१९७८ च्या "पुलोद" प्रमाणे "शिकॉराम" झाली.!,.तर डॉ."लहामटे" "मंत्री" होतील..!
विजयश्री मिरवणूक...!! |
राज्यात "भाजप-शिवसेनेला", "काँग्रेस राष्ट्रवादीने" कडवे आव्हान देत. चागलीच टक्कर दिली आहे. यात भाजपला १०५, शिवसेनेला ५६, काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५४, मनसे १, अपक्ष २८ असे २८८ उमेदवार निवडून आले आहे. आता जर पारंपारिक पद्धतीने "भाजप-शिवसेना" अशी "युती" झाली. तर, राज्यात नव्याने काही बदल होणार नाही. मात्र, १८ जुलै १९७८ प्रमाणे शरद पवारांनी "काँग्रेसची" साथ सोडून जसे "पुरोगामी लोकशाही दलाची" (पुलोद) स्थापना केली व नवे सरकार स्थापले होते. त्याची "पुनरावृत्ती" झाली. तर, "शिवसेनेला मुख्यमंत्रीपद" देऊन भाजपला बाहेरचा रस्ता दाखविता येईल. असे झालेच. तर, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसे (शिकाँराम) हे चार पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. याचा फायदा अकोल्याला असा होईल. की, जर राष्ट्रवादीला सत्तेत सहभाग मिळाला. तर, पिचड साहेबांच्या "नाकावर टिच्चून" पवार साहेब डॉ. लहामटे यांना किमान "आदिवासी विकास मंत्रीपद" देऊ शकतात.
तर, विजयाचे "शिल्पकार" अशोक भांगरे यांची "विधानपरिषदेवर" वर्णी लागू शकते. आता भाजपच्या अग्रहाने "वैभव पिचड" यांनी जी "ऐतिहासिक" जोखीम पत्करली. त्यास अपयश आल्यामुळे त्यांना "विधानपरिषदेवर घेण्यासाठी आताच प्रयत्न सुरु झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, तालुक्याला एक ना दोन, तब्बल "तीन आमदार" व "एक लालदिवा" मिळू शकतो. ही "एक टक्का" का होईना. शक्यता नाकारता येत नाही. कारण, "राजकारणात" कधी काय होईल. हे सांगता येत नाही. आणि त्यातल्या-त्यात पवार साहेब असतील तर नाहीच नाही.
कसं जुळेल गणित...!! |
१८ जुलै १९७८ चे साल. मला आठवणं सोडा. माझा जन्मच नव्हता. पण, मी अभ्यासले आहे. जेव्हा आणीबाणी उठली तेव्हा महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस विधानसभेला अलिप्त लढल्या. त्यात रेड्डी काँग्रेसला ६९ जागा, इंदिरा काँग्रेसला ६२, जनता पक्षाला ९९, शेतकरी कम्युनिष्ठ पक्ष १३, माकप ०९ व ३९ जागा अपक्ष आल्या होत्या. तेव्हा जनता पक्षाला "बहुमत" सिद्ध करता आले नाही. म्हणून वसंतदादा पाटील यांनी रेड्डी व गांधी यांच्यात एकोपा करुन ७ मार्च १९७८ ला सरकार स्थापन केले होते. तेव्हा पवार साहेब त्यात "उद्याेगमंत्री" होते. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे आणि वसंत दादा याचे टिपन बसत नसे. त्यांना कंटाळून पवारांनी सर्वात मोठी चाल खेळली. आणि त्यावेळी ते ४० आमदारांसह सत्तेतून बाहेर पडले. परिणामी सरकार अल्पमतात आले. वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाहुन पायऊतार व्हावे लागले. त्यावेळी, शरद पवार, सुशिलकुमार शिंदे यांच्यासह सगळ्यांनी मिळून "समाजवादी काँग्रेसची" निर्मिती केली. त्याचे अध्यक्ष दादासाहेब रुपवते यांना केले. या सर्वांनी "जनतादलाशी" बैठक घेऊन म्हणजे, आजच्या "भाजपच्या पाठींब्याने" सरकार स्थापन केले. तेव्हा एस.एम. जोशी यांनी पवारांचे स्वागत करुन मराठा नेतृत्व मान्य केले होते.
हे आत्ता पण होऊ शकतं..!! |
अखेर, १८ जुलै १९७८ रोजी "पवार प्रणित भाजपची सत्ता" महाराष्ट्रात आली. यात समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप व कम्युनिष्ठ पक्ष यांनी मिळून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन करुन वयाच्या ३८ वर्षी पवार साहेब मुख्यमंत्री झाले होते. जर, आज अशी वेळ आली. तर, काँग्रेसने आजच शिवसेनाला साद घातली आहे. रोहित पवार यांचा अदित्य ठाकरे यांना फोन झाला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास प्रचंड इच्छूक आहेत. आता संधी मिळाल्यामुळे ते ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहेत. एकंदर विचार करता. "पुलोद" प्रमाणे "शिकाँराम" ची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे तेव्हा (१९७८) सत्तेसाठी भाजप (जनतादल) चालले होते. आज तशी परिस्थिती नाही. त्यामुळे, झाले तर शिकाँराम हा योग्य पर्याय असू शकतो. असे झाले. तर, डॉ. किरण लहामटे यांना मंत्रीपद मिळू शकते.
भाजपचे वैभव पिचड यांचा पराभव अगदी अल्प मतांनी झाला असता. तर, "विधानपरिषद" एक मार्ग होता. पण, ५७ हजार ६८९ हा अकडा छोटा नाही. तरी, ना. विखे यांनी जोर लावला. तर, दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर पिचड घरात विधानपरिषदेची आमदारकी जाऊ शकेल.
या पलिकडे पवार साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यात अशोक भांगरे यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे, वेळप्रसंगी "एकास एक" करण्याचा मानस आखून संयम बाळगल्याने जनता हा विजय पाहु शकली. त्यामुळे, "आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालेना".! जर पवार साहेबांच्या मनात आले. तर भांगरे देखील विधींमंडळात जातील. असे योग जुळून येतील अशी खूप धुसर आशा आहे. पण, असे झालेच. तर, अकोल्याला सोन्याचे दिवस येतील. यात शंकाच नाही.
- सागर शिंदे
==================- सागर शिंदे
"सार्वभाैम संपादक"
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८६ दिवसात १६९ लेखांचे १० लाख ५० हजार वाचक)