ट्रॉबेरीचे उत्पन्न" निघू लागले आहे. कालचा "भातशेतीचा" ठपका असणाऱ्या शेतीवर आज पालेभाजांचा बाजार भरु लागला आहे. याला तुम्ही विकास म्हणू शकत नाही. तर, विरोधकांचे डोके ठिकाण्यावर आहे की नाही. ! हाच प्रश्न मला पडला आहे.
क्रमश: भाग २,
पुढील भाग दुपारी
-- सागर शिंदे
आज आत्ता दि.१९ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आयटीआय मैदानावर येणार आहेत. तरी महायुतीचे घटकपक्ष व मतदार बंधू भगिनींनी उपस्थित रहावे अशी विनंती वैभव पिचड साहेब यांनी केली आहे.