"पिचड साहेबांचा पराभव "विरोधक" करुच शकत नाही".! पण, हार नक्की ?
अकोले (प्रतिनिधी) :-
जाणकार राजकारणी अजूनही १९९५ व ९९ च्या पिचड आणि भांगरे यांच्या निवडणुकीचे किस्से मोठे रंगून सांगतात. जनता पाठीशी असेल तर ९५ ची अनुभूती होते, आणि जनतेने पाठ फिरविली तर ९९ ची आठवण होते. म्हणून आपण इतिहासाची पाने उघडून पाहिली पाहिजे. कारण, जे "इतिहास विसरतात ते कधीच इतिहास घडवू शकत नाही" म्हणून त्याची "पुनरावृत्ती" होण्याची वेळ आज आली आहे. एक स्पष्ट जाणवते आहे. तरुणांच्या मनात प्रश्न आहे, ४० वर्षे पिचडांनी काय केले ? निष्ठावंत राष्ट्रवादीला वाटतं सत्तेसाठी पक्ष बदलायची गरज नव्हती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जाणकारांना पिचडांच्या आवतीभोवती जी ठराविक पिलावळ आहे. त्यांच्या मक्तेदारीचा द्वेष आहे. म्हणून १९९५ ची आठवण होते. याच काळात आजचे निष्ठावंत तेव्हाचे बंडखोर झाले आणि पिचड साहेब एकटे पडले होते. बहुजन समाज्याचे चेहरे म्हणून ज्यांची प्रतिमा आहेत. त्यांनी साहेबांना पाडण्यासाठी प्रचंड आदळ-आपट केली. पण, ज्याला जनतेचा आशिर्वाद आहे. तो म्हणजे "देव तारी त्याला कोण मारी" !! असेच काहीसे झाले आणि साहेब आयुष्यात पहिल्यांदा ३४ हजार मतांनी निवडून आले. हे सर्वात मोठे "अनपेक्षीत" यश होते. "कदाचित" त्याची "पुनरावृत्ती" आज होऊ शकते असे जनतेला वाटू लागले आहे. काय असावे त्या "बलाढ्य" यशाचे गमक ? तर, पिचड साहेबांच्या "परीघाभोवती" जी ठराविक "संधीसाधुंची" पिलावळ जमा झाली होती. त्याला लोक वैतागले होते. पाच मिटरच्या अंतरावर बसलेल्या साहेबांना भेटण्यासाठी पंन्नास जणांना भेटावे लागत होते. म्हणजे बराक ओबामापेक्षा कठीण भेट आमदारांची झाली होती. त्यामुळे ज्यांनी पिचडांचे सर्कल मोडून त्यांना "चितपट" करू पाहिले. त्यांचे बिमोड जनतेने करून दाखविला. जर जनता त्यांच्या विरोधात असती. तर अशोक भांगरे तेव्हाच आमदार झाले असते. आज देखील "सेम परिस्थिती" पहायला मिळत आहे.
खरे पाहता, पिचड साहेब खरच वाईट नाही. असे लोक शपता घेऊ-घेऊ सांगतात. मात्र, जनतेची "सल" कोठे आहे. हे आता नव्याने सांगायला नको. महायुती एक नाममात्र बहना आहे. पण, साहेबांनी जी "भ्रष्ट" यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे साहेबांना पराभवाला सामोरे जावे लागेल की काय ? अशी जोरदार चर्चा जनतेत सुरू आहे. फार नाही. पण, पराभवाचे "शिल्पकार" म्हणून "चारदोन" उदाहरणे पाहुयात. असे बोलले जाते की, साहेबांनी नेहमी माकडांच्या हाती कोलीतं दिली आहे. नको त्या "किचन कॅबिनट" पत्रकारांना जवळ करून माध्यमांचा रोष पत्कारुन घेतला आहे. ज्यांना पत्रकार म्हणून बातमी सोडा, लिड काढण्याची अक्कल नाही. त्या तोतया पत्रकारांना नको ते स्थान दिले. फोटो काढून "उदो-उदो" करणे अशा "मांडलिकांना" मांडीवर घेतले. त्यामुळे, खरे पत्रकार नाराज झाले. पण, साहेबांना हे ठाव नाही. की, नुसता इडीट केलेला फोटो, पेपरला छापून येत नाही. तर, वास्तवात व्यक्तीला पत्रकाराचे अंग असायला हवे. बातमीदार म्हणून त्याची "बौद्धीक क्षमता" हवी असते. चारदोन अधिकाऱ्यांची "उनी-धुनी" केली म्हणजे तो पत्रकार होत नाही. त्यामुळे साहेब नको त्याला मोठे करत बसले असे बोलले जाते.
