"प्रस्तापितांनी आंबेडकरी जनतेला वापरून घेतले...!! पण, इथून पुढे यादराखा"..!!
विजय वाकचौरे सर |
नगर जिल्ह्याची पुरोगामी म्हणून ओळख आहे. मात्र, दुर्दैव असे की, येथे नितीन आगे (खर्डा), सोनई हत्याकांड, सागर शेजवळ, अमोल वाघमारे, राहुल शिंदे अशी अनेक हत्याकांड घडतात आणि ते दडपलेही जातात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे. अॅट्रोसिटीच्या नावाने अर्धवट माहितगर टेंभा मिरविताना पाहिले आहे. पण, हे कोण घडवून आणतात. या पडद्यामागचे व्हिलन कोण आहे. याची चौकशी कधी कोणी करत नाही. तेथे तालुक्यातील पुढारी राजकीय आकसापोटी या गुन्ह्याला हत्यार करीत असल्याचे अनुभव मी घेेतले आहे. आणि याच नावाखाली समाज बदनाम होताना मी पाहिला आहे. खरंतर जेव्हा रामदास आठवले साहेब यांनी शिर्डीतून खासदारकी लढण्याचा निर्णय घेतला. तेव्हा याच काँग्रेसच्या नेत्यांनी वावड्या उठविल्या होत्या. की, आठवले साहेब इकडे खासदार झाले तर स्थानिक दलित लोक. अॅट्रॉसिटी दाखल करतील. हा अपप्रचार गावोगावी फिरविला गेला.
इतकेच काय तर काँग्रेसने त्यांची अंतर्गत यंत्रणा विरोधात उभी केली होती. त्यामुळे, साहेबांना जी मते मिळाली ती व्यक्तीश: आंबेडकरी चळवळीची होती. साहेबांचा पराभव त्यांच्या जिव्हारी तर लागलाच. मात्र, आम्हा कार्यकर्त्यांच्या बदनामीचे षड़यंत्र या प्रस्तापितांनी उभे केले. याला प्रतिउत्तर म्हणून दुसऱ्यावेळी रिपाईने ताकत पणाला लावली आणि ज्यांनी आठवले साहेबांचा पराभव केला. त्यांचा रिपाईनेच पराभव केला. तेव्हा खऱ्या अर्थाने आंबेडकरी जनतेची ताकद दिसून आली. त्यानंतर संयमी आणि राजकीय भविष्यचे जनक म्हटले तरी चालेल. अशा आठवले साहेबांनी शिवसेना भाजपशी युती केली आणि खऱ्या अर्थाने काँग्रेस-राष्ट्रवादीला असे चितपट केले. की, उभे रहायला देखील अजून २० ते २५ वर्षे जातील. यात शंकाच नाही.
याच कारणामुळे हे दोन्ही पक्ष रिपाईच्या द्वेशात होते. त्यामुळे त्यांनी आजवर दलित जनतेला सत्तेपासून दुर ठेवण्याचे काम केले. मात्र, बाळासाहेब थोरात वगळता काँग्रेस राष्ट्रवादी राहिली कोठे ? हे तेच पुर्वाश्रमीचे जातीयवादी पुन्हा भाजपला येऊन मिळाले आहेत. याचे पक्ष बदलले आहे. मात्र, त्यासोबत विचारसारणी बदलली तर बरे !! नाहीतर, येरे माझ्या मागल्या. असेच काहीसे वातावरण पहायला मिळेल.तसेही आत्ता देखील प्रस्तापितांनी अलिकडच्या काळात रिपाईला दुर्लक्षीत केल्याचे खासदारकीतून दिसून आले आहे. सत्तेतील सहभाग असेल. किंवा निवडणुकांमध्ये सोबत घेण्याचा निर्णय असेल. यात नेहमी रिपाई बाबात मापात पाप केले आहे. याबाबत खुद्द आठवले साहेबांनी लक्ष घालणे आवश्यक असल्याचे कार्यकर्त्यांना वाटते. कारण, देशात आणि राज्यात रिपाईची युती आहे. साहेबांना सोडून कार्यकर्ते बाहेर पडायला तयार नाहीत. मात्र, निवडणुकीत प्रस्तापित नेते, दलित कार्यकर्त्यांना विचारायला तयार नाहीत. त्यामुळे ग्राऊंड लेवलच्या कार्यकर्त्यांची