...तर वैभव पिचड पुन्हा "आमदार"..!..अन्यथा "डॉ. लहामटे मोठ्या मताधीक्याने संधी"..!!


अकोले (प्रतिनिधी) :-
               आज "विधानसभेचा निकाल" असल्यामुळे अनेकांची "धाकधुक" वाढती झाली आहे. पांढऱ्या बगळ्यांचे "बीपी" हाय झाले असून, सामान्य जनतेने कोणाच्या बाजूने कौल  दिला आहे. तो, "ईव्हीएम" मशिनमध्ये बंद आहे. वियजश्री नक्की कोणाचा. हे अवघ्या काही तासातच   निच्छित होणार आहे. तरी, निकाल कोणत्या गावांवर अवलंबून आहे. हा स्पेशल रिपोर्ट "रोखठोक सार्वभौम"ने मांडला आहे. अर्थात, आजवर लोकांनी हातात घेतलेल्या निवडणुकींचा कौल पाहिला. तर, लक्षात येते. की, प्रस्तापितांच्या विरोधात जनता गेली. तर, ते अगदी "अल्प मतात" उमेदवार निवडून येतो. त्यामुळे "वैभव पिचड" यांना सद्यातरी पुन्हा आमदार  होण्याची संधी आहे. तर, पठार भागांसह २९ गावांमध्ये डॉ. लहामटे यांनी लिड घेतले. तर ते "जनआक्रोषाच्या लाटेतून" चांगल्या मतांनी विधानसभेत जातील. असे एकंदरीत वाटते आहे. या पलिकडे "अकोल्याला दोन आमदार" होऊ शकतात. हे देखील नाकारुन चालणार नाही. याचे विश्लेषण आपण, निकालानंतर नक्कीच आपल्यासमोर मांडू. परंतु, हे फक्त स्पष्ठ आठवणीत कोठेतरी आधोरेखीत करा". सद्या इतकेच. कारण, यापुर्वी याच मातीतले "दोन आमदार" विधिमंडळात काम करत होते. हे "इतिहास" सांगतो. ती पाने आपण पुढे उलटणारच आहोत. "तुर्तास" आजच्या निकालाकडे वळूया.
                 आता तालुक्यात एकूण २ लाख ५४ हजार २०४ मतदार आहेत. त्यापैकी, १ लाख ७३ हजार ३५९ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यात ९४ हजार ५६० पुरुष, तर ७८ हजार ७९९ स्रीयांनी सहभाग घेऊन ३०७ बुथवर एकूण ६८.२० टक्के मतदान केले आहे. ही अकडेवारी कोणाचे दिवळं काढणार..!! हे अगदी काही तासातच कळेल.  परंतु, ही निवडणुक माजी आमदार वैभव पिचड यांच्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. हे त्रिवार सत्य आहे. कारण, ज्याने शुन्यातून ऊभे राहण्याचा प्रयत्न केला. तो पुन्हा शुन्य झाला. तरी काहीच फरक पडत नाही. तसेच डॉ. लहामटे यांचे आहे. "आज नाही, तर परत अगदी कधीच नाही" हे त्यांना देखील माहित आहे. तर, उलटपक्षी "आज आले. तर, पुन्हा ४० वर्षे दुसरा कोणी नाही", हे पिचड साहेबांना माहित आहे. त्यामुळे, दोघांच्या राजकीय अस्तित्वाचे हे "द्वंद्व" आहे. असेच समजा.