दुसरी गोष्ट म्हणजे, काहीजणांच्या "अनु-रेणूत" पिचड साहेब तुम्ही बसले आणि ते तुमचे "दास" झाले. तुम्ही देऊ केलेला मलिदा स्थानिक लाचार पत्रकारांना देऊ करणे ठिक होतं. पण, हे महाशय एका मोठ्या पेपरच्या "संपादकाशी" व्यावहार करायला गेले. आता हे झाले असे की, "बकरीने उंटाचा मुका घेण्याचा प्रयत्न करणे", किंवा "मोंदी" साहेबांना ग्रामपंचायत "सदस्याने" किती "निधी" देऊ अशी विचारणा करणे. किती हस्यास्पद गोष्ट आहे. ज्या संपादकांकडे मंत्री मोहदय खेटा मारतात, त्यांना एका आमदार दासाने "किती देऊ ची" विचारणा करावी ? या प्रकारामुळे राज्यातील नामवंत "संपादक" साहेब चांगलेच भडकले. त्यांनी अकोल्यातील त्या पत्रकाराची "औसी के तौसी" केली. त्यानंतर जे पेपरला डॉ. किरण लहामटे सुरु झाले. तर, साहेबांनी विनंती केल्यानंतर या चुकीवर पडदा पडला. असे बोलले जात आहे. बरं, हे पत्रकार महाशय येथेच थांबले नाही. जे "निर्भिड" लिखान करतात. त्यांच्या जुन्या माहित्या उचका असे सल्ले देऊ लागले. पण, "लाचार" नसलेला व "उध्वस्त" झालेला पत्रकार "नंगा" झाला तर काय होऊ शकते. याची प्रचिती त्यांना नसावी.अर्थात या सर्व "उहापोहीचे" तोटे पिचड साहेबांच्या अपयशाची कारणे ठरु शकतात. अशी गुप्त चर्चा तालुक्यात सुरू आहे. आता या गोष्टींकडे साहेबांनी दुर्लक्ष केले. तर, २०१४ ची निवडणुक मोदी साहेबांनी सोशल मीडिया आणि माध्यमांच्या बळावर जिंकली होती. हे विसरुन चालणार नाही. कारण, पेपरांपेक्षा सोशल मीडियाचे लाखो वाचक पराभवाचे शिल्पकार होऊ शकतात हे नाकारुन चालणार नाही.
तू नाही मी साहेबांच्या जवळचा !! |
आज साहेबांची जी कट्टर रिझर्व फोर्स आहे. ती म्हणजे मिनानाथ पांडे, सिताराम पाटील गायकर, कैलास वाकचौरे, यशवंत आभाळे, राजाभाऊ डावरे यांच्या हाती जो कारभार आहे. तो नक्कीच साहेबांना तारक आहे. मात्र, "अर्थ"पुर्ण घडामोडींसाठी उद्या सढळ हात सोडूनही नियोजना आभावी अपयश पदरात पडायला नको. असे भाऊप्रेमींना वाटते आहे. भाजप, शिवसेना, रिपाई या गोतावळ्यात प्रत्येकजण आपापली जागा तयार करू पहात आहे. कोणाला कारखाण्याचे तर कोणाला झेडपीचे, कोणाला पंचायत समितीचे तर कोणाला दुधसंघात जागा मिळाल्याचे स्वप्न पडू लागले आहे. त्यामुळे, या खेचाखेचीत साहेब तुमची जागा धोक्यात यायला नको. याकडे लक्ष द्या. असे व्यक्तीप्रेमींना वाटते आहे.
आरे थांबा ! निवडून तर येऊद्या !! |
राष्ट्रवादीतील काही ठराविक नेते साहेबांना अंतर्गत मदत करणार असल्याचे बोलले जात आहे. तर, निवडणुकीच्या ऐन तोंडावर काहींचा भाजपत प्रवेश होऊ शकतो. अशी माहिती गोपनिय सुत्रांकडून मिळाली आहे.