मोठी घुसमट झाल्याचे अनेकदा पहायला मिळते. परिणामी कोठेतरी तडजोड करून अखेर मत विकलेही जाते. पण, प्रेमाने बोलावून सन्मानाने वागणूक दिली. तर, जय भीम बोलो और किधरभी चलो. हाच नारा सामान्य कार्यकर्त्यांचा असतो. हेच वास्तव आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीने आठवले गटाचे नेहमी हाल केले आहे. १९८९ च्या दरम्यान गांधी कुटुंबाने रामदास आठवले यांची इच्छा नसताना त्यांना शरद पवारांकरीव राजकारणात आणले आणि गवई यांना पर्याय उभा करून समाजकल्याण व परिवहन मंत्री केले. तेव्हा आठवले साहेबांचा प्रचंड मोठा दबदबा होता. ते पवारांना म्हणत होते. की, मला समाजकारण करूद्या, मी किंग मेकरच्या भुमिकात योग्य आहे. मात्र, काँग्रेसची चाल ही एक्याला लागलेली किडच म्हणावी लागेल. त्यांनी समाज्याला निव्वळ झुलवत ठेवले. दलीतांच्या आस्मितेचे प्रश्न त्यांनी कधीच सोडविले नाही. ईंदुमिल, रोजगार, हक्क संरक्षण ते दलित अत्याचार यावर केवळ आश्वासने मिळत गेली. त्यामुळे, समाज प्रचंड नाराज होता.
या जिल्ह्याचे एक महत्वपुर्ण वैशिष्ट म्हणजे. गेली अनेक वर्षे येथे रिपाईला पर्याय म्हणून प्रबळ पक्ष उभा राहिला नाही. तर रिपाईत बाबासाहेबांच्या स्वप्नानुसार सगळ्या जातीचे लोक प्रतिनिधित्व करीत असे. शेती, पाणी, शिष्यव्रुत्ती, मराठा आरक्षण, मंडल आयोग, जमीन अशा अनेक प्रश्नांसाठी रस्त्यावरचा संघर्ष आम्ही लढला आहे. कधी कॉलेजला दादासाहेब रुपवते नाव द्यायचे. तर कधी सीपीआय, सीपीएम सोबत शेतकऱ्यांचा पाणी व पीक प्रश्न रस्त्यावर मांडायचा. त्यातून सर्वव्यापी आरपीआय उभी करण्याच प्रयत्न मी केला होता. मात्र, दुर्दैव असे की, ज्या दादासाहेब रुपवते यांनी अगस्ति साखर कारखान्याची उभारणी केली. त्यांची ना जयंती ना पुण्यतीथी होते. इतकेच काय, सभाग्रुहात फोटो देखील लावण्यात आलेला नाही. अकोले तालुक्यात दलित चळवळीतून दादासाहेबांचे खूप मोठे योगदान आहे. त्यावर मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी आजवर राजकारण केले आहे. त्यात, निळवंडे धरण, अगस्ति साखर कारखाना, कॉलेज, अकोले पूल अशी अनेक कामे आहेत. मात्र, दुर्दैव असे की, या तालुक्याला रुपवतेंचा विसर पडला आहे. या जिल्ह्यात रिपाईची ताकत मोठी आहे. त्याकडे प्रस्तापितांना अदखलपात्र नजरेने पाहले तर उद्याच्या काळात त्यांचे हे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे सत्तेत असणाऱ्यांनी आम्हा पुढाऱ्यांना सोडा. पण, कार्यकर्त्यांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. अन्यथा प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवून देऊ.
(शब्दांकन)
- सागर शिंदे
हा लेखाबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहे. त्या विजयराव वाकचौरे साहेब यांच्याशी शेअर करा. मो. नं. ९५७९१५२८०२
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७६ दिवसात १३४ लेखांचे ७ लाख ५० हजार वाचक)