*"पुरोगामी" आणि "डाव्या चळवळीची; राजकीय दंगल"; तालुक्याचा "श्वास गुद्मरला" !! पिचड, डॉ. लहामटे व दिपक पथवेंचा अर्ज दाखल
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोले तालुक्यात दिवसेंदिवस राजकीय वातावरण प्रचंड तापताना दिसत आहे. कार्यकर्त्यांची कधी नव्हे इतकी फरपट झाली असून तालुक्यात एक प्रकारची राजकीय आणिबाणी घोषीत करण्याची वेळ आली की काय ? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. पुरोगामी आणि डाव्या चळवळीचा तालुका राजकीय द्रुष्ट्या "नक्षलीपेक्षा" भयानक झाल्याचे बोलले जात आहे. एक सर्वात "खेदात्मक" बाब म्हणजे, जातीय दंगली आणि सामाजिक अस्थिरतेमुळे नगर शहर, मालेगाव, भिवंडी, औरंगाबाद अशी ठिकाणे "प्रचलित" आहेत. मात्र, अकोल्याची "खासियत" अशी की, येथे हिंदू-मुस्लिम दंगली नाहीत. तर, कम्युनिष्ट, डाव्या चळवळीचे आणि कालचे पुरोगामी हे आज एकमेकांना गेंड्यासारखे भिडू लागले आहे. ते वैचारिक तत्वावर नाही. तर राजकीय फडातील रंगबाजी उधळविण्यासाठी. त्यामुळे, हा तालुका पुरोगामी आणि डाव्या चळवळीचा आहे. असे जर कोणी म्हटले. तर, एखाद्या जाणकाराने त्याच्या कानाखाली जाळ काढला. तरी कोणाला वाईट वाटू देऊ नका. अशा प्रतिक्रिया समाजातून उमटू लागल्या आहेत.
खरे पाहता. या सगळ्यात महायुती प्रवाहात गेले नाही. त्यांची मोठी गोची होणार आहे. भांगरे व लहामटे यांनी त्यांचे काही का होईना "राजकीय स्थैर्य" निर्माण केले आहे. मारुती मेंगाळ हे काही का होईना उपसभापती आहेत. यांनी खऱ्या अर्थाने व्यक्तीद्वश बाळगून "पिचड नको, म्हणजे नको." अशी भुमिका घेतली. त्यात सर्वात अलिप्त आणि सडेतोड निर्णय घेतला तो म्हणजे सतिश भांगरे यांनी. त्यांची भुमिका अद्याप स्पष्ट केली नाही. ते शिवसैनिक असून देखील शिवसैनिकांच्या पावलावर पाऊल न ठेवता. व्यक्तीद्वेशाने "पिचड नाही म्हणजे नाही" असाच नारा दिला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेता. पिचडांचे सर्व कट्टर स्पर्धक एकवटले असून सगळ्यांनी दंड थोपटले आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात राजकीय रंगबाजी पहायला मिळणार. यात शंका नाही. असे बोलले जाते.

काल जो अकोले तालुका निसर्गाच्या कुशित बसून शुद्ध श्वास घेत होता. आज त्याच तालुक्याचा श्वास "राजकीय दुर्गंदीमुळे" गुद्मरु लागला आहे. आज एकाच दिवशी भाजप, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रिपाईने मेळावा आयोजित करून या सर्वांनी "गुरूवारचा बाजार" भरविला. त्यामुळे कालचा "पुरोगामी" आज "अधोगामीकडे" चालला आहे की काय ? अशी टिका होऊ लागली आहे.कालपर्यंत वैभव पिचड साहेब राष्ट्रवादीत होते. तोवर अन्यत्र पक्षांनी अगदी "गळे" फाडून "गुप्त प्रचार" आणि "अपप्रचार" केले. युती जोवर होत नव्हती तोवर भाजप जातीयवादी पक्ष होता. आता सर्व अलबेले झाले तर, साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसायला गोड वाटू लागले आहे. ही पक्षनिष्ठता म्हणायची की, व्यक्तीनिष्ठता ? छे ..! यातले काहीच नाही. हे केवळ "फ्लेक्झीबल" राजकारण म्हणावे लागेल. जीकडे "मलिदा तिकडे पलिदा" हेच ठराविक लोकांचे राजकारण आपण पाहिले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष पिचडांना विरोध म्हणून ज्यांनी राजकीय रंगमंच गाजविले. ते आज भाजपच्या स्टेजवर "ता-था-थै-या" करताना दिसून आले. त्यामुळे ज्यांनी पिचड साहेबांना वर्षानुवर्षे अंतर्गत सहकार्य आणि वरवर विरोध केला. त्यांचे "नकाब" आज उतरल्याचे दिसून आले. कारण, महायुतीने बरेच काही चित्र बदलून टाकले आहे. यात कौतुक गुप्तहेरांचे नाही. तर, पिचड साहेबांचे करायला हवे. ज्यांनी भाजपत प्रवेश करून महायुतीच्या माध्यमातून अशोकराव भांगरे, सौ. भांगरे आणि डॉ. किरण लहामटे यांची कोंडी केली. तर उल्लेखनिय कामगिरी म्हणजे शिवसेनेत असणाऱ्या परंतु उघड-उघड साथ देऊ न शकणाऱ्यांचे प्रश्न आज कायमचा मार्गी लावला. आता यातील ठराविक लोक कारखान्याचे पुन्हा ठेकेदार होतील, ठराविक पुन्हा झेडपी आणि पंचायत समिती, बाजार समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकप्रतिनिधी होतील. ग्राऊंड लेवलच्या कार्यकर्त्यांचे निवडणुक काळात भेळ, मिसळी आणि वडापाची मौजमजा होईल. पण, पाच वर्षात त्याच्यावर काही बला आली. तर, नेत्यांचा फोन आऊट आॅफ कवरेज लागेल. यात शंका नाही.
खरे पाहता. या सगळ्यात महायुती प्रवाहात गेले नाही. त्यांची मोठी गोची होणार आहे. भांगरे व लहामटे यांनी त्यांचे काही का होईना "राजकीय स्थैर्य" निर्माण केले आहे. मारुती मेंगाळ हे काही का होईना उपसभापती आहेत. यांनी खऱ्या अर्थाने व्यक्तीद्वश बाळगून "पिचड नको, म्हणजे नको." अशी भुमिका घेतली. त्यात सर्वात अलिप्त आणि सडेतोड निर्णय घेतला तो म्हणजे सतिश भांगरे यांनी. त्यांची भुमिका अद्याप स्पष्ट केली नाही. ते शिवसैनिक असून देखील शिवसैनिकांच्या पावलावर पाऊल न ठेवता. व्यक्तीद्वेशाने "पिचड नाही म्हणजे नाही" असाच नारा दिला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेता. पिचडांचे सर्व कट्टर स्पर्धक एकवटले असून सगळ्यांनी दंड थोपटले आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात राजकीय रंगबाजी पहायला मिळणार. यात शंका नाही. असे बोलले जाते.
-- सागर शिंदे
उद्यापासून वाचा शिवसेनेचे युवा नेते सतिश भांगरे यांची धक्कादायक विशेष मुलाखत..!!
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७६ दिवसात १३४ लेखांचे ७ लाख ५० हजार वाचक)