आपलं ते "पोरगं", लोकाचं ते "कारटं"; "विखेंनी" काढलं भाजपचं "दिवाळं"..!!
तो मी नव्हे..! नो ब्लेम प्लिझ.! |
"मुरब्बी" राजकारणी म्हटलं तर नकळत "शरद पवार" यांचे नाव डोळ्यासमोर येते. तर, "कुरघोडीचे" राजकारण असा शब्दप्रयोग होताच ना. विखे यांचे चित्र समोर येते. अशी प्रत्येकाची काही ना काही "आयडेन्टीटी पॉलिटिक्स" असते. असे असले तरी राजकारणात "समाजभिमुख" ओळख असावी. असे जनतेला वाटते. मात्र, ना. राधाकृष्ण विखे पाटील. यांना अशा राजकारणाची सांगड घालता येईना की काय !! असे वाटू लागले आहे. "याला पाडायचं अन् त्याला उभं करायचं"..! "याची आडवायची आणि त्याची जिरवायची"..!! अशी "कुरघोडीची निती" समाजभिमुख कधीच होऊ शकत नाही. याच कारणाने आता काल भाजपचे "किंग मेकर" विखे "पिता-पुत्र" आज एकटे पडल्याचे दिसत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांच्यामागे कोणी नसताना "आख्खी नगर दक्षिण" उभी राहिली. मनात कोणताही किंतू-परंतु न बाळगता सगळ्यांना अगदी शिताफीने काम केले. तेव्हातर डॉ. विखेंच्या मागे, "दस्तुरखुद्द" पिताश्री व मातोश्री देखील नव्हत्या. तरी ते अडिच लाख मतांच्या लिडने निवडून आले. असे असताना देखील जिल्ह्यात एक ना दोन तब्बल सहा उमेदवार पराभूत व्हावेत..!! ही किती मोठी "शोकांतीका" आहे. म्हणजे "आपलं" ते "पोरगं" लोकाचं ते "कारटं" असेच काहीसे समजून की काय..!! सगळ्यांच्या "पराभवाला सहाय्य" केले. असा "आरोप" त्यांच्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे "पराभूत" झालेल्या नेत्यांनी थेट मुंबई गाठून विखेंची कागाळी केली आहे. त्यांना "मंत्रीपद" देऊ नये. अशी देखील विनंती केल्याचे बोलले जात आहे.
खरंतर मुलास "तिकिट" मिळाले नाही. म्हणून पाटलांनी चक्क "काँग्रेस" साेडून "भाजपत प्रवेश" केला. "विरोधीपक्षनेत्याचा" मुलगाच "सत्ताधाऱ्यांत" गेला. हे जनतेला थोडफार "पचलं" असतं. पण, "विरोधीपक्षनेताच" सत्तेत गेला. हे अगदी न "पचण्यासारखे" होते. हा प्रकार कोण्या "राजा- राणीच्या" किंवा "अकबर-बिरबलाच्या" गोष्टीतील "कथा" नाही. तर, हे "अविश्वसनिय वास्तव" याच महाराष्ट्राच्या मातीत घडले असून, त्याची इतिहासाने नोंद घेतली आहे. जेव्हा शरद पवार यांनी डॉ. सुजय विखे यांच्यासाठी नगर दक्षिण लोकसभेची जागा सोडायची नाही. असे म्हणत "बालहट्ट" पुरविला नाही. तेव्हा असे वाटले होते. की, "संग्राम जगताप" व डॉ. विखे" यांच्यात काट्याची टक्कर होईल. पण, सगळा निकाल एकतर्फी लागला आणि जिल्ह्यात भाजपचं राज्य आलं. मुलगा खासदार, पत्नी झेडपी अध्यक्षा आणि साहेब स्वत: गृहनिर्माण मंत्री. या साम्राज्यामुळे त्यांचा फुगा हावेत गेलेे आणि उद्याच्या विधानसभेत १२-० असा इतिहास घडवू. अशी घोषणा त्यांनी केली.
