"विरोधकांनी" डोळे "झाकून" ओरडून बोलण्यापेक्षा, डोळे "उघडून" विकास पहावा..!!
अकोले (प्रतिनिधी) :-
प्रथमत: माझ्या तमाम "अकोलेकरांना" सप्रेम नमस्कार..! ज्या विरोधकांनी आज माझ्यावर "बिनबुडाचे" आरोप करून "गलिच्छ शब्दप्रयोगाने जनतेची दिशाभूल करू पाहिली. तरी देखील जी जनता माझ्यावर उदात्त अंत:करणाने प्रेम करते आहे. मला पदरात घेत आहे. त्या "मायबापांना" त्रिवार वंदन. मी कसा "घडलो" यापेक्षा मी जनतेसाठी कसा "झटलो" हे सांगण्यात मला जास्त आनंद होईल. सन २००२ साली मी राजकारणात पहिले पाऊल टाकले. "जनतेच्या आशिर्वादाने" निवडून गेलो आणि प्रथमत: समाजकल्याण सभापती पदावर काम करण्याची संधी मला मिळाली. मी माझे "सुदैव" मानतो. की, मला पहिल्याच पावलात "समाज्याचे कल्याण" करण्यासाठी "सुदैवाने" संधी मिळाली. त्याचे "फलित" म्हणून जो उपेक्षित "बेरोजगार" समाज होता. त्यांच्यासाठी शासनाकडून "अॅपे रिक्षा" उपलब्ध करून अगदी खचलेल्या कुटुंबांना उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अपंग व अनाथ व्यक्तींसाठी टपरी देणे, स्वयंपुर्तीसाठी निधी देणे अशा छोट्या-मोठ्या योजना तालुक्यासह जिल्हाभर राबविल्या. यातून उघड्यावरची हजारो कुटुंब स्वत:च्या पायावर उभी राहिली. आणि कालचे विरोधक "तोंडाचे भांडवल" करून विचारतात यांनी काय केलं ? आजवर पिचड साहेब आणि मी जे काही केलं आहे. त्याच बळावर जनतेने आम्हाला पदरात घेतले आहे. नुसता "बोलाचा भात आणि बोलाचीच कढी़" असा "उपद्रव" कधीच केला नाही. मी समाज्याचा "विकास" करताना कधी कोणाची "जात" पाहिली नाही. "छत्रपतींच्या स्मारकापासून" तर "दलित वस्तींच्या निधीपर्यंत" जीतका कस मला लावता आला. तितक्या कसोशीने प्रयत्न मी केला. पण, कधी सत्ता आड आली तर कोठे निधी. त्यामुळे तालुक्याला जे काही मिळेल. ते थोडं-थोडं देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
मला एक गोष्ट प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते. की, अकोले तालुका आणि संगमनेर तालुका यांच्या विकासात नेहमी तुलना केली जाते. मात्र, संगमनेर हे नाशिक-पुणे महामार्गावर आहे. तेथे दळण-वळणाच्या सोई मोठ्या प्रमाणावर आहे. बाजारपेठा जवळ आहेत. या शहराचे क्षेत्रफळ केवळ १७०५ कि.मी आहे. तर अकोल्याचे १५०५०८ इतके आहे. याची कोठे तुलना होते ? संगमनेरात साक्षरतेचे प्रमाण ६५.२९ आहे. तर अकोल्याचे ५९.५६ इतके आहे. दुर्गम भागाच्या तुलनेत ही अकडेवारी अजूनही वाढती आहे. संगमनेरमध्ये पावसाचे प्रमाण ४१६ मिलिमिटर आहे. तर तेच प्रमाण अकोल्यात १ हजार ५८ आहे. कोठे तुलना करता तुम्ही. तुलना करायची असेल. तर, खऱ्या विकासाची करा. दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भाग, असनाताही संगमनेरशी दुधाच्या भावाची तुलना करा, साखरेच्या भावाची तुलना करा. तेथील शेतीखालील क्षेत्र आणि अकोल्याचे क्षेत्र यात किती तफावत आहे. त्याचा आभ्यास करा. सरासरीत अकोल्याचे उत्पन्न पुढे असल्याचे दिसून येते. पण, निव्वळ समोर माईक आला. की, बेंबीच्या देठापासून ओरडायचे आणि "आरोप-प्रत्यारोप" करून जनतेची "दिशाभूल" करायची. हाच विरोधकांचा अजेंडा आहे.