         खरे पाहता, आदिवासी पट्ट्यात एकदरा परिसरात १ हजार ५२६ मतदान झाले. तेथे समसमान कौल जाणवला. पाडोशी, केळी, रुम्हणवाडी, खिरविरे, सावरगाव पाट, सांगवी, मुथाळणे, कोंभाळणे, वारंघुशी, मान्हेरे, उडदावणे, काताळापूर अशा गावांमध्ये ७५० च्या सरासरीने १२ हजार ४५१ मतदान झाले आहे. त्यात डॉ. लहामटे यांना मतदान कमी असल्याचे लक्षात येते. एकंदरीत आदिवासी पट्ट्यातून काही प्रमाणात वैभव पिचड यांना "अल्पसे लिड" मिळेल. असे अभ्यासकांचे मत आहे.
           तर भंडारदाऱ्यापासून तर अगदी नवलेवाडीपर्यंत जो प्रवरेचा किनारा आहे. त्यात निळवंडे, चितळवेढे, म्हळदेवी, निंब्रळ इथवर ४ हजार ४३० इतके मतदान झाल्याचे आकडेवारी सांगते. त्यात देखील वैभव पिचड यांची बाजू सरशी दिसते आहे. पुढे इंदोरी, महेंदुरी व रुंभोडी या तीनच गावात ३ हजार ९९८ मतदार आहेत. तेथे पिचड साहेबांना फारसे वैभव पदरात पडल्याचे दिसत नाही. तेथे डॉ. लहामटे बहुतांशी पुढे असल्याचे जनतेला वाटते आहे. पुढे उंचखडक प्लस झाले तरी औरंगपूरातून ते पुन्हा मागे पडताना दिसतात. परंतु ही अकडेवारी अगदी ६३२  इतकी तुरळक दिसते. टाकळी येथे तर सर्वाधीक मतदानाची नोंद झाली आहे. तेथे १ हजार १२१ मतदान एकाच बुथवर झाले असून महेश तिकांडे, भाऊसाहेब साळवे यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आता येथे कोणाचे पारडे जड भरेल हे नव्याने सांगायला नको. 
      नवलेवाडी सारख्या ठिकाणी १ हजार ४४७  मतदान झाले. तेथे डॉ.  नवले व मधुभाऊ नवले यांच्यामुळे मतांची अकडेवारी समाधानकारक नाही. तरी पिचड साहेबांची आघाडी तेथे जाणून आली आहे. धुमाळवाडीत १ हजार ९९५ इतके मतदान झाले. तेथे डॉ. लहामटे यांना चांगला प्रतिसाद जाणून आला आहे. आंबड सारख्या ठिकाणी १ हजार ५४७ मते असून तेथे जाधव फॅक्टर यांच्यामुळे साहेब आघाडी घेतील असे वातावरण दिसून आले. एकंदर धामनगाव पाट येथे १ हजार ५८० धामनगाव आवारी येथे २ हजार ९८ असे मतदान झाले. हा गट कैलास वाकचौरे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे, अर्थातच वैभव पिचड यांची सर्वात मोठी जमेची बाजू खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या परिसरातील छोट्या गावांमध्ये ५०-५० टक्ते मतदान झाल्याचा अंदाज आहे. मात्र, लाभार्थी गावात विकासाच्या मुद्द्यावर मतदान झाल्याचे दिसून येते.

