आ. डॉ. किरण लहामटेंच्या "विजयाचे" खरे "शिल्पकार" कोण ?
अकोले (प्रतिनिधी) : -
गेली ४० वर्षे अकोल्यावर पिचड कुटुंबाचे "निर्विवाद वर्चस्व" होते. ते संपुष्टात आणण्यासाठी सगळे विरोधक "एकवटले" आणि ४० वर्षानंतर "पिचड" पर्वाला "स्वल्पविराम मिळाला. कधी नव्हे असा "इतिहास" घडविण्याचे काम जनतेने जरी केले. तरी, जसे लाखो हात जोडणाऱ्या "मुर्तीचा" कोणीतरी एक "शिल्पकार" असतो. तसेच या विजयाचे देखील "अनेकजण" शिल्पकार आहेत. हा "विजय" कोणा एकाचा नक्कीच नाही. तर, तो "गावपुढाऱ्यांना वैतागलेल्या" जनतेचा आहे. ४० वर्षे "परिवर्तनाची" वाट पाहणाऱ्या "पुरोगामी विचारांचा" आहे. भाजपसारख्या "जातीयवादी" शक्तीच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरलेल्या "डाव्या चळवळीचा" आहे. ज्या जाणत्या राज्याने अकोल्यातील "डोंगराच्या" दरीखोरीत "पाण्याला जिवंत रुप" दिले. त्या राष्ट्रवादीच्या पवारांचा आहे. ज्या आदिवासी समाज्याने विकासाचे स्वप्न पाहिले. त्या "जंगलातील राजाचा" आहे. तर "मरण आले. तरी, शरण नाही" अशा "मार्क्सवादी" विचारांचा हा विजय आहे. ही सगळी "आदिशक्ती" जनतेच्या बाहुत "बळ" देऊन गेली आणि भांगरे, नवाळी, देखमुख व पिचड पर्वानंतर आता "डॉ. लहामटे पर्व" सुरू झाले आहे. हे असेच सहज मिळालेले यश नाही. कारण, "टाक्याचे घाव सोसल्याशिवाय, दगडाला "देवपण" येत नाही". तसेच हा "आमदार घडविताना" अनेकानी किती "घाव" सोसले आहेत. हे त्यांचे त्यांनाच ठाव आहे. त्यामुळे, या "वियजाचे शिल्पकार" कोण !! असा प्रश्न पडला. तर, "बेशक" काही नावे तत्काळ डोळ्यासमोर येतात. तेच खरे या वियजाचे "शिल्पकार" असावेत. असे जाणकारांना वाटते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, सन १९८० साली राष्ट्रपतींनी शरद पवार यांचे "पुलोद" सरकार "बरखास्त" करुन राज्यात "राष्ट्रपती राजवट" लागू केली होती. तर पुन्हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसचे यशवंत भांगरे यांच्या विरुद्ध मधुकर पिचड असा सामना झाला होता. तेव्हा भांगरे फॅक्टरला तोड नव्हती. त्याचे फलित म्हणून पहिल्यांदाच पिचड साहेबांचा पहिला पराभव झाला होता. हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यानंतर १९८० पासून पिचड पर्व सुरु झाले. ते आजवर. इतिहास असे सांगतो. की, गोपाळराव भांगरे, यशवंतराव भांगरे यांच्यानंतर भांगरे कुटुंबातून पिचड साहेबांचा कोणी पराभव करू शकले नाही. १९८० ते २०१९ पर्यंत अशोकराव भांगरे यांनी प्रचंड ताकद पणाला लावली. पण, त्यांना कधीही यश आले नाही. हे वास्तव असले. तरी, २०१९ च्या निवडणुकीत भांगरे हे विजयाचे खरे "शिल्पकार" ठरले आहे. जसा शिवसेनेने "प्रण" केला आहे. एक दिवस तरी आपला "मुख्यमंत्री" करेल. तसा भांगरे कुटुंबाने "प्रण" केला आहे. एकदातरी "पिचडांचा पराभव" करेल. गेली ३५ वर्षे ते शक्य झाले नाही. मात्र, २०१९ मध्ये एक पाऊल पुढे पडले आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात ते स्वप्न पुर्ण होते की नाही. देव जाणे. पण, आज वैभव पिचड यांचा पराभव करण्यात सिंहाचा वाटा भांगरे कुटुंबाचा आहे. असे जनतेला वाटते आहे.