खरेतर मी आमदार झालो आणि पहिल्यापासूनच मला रस्त्यावरची लढाई खेळावी लागली. प्रायव्हेट सेक्टर बंदीसाठी मी पुढाकार घेतला. मंत्री व दुध उत्पादकांच्या फेडरेशनला हाती धरुन दुधाचे दर ३० रुपये करण्यासाठी आग्रह केला. हा प्रश्न शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा नव्हता का ? शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून विधानसभेत आंदोलन केले. तेव्हातर चार महिने मी निलंबित होतो.? कोणासाठी ? मला माझ्या शेतकऱ्यांसाठी मरण आले तरी बेहत्तर. हीच भुमिका तेव्हा होती आणि आजही आहे. पण, विरोधकांनी यायचं आणि काय केलं विचारायचं. त्यांच्या शब्दांना तारतम्य देखील आहे का ? हे जनता पहात आहे. पाच वर्षे विरोधात असतानाही हजार पेक्षा जास्त विकास कामांच्या फाईली मंजुरीस जमा केल्या आहेत. मात्र, विरोधात बसून उदयनराजे भोसले यांच्या पाईली पास झाल्या नाहीत. तर, माझ्या कशा होणार..! सामान्य मानसांच्या प्रश्नासाठी बडे-बडे नेते पक्षबदल करतात. तर, मी कोणत्याही स्वार्थापोटी पक्ष बदललेला नाही. अकोले तालुक्याचा विकास. हेच माझ्या निर्णयाचे प्रांजळ कारण आहे. मात्र, जनतेची दिशाभुल करण्यासाठी नको ते आरोप करायचे आणि आमची प्रतिमा खराब कशी होईल अशी वाच्चता करायची. हाच अजेंडा विरोधकांचा आहे. मी चुकूनही चिखलात दगड मारीत नाही. कारण, तो आपल्याच अंगावर उडून आपल्यालाच खराब करतो. ही नैसर्गिकता आहे. त्यामुळे, ३५ वर्षात काय केले. याचा हिशोब जनतेकडे आहे. ज्यांनी काळे चष्मे घालुन आमदारकीचे स्वप्न पाहिले आहे. त्यांना "विकास" देखील "भकास" दिसेल. वास्तवत: जनतेला माहित आहे. पिचड साहेबांनी किती विकास केला आहे. त्यामुळे त्यांना जनतेने कधी पराभवाला सामोरे जाऊ दिले नाही. १९९५ ला अशीच लाट असताना देखील साहेब ३४ हजार मताधिक्याने निवडून आले. आणि आज २०१९ ला देखील जी कृत्रीम लाट तयार केली आहे. त्यात मी देखील ५० हजारांचे मताधीक्य घेऊन निवडून येईल. याची मला खात्री आहे.
