...तर अकोल्यातून शिवसेना कायमची संपेल..! सतिश नवलेंचे शिवसैनिकांना पटेल असे मत.!

सतिश नवले 

अकोले (प्रतिनिधी) :-
          प्रिय "शिवसैनिक" मित्रांनो.!
         "जय महाराष्ट्र, जय शिवराय"
        मला माहित आहे. मी विचारांनी फारसा "प्रगल्भ" नाही. मात्र, तितका "अज्ञान" देखील नाही. हे ही तितकेच खरे आहे. ज्या "वंदनिय" बाळासाहेबांनी "घनदाट" जंगलातल्या "वाघासारखी डरकाळी" फोडून गावा-गावात जे "छावे" तयार केले. त्यांची "सर्कशितल्या वाघांसारखी" आवस्था होताना मला पाहवत नाही. होय..! मला माहित आहे. मी एक जबाबदार व्यक्ती आहे. त्यामुळे, अनेक शिवसैनिकांना ही असली वाक्य रुचतीलही. पण, "भाजप" आणि "राष्ट्रवादीच्या" नादानं आपले "शिवसैनिक" वापरले जातील. आणि कालच्या "कम्युनिष्ट" (सीपीआय) चळवळीसारखी उद्या "शिवसेना" देखील संपून जाईल. हे उद्याचे "वास्तव" आज डोळ्यासमोर दिसत आहे. गेली अनेक वर्षे आपण तालुक्यात संघर्ष करून भगवा उभा केला. पण, आज तीच ताकद विभागलेली दिसून येत आहे. कदाचित, उद्या कोणी काळाच्या ओघात "घड्याळ" पसंत करेल तर कोणी "कमळ". पण, नकळत या तालुक्यात पुन्हा कधीच "वाघाची डरकाळी" कानी पडणार नाही. याची मला "भिती" वाटते आहे.  कारण, हा सतिश नवले "राजकारणी" नाही. तर "निष्ठावंत शिवसैनिक" नक्कीच आहे. गेली कित्तेत दिवस मी "मनाला" आवर घातला होता. पण, "परिवर्तनाच्या" नावाखाली "शिवसैनिकांचे वेशांतर" होईल. यावर मी "ठाम" झालो आहे. म्हणून "अबोल" शब्दांना मी "बोलते" करतो आहे.
          मित्रांना..! तुम्हाला एक साधे उदाहरण देतो. म्हणजे माझा "मुळ मुद्दा" तुमच्या लक्षात येईल. थोडी इतिहासाची पाने जर चाळली. तर, लक्षात येईल. की, तो काळ १९४६ च्या दरम्यानचा असावा. "बुवासाहेब नवले" यांनी अकोल्यात "भारतीय कम्युनिष्ट पार्टीला" (सीपीआय) जन्म दिला. तेव्हातर "शिवसेना" उगमाच्या शंका देखील कोणाच्या मनात उत्पन्न झाल्या नसाव्यात. तेव्हा हा "सीपीआय" पक्ष देशावर "राज्य" करू पहात होता. एव्हाने काही राज्यात "बाप" होता. आता देशाचे सोडा. पण, अकोल्यात देखील अनेक ठिकाणी "सत्तेचे दावेदर" म्हणून "सीपीआयचा" दबदबा होता. अगदी आजच्या शिवसेनेसारखा. पण, दुर्दैव असे की, या पक्षाच्या "वरिष्ठ पातळीने" काँग्रेस सोबत "वाटाघाटी" केल्या आणि नकळत तालुका पातळीवरील "संघर्ष" संपुष्ठात आला. परिनामी स्थानिक "नेते व कार्यकर्ते" सीपीआयमध्ये राहुन सत्तेत सहभाग घेण्यापेक्षा थेट काँग्रेसमध्ये "विलीन" झाले आणि हळूहळू हा पक्ष येथून जवळ-जवळ "हद्दपार" झाला किंवा त्याची ताकद "क्षीण" झाली . अगदी "सेम परिस्थिती" आज अकोल्यात झाली आहे. वरिष्ठ स्तरावर अकोल्याची जागी भाजपला सोडली गेली आणि "शिवसैनिक सैरभैर" झाले. कोणी "वैभव पिचड" यांच्याकडे गेले. तर, कोणी "डॉ. किरण लहामटे" यांच्याकडे गेले. या कारणास्तव मला प्रचंड "अस्वस्थता" जाणू लागली आहे. एकतर मच्छिंद्र धुमाळ यांनी ही सगळी मोट बांधून ठेवण्यासाठी सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. सगळे पदाधिकरी आणि तळागाळातील शिवसैनिकांना विचारायला हवे होते. त्यामुळे, लोक नाराज झाले नसते आणि एका छताखाली राहिले असते. पण, आज "सेनापती" गेले पण, "सैनिक" मागेच राहिल्याचे दिसते आहे. तो फायदा तोटा कोणाला होईल मला त्याबद्दल घेणे-देणे नाही. मात्र, उद्या ज्याला यश मिळेल. त्यांच्या प्रभावाखाली शिवसैनिक पक्षांतर करेल. एक ना दोन असे हजारो तरुण  पक्षातून निघून जातील आणि काल तालुक्यात डरकाळी फोडणार "शिवसेना" पक्ष उद्या "सीपीआय" सारखा "इतिहास जमा" होईल. याचे पुढे काय होणार, हे आजच मला दिसू लागले आहे. म्हणून "अंधभक्तीच्या" मागे न जाता. "युतीधर्म" पाळून शिवसेनेचा "श्वास आणि अस्तित्व" आपण राखावे असे मला वाटते.