एकास एकनंतर खऱ्या अर्थाने "बहुजन चेहरा" म्हणून भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी यांनी मोलाची भुमिका बजावली. मात्र, जेव्हा अकोल्यात राष्ट्रवादी संपली असे उच्चर निघत असताना. महेश तिकाडे, पत्रकार भाऊसाहेब साळवे, संदिप शेणकर, अमित नाईकवाडी, संदिप भाऊसाहेब शेणकर, ऋषीकेश वैद्य, संतोष नाईकवाडी यांनी अगदी शुन्यातून विश्व निर्माण केले. यातील एक विशेष म्हणजे. हे बहुतांशी कार्यकर्ते वैभव पिचड यांचे समर्थक होते. यांना साहेबांनी साद घातली असती. तर, कदाचित अकोल्यात वेगळी परिस्थिती असती. मात्र, "महायुतीचा फुगा" प्रचंड मोठा होऊन ऊतुंग आकाशात जाऊन फुटला. तेव्हा जवळ आणि पुढे-पुढे करणाऱ्यांपेक्षा सामान्य कार्यकर्त्याची काय किंमत असते. हे वेळ गेल्यानंतर लक्षात आले. याच तरुणांनी पिचड साहेबांना नव्हे.! तर, त्यांच्या परिघाभोवती असणाऱ्या नेत्यांना विरोध करून राष्ट्रवादीची मुहुर्तमेढ रोवली. हे तितकेच खरे आहे. डॉ. नवले, दशरथ सावंत, विनोद हांडे, अशोक भांगरे, डॉ. लहामटे, अमित भांगरे, शांताराम वाळुंज, मारुती मेंगाळ यांच्यासह अनेकांच्या भाषणाने समाज्याची मस्तकं जागी झाली. त्याच बरोबर सोशल मीडियावरील वेगवेगळे स्पोटक लेखक, शब्द-अपशब्दांचा मारा आणि परिवर्तनासाठी असुसलेली जनता. यामुळे हा अनपेक्षित विजय अगदी सहज हाती लागला. हे यश कोण्या एकाचे आहे. असे जर कोणाला वाटत असेल. तर, तो निव्वळ त्याने स्वत:चा केलेला उदोउदो ठरेल. कारण, ही निवडणुक जनतेने हातात घेतली होती. सर्वात पहिला वाटा त्या जनतेचा आहे. नंतर श्रेयवाद लुटू पाहणाऱ्यांचा. असे जाणकारांना वाटते आहे.
थोडक्यात
जेष्ठ नेते अशोकराव भांगरे, सुनिता भांगरे, डॉ. अजित नवले, शिवसेनेचे सतिष भांगरे, मारुती मेंगाळ, मधुकर तळपाडे, अमित भांगरे हे एकास एकचे मानकरी आहेत
संजय वाकचौरे, रवी थोंबांडे, संदिप शेणकर, पोपटराव चौधरी, निलेश गवांदे, संजय लहामटे, विश्वास कोंडार, अजय कानवडे, दत्ता लहामटे हे व्यवस्थापन, नियोजनाचे मानकरी आहेत.
तर, ज्यांच्याकडे बाहेरचे नेते व वक्ते यांच्या संपर्क व त्यांच्या सभांचे नियोजन होते. तसेच पक्षातील वरिष्ठांना नेत्यांच्या संपर्कात राहणे व पक्ष वरिष्ठ टाकतील त्या जबाबदारी पार पडणे. ही सर्वात मोठी जबाबदारी असणारे वैभव लहामटे याचे निकाला दिवशी निधन झाले. त्यांचा या विजयात नगण्य वाटा आहे.
- सागर शिंदे

यापुर्वी नेहमी मतांचे विभाजन होऊन पिचड साहेबांना त्याचा फायदा होत होता. हे टाळून अशोक भांगरे, सौ. सुनिता भांगरे, उमलते नेतृत्व अमित भांगरे, भावी उमेदवार सतिश भांगरे, मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ, तुळशिराम कातोरे अशा अनेकांनी एक होत जी भूमिका घेतली. तेच खऱ्या अर्थाने या विजयाच्या पायाभरणीतील महत्वाचे दुवे आहेत. असे असले. तरी, विनय सावंत यांनी सगळ्यांना एका छताखाली आणण्यासाठी "देवदुतासारखी" भुमिका बजावली आहे. तर, "मरण" आले तरी "शरण" नाही. अशा भुमिकेवर ठाम असणाऱ्या डॉ. अजित नवले यांनी "सीपीएमचे एकगठ्ठा" मतदान राष्ट्रवादीच्या पारड्यात ठेऊन दिले. त्यामुळे, या परिवर्तनाच्या नांदिला गती देण्याचे काम डॉक्टरांच्या मदतीने झाल्याचे बोलले जाते.
