"चाळीस वर्ष पिचडांनी काय गवत उपटले का ?" शरद पवारांची टिका
अकोले (प्रतिनिधी) :-
आज पहिलांदा अकोल्यात मला वेगळे व्यासपीठ मिळाले. त्याचा मलाही आनंद होत आहे. आजवर अकोल्यात मी जे दिले. त्याचे हे द्योतक आहे. ज्यांनी अकोले तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर भाजपत प्रवेश केला त्यांनी ४० वर्षे काय गवतं उपटले का ? असे म्हणत पवार साहेबांनी पिचड पिता-पत्रावर निशाना साधला. अकोले तालुका आदिवासी असल्यामुळे मी आजवर प्रत्येक वेळी झुकते माप दिले आहे. सत्तेपासून तर योजनेपर्यंत विशेष काळजी घेतली होती. येथील कारखानदारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हे सगळं केले तरी यांनी भाजपात प्रवेश करावा वाटला. तो कशामुळे हे सगळ्यांना माहित आहे. पण, तरी देशात लोकशाही आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाला स्वतंत्र द्यावे. कोण कोठे गेले जाऊद्या, आता प्रत्येक समान्या व्यक्तीला न्याय द्यायचा आहे.
होय ! डॉ. लहामटेंना निवडून देणार ! |
हे सरकार जवानांच्या कार्यावर राजकारण करीत आहे. दहशतवादी मारतात जवाना, शहीद होतात जवान आणि त्यांचे राजकारण करतात अमित शहा आणि मोदी. सिमेवर जीव जातो त्यांचे काही नाही. इकडे मोदींची ५६ इंच छाती फुगते. निवडणुकीच्या काळात दहशतवाद, आतंकवाद असे मुद्दे पुढे येतात. त्यांच्या नावे राष्ट्रीय आस्मिता म्हणून राजकारण केले जाते. त्यावर लोकं मतदान करतात. हे दुर्दैव आहे की इव्हीएम घोटाळे हेच कळत नाही. कारण, लोकसभेत भाजप येते आणि त्यापाठोपाठ विधानसभेत काँग्रेस येते. हे न उलगडणारे कोडे आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाठीला तेल लावून बसले आहेत. पण, त्यांना माहित नाही. की, हा शरद पवार महाराष्ट्र कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे. आणि त्यांना कोणीतरी सांगावं की कुस्ती फक्त पैलवानांशीच होत असते. अर्थात भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अमित शहांच्या २० सभा महाराष्ट्रात लावल्या आहेत. ते शहा मला विचारतात पवारांना महाराष्ट्रासाठी काय केले. आम्ही राज्यात कारखानदारी उभी केली. १९७८ साली रोजगार हमी कायदा आम्ही केलाय, ५० टक्के महिलांना आरक्षण, मंडल कमिशन आयोगाचा निर्णय, औरंगाबाद विद्यापिठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव दिले अशी अनेक कामे आम्ही केली. यांनी काय केले ? इंदुमीलची जागा स्मारकासाठी देऊ म्हणाले, कुदळी मारली आणि प्रश्न प्रलंबित ठेवला. शिवरायांना आम्ही आदर्श मानतो आणि हे राजकारण करतात. ज्या गडकोटांवर आमची अस्मिता आहे. तेथे हे हॉटेल आणि लॉज उभे करणार आहेत. जे किल्ले शौर्याने चमकले तेथे दारुचे आड्डे उभे राहणार आहेत. त्यामुळे खरं पाहता यांनी शिवरायांचे नाव सुद्धा घेऊ नये.
सरकार म्हणते आम्ही ५० हजार कोटींचे कर्ज माफ केले. तुम्हाला मिळाले का ? मग ते पैसे गेले कोठे ? ते म्हणतात ३१ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. मग ६९ टक्के शेतकऱ्यांचे काय ? गेल्या पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारच्या काळात जबाबदार नेते आपल्या मुलीच्या वयात असणार्यांवर अत्याचार करतात. त्यांना अटक केली. पण, ज्या व्यक्तीवर अत्याचार केला. तीला हे सरकार अटक करीत आहे. असा हा कारभार आहे. माझ्यावर जो इडीचा आरोप झाला. त्यात माझा दुरदुर कोठे संबंध नाही. ही सगळी भाजपची दडपशाही आणि सत्तेचा गैरवापर आहे. त्यामुळे हे सरकार पाडण्यासाठी राष्ट्रवादीला निवडून द्या. असे आवाहन शरद पवार यांनी केले. ते अकोले तालुक्यात बाजारतळ येथे डॉ. लहामटे यांच्या प्रचारार्थ बोलत होते.यावेळी किरण लहामटे, दशरथ सावंत, राजेंद्र फाळके, अशोक भांगरे, कारभारी उगले, दादापाटील वाचकौरे, विनय सावंत, साहेबराव तिकांडे, महेश तिकांडे, भाऊसाहेब साळवे, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, मारती मेंगाळ, बाजीराव दराडे, अमित भांगरे, तुळशीराम कातोरे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
-- सागर शिंदे
-- सुशांत पावसे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७९ दिवसात १५८ लेखांचे ८ लाख ९६ हजार वाचक)