"कुत्र्याहुन" राजकारण पेटलं, "धुमाळांचा" मेंगाळ व दराडेंना "कडकडून चावा"..!!
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोल्यात राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी अजित दादा आले आणि भावनेच्या भरात सिताराम पाटील गायकर यांच्या धोतरापर्यंत जाऊन पोहचले. तेव्हाच अकोल्याच्या राजकारणाची पातळी घसरू लागल्याचे चित्र दिसून आले. त्याचा निषेध होतो कोठे नाहीतर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांनी पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ व माजी झेडपी सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर अगदी खालच्या भाषेत टिका करुन अकोल्यात पुन्हा निषेधमय वातावरण तयार केले आहे. मेंगाळ हे ५२ हजार मतदान असणाऱ्या ठाकर समाज्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या समाज्यातून निषेध होणे सहाजिक असावे. असे बोलले जाते. तर दराडे यांच्यामागे देखील जनमत आहे. त्यामुळे, रात्री अपरात्री मच्छिंद्र धुमाळ यांच्या निषेधार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे दिसू लागले आहे.
आता या सर्व वैयक्तीक म्हणा की पक्षीय राजकारणात वैभव पिचड यांच्या मतांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे शिवसेनेचा धुमाळ गट, दुसरीकडे दराडे-मेंगाळ गट तर तिसरीकडे काही झाले तरी पिचडांना मदत करायची नाही. म्हणजे नाही. अशी भुमिका घेणारे सतिश भांगरे. या भगव्या वादात शिवसेनीकांची अंतर्गत कुरघोडी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे याचा फायदा लहामटे यांना होऊन "बीन बोभाट फायदा" राष्ट्रवादीला होणार. असे जनतेला वाटू लागले आहे. आता या "दुखण्यावर" भाजप "मलम" कशी लावते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
"काय म्हणाले धुमाळ"
मा. उद्धव ठाकरे यांनी जो आदेश दिला. तो आम्ही पाळत आहोत. मारुती मेंगाळ व बाजीराव दराडे यांना आम्ही मोठे केले. पक्षात घेतले. मात्र, पक्ष वाढीसाठी व निधीसाठी यांनी काही केले नाही. त्यांना निवडून येण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान केले होते. खिशातून पैसा खर्च केला होता. मात्र, त्यांनी घात केला. त्यांच्यामागे "कुत्र" कोणी उभे नाही. असेल तर त्यांनी पंचायत समिती सोडा, ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे.
मारुती मेंगाळ म्हणतात
आज महायुतीत अर्ज भरायचा होता. त्यापुर्वी सभा झाली. तेव्हा माझ्या बाबतीत धुमाळ यांनी अगदी खालच्या भाषेत टिका केली. आजवर मी आरोप खपून घेतले. मात्र, आता हद्द पार केली. त्यांनी सातत्याने आरोप केला. मी सहन केला. कारण, मी गरिब आहे. मी पक्षाकडून निवडणूक केली. मला निवडून यायला पक्षाचा निधी आणि आमचे काही पैसे होते. मी सरळ सरळ पिचडांना विरोध केला होता. त्यांच्यासारखे मागिल दाराने हातात हात घेतले नाही. किंवा युती होण्याच्या आधीच पिचडांच्या स्टेजवर कोण जाऊन बसले होते. हे सगळ्या तालुक्याला माहित आहे. युती करायची म्हणजे समाज्याला विचारावे लागते. विधानसभा संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला सन्मान देणार का ? याची उत्तरे पिचडांकडे कोणी मागायची. हे चार डोके आतून सत्तेत बसले म्हणजे शिवसेनेचा सन्मान झाला असे नाही. त्यामुळे आता यांची गुलामी फार झाली. गरिब आहे. याचा अर्थ कोणी काहीही बोलावे. हे आता माझा समाज खपून घेणार नाही. तो आज रस्त्यावर उतरला उद्या प्रखरतेने उतरेल.मारुती मेंगाळ
(पं. समिती उपसभापती)बाजीराव दराडे म्हणतात |
-- बाजीराव दराडे
मच्छिंद्र धुमाळ
यांची प्रतिक्रिया
या दोघांनी पक्षाच्या बरोबर राहुन घात केला आहे. जाणिवपुर्वक पक्षाच्या वरिष्ठांचे आदेश डावलले आहे. युतीच्या विरोधी राहुन पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी पक्षापेक्षा मोठे नाही. आणि जर तुम्हा कोणाला असे वाटत असेल. तर पक्षातून चालते व्हा. पक्ष तुम्ही म्हणून चालत नाही. ज्यांना पक्षाच्या विरोधी भुमिका घ्यायची आहे. त्यांनी पंचायत समितीचे राजिनामे द्यावेत. आणि खुशाल विरोधी भुमिका घ्यावी. आज जे काही तरुणांनी निषेध सुरु केला आहे. तो एक स्टन्ट असून राजकिय नौटंकी आहे. उद्या याच मेंगाळच्या विरोधात ठाकर समाज रस्त्यावर उतरुन त्याचा निषेध करेल. इतका विरोध त्याला आहे. आम्हाला ठाकर समाज्याप्रती आदर आहे. मात्र, गोरगरिब जनतेची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीचा आम्हाला विरोध आहे. हे समाज्याने समजून घ्यावे.
मच्छिंद्र धुमाळ
(शिवसेना तालुकाध्यक्ष)-- सागर शिंदे
उद्यापासून वाचा शिवसेनेचे युवा नेते सतिश भांगरे यांची धक्कादायक विशेष मुलाखत..!!
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७६ दिवसात १३४ लेखांचे ७ लाख ५० हजार वाचक)