एकास एकनंतर खऱ्या अर्थाने "बहुजन चेहरा" म्हणून भानुदास तिकांडे, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी यांनी मोलाची भुमिका बजावली. मात्र, जेव्हा अकोल्यात राष्ट्रवादी संपली असे उच्चर निघत असताना. महेश तिकाडे, पत्रकार भाऊसाहेब साळवे, संदिप शेणकर, अमित नाईकवाडी, संदिप भाऊसाहेब शेणकर, ऋषीकेश वैद्य, संतोष नाईकवाडी यांनी अगदी शुन्यातून विश्व निर्माण केले. यातील एक विशेष म्हणजे. हे बहुतांशी कार्यकर्ते वैभव पिचड यांचे समर्थक होते. यांना साहेबांनी साद घातली असती. तर, कदाचित अकोल्यात वेगळी परिस्थिती असती. मात्र, "महायुतीचा फुगा" प्रचंड मोठा होऊन ऊतुंग आकाशात जाऊन फुटला. तेव्हा जवळ आणि पुढे-पुढे करणाऱ्यांपेक्षा सामान्य कार्यकर्त्याची काय किंमत असते. हे वेळ गेल्यानंतर लक्षात आले. याच तरुणांनी पिचड साहेबांना नव्हे.! तर, त्यांच्या परिघाभोवती असणाऱ्या नेत्यांना विरोध करून राष्ट्रवादीची मुहुर्तमेढ रोवली. हे तितकेच खरे आहे. डॉ. नवले, दशरथ सावंत, विनोद हांडे, अशोक भांगरे, डॉ. लहामटे, अमित भांगरे, शांताराम वाळुंज, मारुती मेंगाळ यांच्यासह अनेकांच्या भाषणाने समाज्याची मस्तकं जागी झाली. त्याच बरोबर सोशल मीडियावरील वेगवेगळे स्पोटक लेखक, शब्द-अपशब्दांचा मारा आणि परिवर्तनासाठी असुसलेली जनता. यामुळे हा अनपेक्षित विजय अगदी सहज हाती लागला. हे यश कोण्या एकाचे आहे. असे जर कोणाला वाटत असेल. तर, तो निव्वळ त्याने स्वत:चा केलेला उदोउदो ठरेल. कारण, ही निवडणुक जनतेने हातात घेतली होती. सर्वात पहिला वाटा त्या जनतेचा आहे. नंतर श्रेयवाद लुटू पाहणाऱ्यांचा. असे जाणकारांना वाटते आहे.
थोडक्यात
जेष्ठ नेते अशोकराव भांगरे, सुनिता भांगरे, डॉ. अजित नवले, शिवसेनेचे सतिष भांगरे, मारुती मेंगाळ, मधुकर तळपाडे, अमित भांगरे हे एकास एकचे मानकरी आहेत
भानुदास तिकांडे, दशरथ सावंत, संपत नाईकवाडी, अजित नवले, विनय सावंत, सुरेश खांडगे, पाटिलबुआ सावंत, अमित भांगरे, मदन पथवे, विनोद हांडे, दिलिप शेणकर, प्रचार यंत्रणेचे शिल्पकार आहेत.
संजय वाकचौरे, रवी थोंबांडे, संदिप शेणकर, पोपटराव चौधरी, निलेश गवांदे, संजय लहामटे, विश्वास कोंडार, अजय कानवडे, दत्ता लहामटे हे व्यवस्थापन, नियोजनाचे मानकरी आहेत.
संकट काळात पक्षाला उभारी देणारे युवा चेहरे पत्रकार भाऊसाहेब साळवे, महेशराव तिकांडे, संदिप शेणकर, अमित नाईकवाडी, संदिप भाऊसाहेब शेणकर, ऋषीकेश वैद्य, संतोष नाईकवाडी यांची अनमोल व दिपस्तंभाची भुमिका आहे.
तर, ज्यांच्याकडे बाहेरचे नेते व वक्ते यांच्या संपर्क व त्यांच्या सभांचे नियोजन होते. तसेच पक्षातील वरिष्ठांना नेत्यांच्या संपर्कात राहणे व पक्ष वरिष्ठ टाकतील त्या जबाबदारी पार पडणे. ही सर्वात मोठी जबाबदारी असणारे वैभव लहामटे याचे निकाला दिवशी निधन झाले. त्यांचा या विजयात नगण्य वाटा आहे.
- सागर शिंदे
==================- सागर शिंदे
"सार्वभाैम संपादक"
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८६ दिवसात १६९ लेखांचे ११ लाख वाचक)