अर्थात जो व्यक्ती खा. लोखंडे आणि खा. डॉ. सुजय विखे यांना निवडून आणू शकतो. तो काहीही करु शकतो. अशी धारणा सामान्य मानसांची का होऊ शकत नाही ? त्या बळावर अनेकांनी विखे नावाचा धसका घेतला होता. राष्ट्रवादीच्या नाकावर टिचून भाजपच्या डॉ. सुजय विखेंना खासदार करण्यासाठी काँग्रेसचे राधाकृष्ण विखे हे प्रस्तापित आमदाराच्या दारोदार रात्री-अपरात्री फिरत होते. त्यामुळे ज्या राम शिंदे यांनी पालकमंत्री असताना अगदी प्रांजळपणे विखेंचे काम केले. त्यांना पराभवाला समोरे जावे लागले. विजय औटींसारखा विधानपरिषदेचा उपाध्यक्ष पराभूत होतो. इतकेच काय ! तर, ज्या नगर शहरात संग्राम जगताप आमदार असताना देखील विखेंना अवाजवी लिड मिळाले. त्याचे "शिल्पकार" अनिल राठोडांचा देखील पराभव झाला. याहुन दुर्दैव असे की, नगर तालुक्याचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई संग्राम जगताप उभे असताना देखील त्यांनी विखेंना साथ दिली व निवडून आणले. तरी देखील कर्डीलेंना पराभवाला सामोरे जावे लागले. इतका "इन्ट्रेस्टेड किस्सा" नगर दक्षिनेतून पहायला मिळाला. म्हणजे, मुलगा निवडून आल्यानंतर त्यांची जबाबदारी पुर्णपणे संपली. असेच काहीसे वागणे. त्यांच्याकडून परावर्तीत झालेले दिसल्याचे बोलले जात आहे.
मलाही कडक टोपी घातली..! |
उत्तरेचा विचार केला. तर, वैभव पिचड हे राष्ट्रवादीकडून नेहमी अगदी डोळेझाकून निवडून येत असे. पण, विखेंनी त्यांना "कैलाशपतीच्या" मार्फत घोड्यावर बसविले आणि भाजपात आणून मंत्री होण्याचे स्वप्न दाखविले. अखेर, होत्याचे नव्हते झाले आणि आज त्यांच्यावर रडकुंडीचे वेळ आली आहे. जर प्रवेशानंतर विखेंनी लक्ष घातले असते. तर, "अशोक" चक्र फिरविण्यात त्यांना यश आले असते. मात्र, विखे कुटुंब पिचड कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभेच राहिले नाही. परिनामी त्यांना खूप मोठा पराभव पत्काराला लागला. असे बोलले जात आहे.संगमनेरात बलाढ्य बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात त्यांनी दंड थोपटू पाहिले. विखे नावाचा अवडंबर उभा केला खरा. पण, प्रत्येक्षात विकामुद्दे दिले सोडून आणि व्यक्तीद्वेषाने डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर प्रचारात शरद पवार यांनाच अजेंड्यावर घेतले. त्याचे फलित म्हणून की काय !! संगमनेरकरांनी थारोतांच्या पदरात ६३ हजारांचे लिड दिले. कोपरगावात तर भाजपच्या विरोधात भाजपचा उमेदवार उभा राहिला. त्यांची मनधरणी करण्यात विखेंना अपयश आले. नेवाशात "जय हरी" मुरकुटे यांना देखील विखेंकडून पाठबळ मिळाले नाही. तर आज गडाख यांना घेऊन विखे पाटील मुंबईकडे गेल्याचे समजले आहे. आता, जर गडाख विखेंच्या बोटाला धरुन भाजपत गेले. तर, पाच वर्षे ठिक आहे. त्यानंतर त्यांचे वैभव पिचड होईल. असे जाणकारांना वाटत आहे.
थांबा आता..! |
एकंदर विचार करता. विखेंनी सगळे विरोधक व स्पर्धक संपविल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात १२-० करण्याच्या नादात आख्खी बीजेपी शुन्य केल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी, याचे पडसाद येणाऱ्या लोकसभेला दिसून येतील. विखेंमुळे भाजपला आच्छे दिन येण्याऐवजी बुरे दिन आल्याचे बोलले जात असून त्यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर अनेकांचं दिवाळं काढल्याची चर्चा सद्या जोरदार रंगली आहे. सद्या भाजपच्या यादीत मंत्रीपदासाठी त्यांचे नाव आहे. पण, कुरघोडीचे राजकारण करून त्यांनीच खेळ खेळले. म्हणून त्यांना मंत्रीमंडळात घेऊ नये. अशी कागाळी भाजपच्या पराभूत सैन्यांनी केली आहे. त्यामुळे, आता एकटे पडलेल्या ना. विखेच्या संदर्भात मुख्यमंत्री काय भुमिका घेतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
- सागर शिंदे
==================
- सागर शिंदे
"सार्वभाैम संपादक"
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ९० दिवसात १७५ लेखांचे ११ लाख वाचक)