याला म्हणतात निष्ठा !!

      आज गावा-गावातील "शिवसैनिक" नाराज आहे. त्यांना दोनच गोष्टी माहित आहे. एकाला पाडणे आणि दुसऱ्याला निवडून आणणे इतकेच डोक्यात आहे. पण, या दोघांच्या नादात शिवसेना संपून जाऊ शकते. हे तुम्ही विसरू नका. असे झाले. तर, स्वार्गीय "बाळासाहेब" तुम्हाला माफ करणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. "शिवसेना" जिवंत ठेवण्यासाठी ४७ हजार "शिवसैनिकांनी" कधी अशोक भांगरे यांना साथ दिली. तर, कधी मधुकर तळपाडे यांच्या पाठीशी ऊभे राहुन "जय भवानी, जय शिवाजींचा" नारा देऊन "सह्याद्री" हलविला आहे. त्यामुळे कोणी "पिचड" घराणे हे आपले वैर नाही. तर, पहिली "पक्षनिष्ठा", नंतर "व्यक्तीप्रेम" म्हणून, आज जे "शिवसैनिक" पिचड साहेबांच्या सोबत आहेत. ते उद्या युती तुटली. तर, तत्वाने बाहेर पडतील आणि त्याच जोमाने पुन्हा प्रस्तापितांशी शह देतील. पण, यदा कदाचित आज जे "कट्टर शिवसैनिक" राष्ट्रवादीत गेले आहेत. ते पुन्हा शिवसेनेत येणार नाहीत. हे चित्र यश अपयशात सिद्ध होईल. स्पष्टच सांगायचे ठरले. तर, डॉ. लहामटे निवडून आले. तर, तालुक्यात आज जी ५० टक्के शिवसेना आहे. ती २० ते २५ टक्क्यावर येईल. याच उलटपक्षी वैभव पिचड निवडून आले. तर, एकही शिवसैनिक कमी होणार नाही. ऐनवेळी पुढील पंचवार्षीकला भाजपला शह द्यायची वेळ आली. तरी, काट्याची टक्कर देऊन अकोल्यात भगवा फडकविण्याची ताकद कायम राहु शकते. म्हणून पक्ष मोठा. की, भगव्याची अस्मिता !!,  बाळासाहेब मोठे. की, निष्ठा आणि अकोल्यात  भगवा सन्मानाने फडकवायचा की पाडायचा..!! हे आपणच ठरवावे. असे मला वाटते. एकीकडे डॉ. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलय, तर दुसरीकडे बाळासाहेबांनी स्वाभिमान. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परिने निर्णय घ्यावा. जशी आई आपल्या मुलास उध्वस्त होताना पाहु शकत नाही. तसे मला अकोल्यातून उद्याची शिवसेना उध्वस्त होताना दिसते आहे. म्हणून, मी जे  काही मांडले आहे. ते अगदी, आत्मियतेने व्यक्त केले आहे. कारण, मला कोणाच्या "विजय आणि पराजयापेक्षा" माझा पक्ष श्वासाहुन प्रिय आहे. 

दोन सतिश एक निर्णय,
अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठावंत



         आता मी मच्छिंद्र धुमाळ व बाजीराव दराडे, मारुती मेंगाळ यांच्या वादात पडणार नाही. महेश नवले, माधवराव तिटमे यांच्यासह अनेकांवर शब्दांकन करणार नाही. पण, हो..!! इतक्या कठीण परिस्थितीत, सतिश भांगरे आणि मधुकर तळपाडे यांनी भुमिका भलेही शांततेची घेवो. पण, पक्ष आणि "भगव्याशी गद्दारी" केली नाही. म्हणून त्यांना जय महाराष्ट्र..!! मला खात्री आहे. तालुक्यातील शिवसेनेचा कम्युनिष्ट (सीपीआय) होऊ नये. यासाठी तळागाळातील  "शिवसैनिक" मातोश्रीचा "आदेश" पाळेल. जीव गेला तरी भगवा खाली पडू देणार नाही.
    जय महाराष्ट्र    
    जय शिवराय
सतिश नवले (माजी शिवसेना शहरप्रमुख) यांची विशेष मुलाखत


-- सागर शिंदे

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 
              - सागर शशिकांत शिंदे   
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८२ दिवसात १६४ लेखांचे ९ लाख ८२ हजार वाचक)