आता "पाया" पडतो. पण, हे "पिचडांच बेनं" अकोल्यात नको - मुंडे
अकोले (प्रतिनिधी) :-
धनंजय मुंडे म्हणाले की, सभेला उपस्थित सर्वांचे आभार. लै दिवसापासून माझी इच्छा होती. कधी मी येथे येतोय. तुमच्या डोळ्यात दोन गोष्टी दिसल्या. पिचडांनी जे केले त्याचा राग व डॉ. लहामटे यांना विजयी करायचे आहे. ही निवडणुक जनता विरुद्ध नेता आहे. एखाद्या पक्ष सोडावा का लागतो. ४० वर्षे या पिचडांनी एकाचे दोन केले. आणि त्यामुळे व दुसरीने १५ कोटी केल्यामुळे पिचडांना पक्ष बदलायची वेळ येते. मी मानला त्या मुख्यमंत्र्याला, लाज कशी वाटत नाही. असे म्हणायला की, आमच्यावर भ्रष्टाराचे आरोप झाले नाही. या देशाच्या इतिहासात ९० कोटीचे घोटाळे डायरेक्ट गिळून घेतले. जनतेने ज्या भाजपला ३०३ खासदार दिले तरी याला घेऊ की त्याला घेऊ असे झालेय. अनेक प्रश्न बाजुला लोटायला आणि तुमचे लक्ष विचालित करायला हे षडयंत्र केले आहे. पिचडांची त्यांच्या मतदारसंघात चव गेली. म्हणून मोदी लाटेचा आधार घेऊ पाहिला. यांना लाज का वाटत नाही. जो कारखाना पवार साहेबांनी दिला. साधा एमडी देखील बुके द्यायला गेला नाही. मग लाज का वाटत नाही. बरं झाले वैभव गेले त्याशिवाय आम्हाला हे नवकिरण (डॉ. लहामटे) मिळाले नसते.
या राज्यात ३७० चा संबंध काही नाही. कर्जमाफी, अत्याचार व रोजगार विसरून जावे. म्हणून हे भांडवल आहे. ७२ हजारांची मेघा भरती रोजगारासाठी नव्हती ती भाजप पक्षाची होती. तरुणांना सोयरीक नाही. बिगर नोकरीची पोरगी मिळवून दाखव आणि मग म्हण मोदी है तो मुन्कीन है. अशोक भांगरे यांचे मी कौतुक करेल. त्यांनी मागे पाय टाकला. भांगरे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा. पण, एकच इच्छा आहे. हे पिचडांचे बेने आता मला परत नको. परळीचा गुलाल मी राजुरला येणार आहे. २१ तारखेला मायबाप जनतेला विनंती आहे. पण, पिचडांसारख्या प्रवृत्तीला याच मातीत गाडा.
डॉ. लहामटे म्हणाले, जनता माझी माय-बाप आहे. लोकं दिवसभर काम करताय आणि रात्री माझ्या झोळीत दोन रुपये टाकतात. हे पांग मी कोठे फेडू. डॉ. बाबासाहेब म्हणतात एका मताची किंमत भाजी भाकरीची नाही. त्यामुळे तुमची मते विकू नका. मलिदे घ्या पण मतदान मला करा.
यावेळी, बाजीराव दराडे यांची भाषण करताना जीभ घसरली. त्यांनी काही निवडक सैनिकांची भर स्टेजवर आयमाय काढली. माजी पोलीस अधिकारी मधुकर तळपाडे यांना या सैनिकांनी कसे लुटले. हे खुलेआम सांगितले. युती फायनल नव्हती तेच अकोल्यात युती फायनल करून हे मोकळे झाले असा टोला दराडे यांनी धुमाळ यांचे नाव न घेता लगावला. उद्या जे मत मागायला येणार आहे. त्यांना विचारा देवाची शपथ घेऊन सांगा की तुम्ही कोणाचे पॅकेज घेतले नाही. त्यामुळे मी मत मागायला आलो आहे. पण असा एकही नेता सापडणार नाही.
पोपट दराडे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी आपलाच साठवून ठेवलेला मलिदा बाहेर येईल. तो नाकारू नका. तो घ्या. पण, तुमच्या मनातील व्यक्तीलाच मतदान करा.
अजित नवले म्हणाले ज्या पिचडांनी धरणात झिंगे सोडले. त्यांचे निवडणुकीत झिंग-झिंग झिंगाट करण्याची वेळ येईल. एक सुदैव म्हणायचे की, ज्यानी आयुष्यभर दोन नंबरची कमाई केली. त्यांचे नाव मशिनवर देखील दोनच नंबरवर आले आहे. पिचडांनी जे तुर्तर्रमखान पोसले आहे. त्यांना देखील आपल्याला धडा शिकवायचा आहे. त्यासाठी बोगस मतदान होणार नाही. याचा प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.
दशरथ सावंत म्हणाले की, पुर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा पण, डॉ. बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिला. त्यातून जनतेला राजा निवडून द्यायचा अधिकार दिला. त्यामुळे, सामान्य मानसाला राजा करा. ही सुचना आम्हाला जनतेने दिली. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना एकास एक उमेदवार देण्याचे सामाजिक शहानपण आले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पिचडांनी समान पाणी वाटप कायदा करण्यास सहाय्यभूत केले. त्या पिचडांनी उतारवयात बोंबींल खाल्ला. म्हणून यांना घरी बसवाचे आहे.
अशोक भांगरे म्हणाले. आम्ही एकास एक उमेदवारी करण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे डॉ. किरण लहामटे म्हणजे अशोक भांगरे हे विसरु नका. आता मत विभाजन होणार नाही. याची काळजी आम्ही घेतली. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे. काय करायचे आहे. आता प्रत्येकाच्या मनात आहे पिचडांना पाडायचे आहे.
यावेळी सभा चालु असताना सावंत साहेब रंगात आले होते. पिचड साहेबांवर टिका सुरू होती. प्रत्येकाचे लक्ष भाषणाकडे होते. भाजपला पाडा असे म्हणत असताना एक महाशय भाजपची टोपी घालून बीडी आेढत सभेतून उत्तर दक्षिण चालत गेला. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. तो आपल्या धुंदीत बीडीचा धुर उडवित निघून गेला. त्यामुळे हजारो मानसांमध्ये हशा पिकला होता. तोच व्यक्ती पुन्हा भांगरे साहेबांचे भाषण सुरु असताना. पुन्हा फेरफटका मारुन गेला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भाजपची जाहिरात आल्याचे हस्याने बोलले गेले.
यावेळी किरण लहामटे, दशरथ सावंत, अशोक भांगरे, कारभारी उगले, विनय सावंत, शांताराम वाळुंज, दादापाटील वाकचौरे, साहेबराव तिकांडे, महेश तिकांडे, भाऊसाहेब साळवे, मारती मेंगाळ, बाजीराव दराडे, दत्ता नवले, अमित भांगरे, तुळशीराम कातोरे, सुरेश खांडगे, बबन वाळुंज, लालुशेठ दळवी, कपील पवार, शुभम दादा माने, योगेश खरात, पोपट दराडे, यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
अमित शहा यांच्या येण्याने काय होऊ शकते. जनतेच्या मनातील १०१ प्रश्न शहांसमोर मांडणार. वाचा विशेष लेख रोखठोक सार्वभौम।