प्रथमत: माझ्या तमाम "अकोलेकरांना" सप्रेम नमस्कार..! ज्या विरोधकांनी आज माझ्यावर "बिनबुडाचे" आरोप करून "गलिच्छ शब्दप्रयोगाने जनतेची दिशाभूल करू पाहिली. तरी देखील जी जनता माझ्यावर उदात्त अंत:करणाने प्रेम करते आहे. मला पदरात घेत आहे. त्या "मायबापांना" त्रिवार वंदन. मी कसा "घडलो" यापेक्षा मी जनतेसाठी कसा "झटलो" हे सांगण्यात मला जास्त आनंद होईल. सन २००२ साली मी राजकारणात पहिले पाऊल टाकले. "जनतेच्या आशिर्वादाने" निवडून गेलो आणि प्रथमत: समाजकल्याण सभापती पदावर काम करण्याची संधी मला मिळाली. मी माझे "सुदैव" मानतो. की, मला पहिल्याच पावलात "समाज्याचे कल्याण" करण्यासाठी "सुदैवाने" संधी मिळाली. त्याचे "फलित" म्हणून जो उपेक्षित "बेरोजगार" समाज होता. त्यांच्यासाठी शासनाकडून "अॅपे रिक्षा" उपलब्ध करून अगदी खचलेल्या कुटुंबांना उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अपंग व अनाथ व्यक्तींसाठी टपरी देणे, स्वयंपुर्तीसाठी निधी देणे अशा छोट्या-मोठ्या योजना तालुक्यासह जिल्हाभर राबविल्या. यातून उघड्यावरची हजारो कुटुंब स्वत:च्या पायावर उभी राहिली. आणि कालचे विरोधक "तोंडाचे भांडवल" करून विचारतात यांनी काय केलं ? आजवर पिचड साहेब आणि मी जे काही केलं आहे. त्याच बळावर जनतेने आम्हाला पदरात घेतले आहे. नुसता "बोलाचा भात आणि बोलाचीच कढी़" असा "उपद्रव" कधीच केला नाही. मी समाज्याचा "विकास" करताना कधी कोणाची "जात" पाहिली नाही. "छत्रपतींच्या स्मारकापासून" तर "दलित वस्तींच्या निधीपर्यंत" जीतका कस मला लावता आला. तितक्या कसोशीने प्रयत्न मी केला. पण, कधी सत्ता आड आली तर कोठे निधी. त्यामुळे तालुक्याला जे काही मिळेल. ते थोडं-थोडं देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
विरोधकांना आमची "चांगली कामे" कधीच दिसली नाही. काय केलं हे प्रश्न ते सहज उत्तरीत करतात. मात्र, "चांगल्या कामांचे" कौतुक करतील. ते "विरोधक" कसले. मला चांगले आठवते आहे. २००१ साली तालुक्यात पाणी-पाणी झाले होते. ओला दुष्काळ पडला होता. जनावरांना चाऱ्याचा प्रश्न पडला होता. आदिवासी भागात अगदी "आणिबानीचा काळ" ओढावला होता. त्यावेळी, साहेब ठाणे जिल्ह्याचे "पालकमंत्री" होते. अगदी मिळेल तेथून चारा, धान्य आणि मुलभूत गरजांचा पुर्तता अगदी तत्काळ आणि मोफत उपलब्ध केली होती. जो प्रत्यक्षात काम करतो. त्याला त्यामागील वेदना माहित असतात. पण, आज विरोधकांचे झाले असे की, "उचलायची जीभ, अन् लावायची टाळुला". पिचड घराण्यावर "अभद्र" बोलायचे आणि जनतेची डोकी "भडकवून" द्यायचे. "सत्तेसाठी" अशा "कुटनितीचे" राजकारण होत असेल. तर अशा "प्रवृत्ती" इतकी "दुर्दैवाची" बाब कोणतीच नसेल.जेव्हा मी "राष्ट्रवादीत" होतो. तेव्हा "पक्षनिष्ठा" म्हणून अगदी तळागाळात पक्षाची "मुळे" रुजविली. जनतेने "पक्षावर" नाही. तर, व्यक्तीश: "विकासावर" प्रेम केले आहे. म्हणून जनतेला "आत्मियता" आहे. जेव्हा माझ्यावर लोकसभेची जबाबदारी टाकली. तेव्हा सहा तालुक्यात दोन्ही वेळी हजारो मताधिक्याचे लिड दिले आहे. तर मी स्वत: २०१४ च्या निवडणुकीत चांगल्या फरकाने निवडून आलो. त्यामुळे जनतेनेे आम्हाला नाकारले. असे जर कोणाला वाटत असेल. तर, तो गोड गैरसमज त्यांनी काढून टाकावा. या वर्षी देखील ५० हजार लिड देऊन, जनला मला विधानसभेत पाठवेल. असा मला "विश्वास" आहे.
हे बोलतात ते बरोबर आहे !! |
आपला
- वैभव पिचड
क्रमश: भाग १, उद्या सकाळी
उद्या दि.१९ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आयटीआय मैदानावर येणार आहेत. तरी महायुतीचे घटकपक्ष व मतदार बंधू भगिनींनी उपस्थित रहावे अशी विनंती वैभव पिचड साहेब यांनी केली आहे.