शहर व प्रवरेेत जोरदार बॅटिंग..!

           विशेष म्हणजे अकोले शहरात ८ हजार ९०३ मतदान झाले. त्यातील ७५ टक्के मतदान वैभव पिचड यांच्या पारड्यात पडेल. असे विश्लेषकांना वाटते. तर, खाली सुगावमध्ये खुद्द पिचड साहेबांमुळे १ हजार ५५३ मते तर कळसमध्ये कैलास वाकचौरे यांच्यामुळे २ हजार ७१८ पैकी ७० टक्के मतदान वैभव पिचड यांच्या गोटात जाईल. असे जाणकारांना वाटते आहे.
     समशेरपुरचा विचार केला. तर, तेथे २ हजार २३४ मतदान झाले. त्यापैकी दोन समाज्याने पिचड साहेबांना नाकारल्याचे दिसते आहे. एक म्हणजे कोणताही पक्ष चालेल. पण, शिवसेना भाजप नको. तर सांगवी धरणातून एकच रोटेशन सोडले म्हणून काही लोक नाराज आहेत. हे पाण्याचे राजकारण, साहेबांच्या अंगलट आल्याचे दिसते. त्यामुळे त्या परिसरात डॉ. लहामटे यांचे पारडे जड दिसते आहे. पुढे देवठाण विभागात ४ हजार ५४१ मतांचा गठ्ठा आहे. मात्र, येथे सेम हिच परिस्थिती दिसते आहे. शहर शेळके फॅक्टर वगळता, वाडी वस्तीवर तुळशीराम कातोरे यांनी चांगलीच बाजी मारल्याचे दिसते आहे. त्यामुळे, डॉक्टरांसाठी ही जमेची बाजू असणार आहे. विरगाव परिसरात १ हजार ८१० मतदान झाले. येथे कमळ बऱ्यापैकी फुलेल. मात्र, चार-चार पुढाऱ्यांच्या तुलनेत हे मतदान कवडीमोल ठरणार आहे. "मोडतोडीसाठी" प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव निपाणीत दादापाटील वाकचौरे यांच्यामुळे घड्याळ जोरदार फिरेल. पण, तरी वाकचौरे कंपणी आणि तरुणाई कमळाची मोडतोड होऊ देईल असे वाटत नाही. गणोऱ्यात वैभव पिचड यांच्यापेक्षा डॉ. लहामटे यांना वाढता जनाधार वाटतो आहे. तेथे २ हजार ८३३ पैकी ६५ टक्के घड्याळ बाजी मारुन जाईल असे वाटते. हिवरगाव व डोंगरगाव यांच्यात ३ हजार ६४ मतदान झाले आहे. या परिसरात पहिल्यापासून पुरोगामी आणि डावे विचार "उगले" आहेत. त्यामुळे  येथे सर्वाधिक मताधिक्य डॉ. लहामटे यांना असेल. असे अनेकांना वाटते आहे.

पठारावर आपलंच राज्य..!!

         आपण, जसजसे पठार भागाकडे प्रवेश करु. तसतसे डॉ. लहामटे यांच्या घड्याळाचा वेग वाढता दिसतो. वाशेऱ्यापासून तर कोतुळमध्ये मतांची मोठी उलाढाल पहायला मिळते. कोतुळमध्ये ३ हजार ८१० मतदारांमध्ये वैभव पिचड यांचे वावडे नाही. तर, भाजप व शिवसेनेचे वावडे असल्याचे दिसून आले. ब्राम्हणवाड्यातील २ हजार २५६ मतांसह  काही प्रमाणात मुस्लिम बांधवांनी वैभव पिचड यांच्याकडे अनावधानाने पाठ फिरविल्याचे वाटले. त्यामुळे कमळाला तेथून फार लिड मिळेल. अशी आपेक्षा नाही. पुढे बेलापूर १६ शे, बोटा १ हजार २३२, पिपळदरी १ हजार ४४९ लिंगदेव १ हजार ७७१ येथे कमळाला प्रचंड विरोध झाल्याचे पहायला मिळाला. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांवर रोष आणि शिवसैनिकांची अंतर्गत बंडखोरी हाच चर्चेचा विषय ठरला होता. पुढे पठार भागात घारगावासह १२ गावांत कमळाला चांगले मताधिक्य असेल. 
        मात्र, संगमनेरचे "विजयश्री" थोरात साहेबांमुळे ६ ते १० हजारांचे लिड डॉ. लहामटे यांना असू शकते. असे स्थानिक अभ्यासकांना वाटते. हे  असे असले तरी राजुरमधील ४ हजार ७११ मतदान, शहरातील ९ हजार मतदान धामनगाव गटासह प्रवरा पट्टा वैभव पिचड यांना चांगले लिड देईल. असे झाले. तर, अगदी अल्पमतांनी वैभव पिचड पुन्हा आमदार होतील. असे झाले नाही. तर, डॉ. लहामटे जनतेच्या कौलाने विधानसभेत जातील. असे अभ्यासकांना वाटते आहे.
 - सागर शिंदे

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 
              - सागर शशिकांत शिंदे   
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८६ दिवसात १६९ लेखांचे १० लाख ३५ हजार वाचक)