"काँग्रेस-राष्ट्रवादी" अडिच वर्षात सर्व "जेलमध्ये" जाणार, संगमनेरात डॉ. विखेंचा सुतोवाच..!!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेली अवहेलना आणि हेळसांड विखे कुटुंब विसरता-विसरेनासे झाले आहे. जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा बारामतीचे भांडवल करून लोणीच्या वाड्याचे सरदार शब्दशस्राचे वार करताना दिसत आहे. लोकसभेला नगर दक्षिण जागा मागणारे "बालक" आणि जागेचे "पालक" यांच्यात जुगलबंदी झाली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे संपुर्ण राष्ट्रवादी संपविण्याचा घाट घालण्यापेक्षा एक "बालहट्ट" पुरविला असता तर आज "बारामतीला" रडण्याची वेळ आली नसती. असेच संबोधीत करून डॉ. सुजय विखे यांनी थेट शरद पवार यांना आपल्या अजेंड्यावर घेतले. अर्थात संगमेरात जागा "काँग्रेसची", विरोधक "शिवसेनेचा" आणि प्रचारक "भाजपचा" येऊन टिका "राष्ट्रवादीच्या" नेत्यावर होते. यातून जनतेला व्यक्तीदोष दिसून आला. मात्र, निवडणुक म्हणजे "लोकांच्या खांद्यावर" बंदूक ठेऊन "आपला निशाना" साधायचा. असे होत नसेल तर ते राजकारण कसले. !! त्यामुळे डॉक्टरांनी थोरांतांचा ताप तपासायचा तर ते बारामतीलाच सुया टोचत बसले. अशी टिका राष्ट्रवादीच्या जाणकारांनी केली.
संगमनेरमध्ये शिवसेनेचा प्रचार करताना ते म्हणाले, मी खासदारकीची उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेसकडे गेलो होतो. काँग्रेस वाले म्हणाले आमच्याकडून देता येणार नाही. जागा राष्ट्रवादीची आहे. राष्ट्रवादीवाल्यांकडे तीनदा गेलो. वडीलही गेले. शेवटच्या क्षणापर्यंत मी तिकिटासाठी विनंती करीत राहिलो. तरी यांनी मला सहकार्य केले नाही. उलट बालहट्ट म्हणून अवहेलनाच केली. शेवटी मी भाजपमध्ये गेलो आणि इतिहास झाला. मी नेहमी विचार करतो की मला का डावल गेलं ? मग मला हळूहळू उत्तर मिळायला. की, त्यांनी त्यावेळी एकच विचार केला असेल. आमच्या पक्षात सर्व चोर, वाळुतस्कर, सर्वांनवर गुन्हे दाखल, सर्व डाकू आहे. या गुन्हेगारांत डॉक्टरचे काय काम ?, एक माणुस जो सुशिक्षित आहे. तीन वर्षांपासुन प्रयत्न करत आहे. त्याच्यावर कधी कुठला गुन्हा नाही. वाळु तस्कर नाही, डाकू नाही, गरीबांचे पैसे खाले नाही. ते बोले आमच्याकडे सर्व चोर राहतात. तुम्ही अजिबात येऊ नका.
आमचा पक्ष हा फक्त पाच वर्षांचा आहे. यापुढे राष्ट्रवादीच्या लोकांना भेटायला जायचे असेल तर संपर्क कार्यलयात जाऊ नका. दोन वर्षे थांबा राष्ट्रवादी नेत्यांची भेट ही थेट "येरवडा जेल" मध्ये होईल. अशी टिका खा. विखे यांनी केली. सर्वात दुर्दैव म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना "माज" चढला होता. तेव्हा सत्तेची गुरमी होती. मंत्री झाले पैसे खाले यांना माहीत नसेल या देशामध्ये चौकीदार येणार आहे. आणि यांचा बंदोबस्त करणार आहे. एक केस झाली तर तुमच्या डोळ्यात पाणी आलं. हेच पाणी तेव्हा कोठे गेलं होतं, जेव्हा निळवंड्याचे पैसे खाले आणि तीस वर्षे आम्हला हक्काचे पाणी मिळू दिले नाही. "हेच पाणी कुट" होत ? शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. शेतकरी मारले गेले."हेच पाणी कुट" होत ? जेव्हा तुम्ही ऊर्जा मंत्री असताना मुळा प्रवरेची संस्था बंद पडली. तेव्हा हे पाणी कुट होतं ?. जेव्हा जनता मरत होती, शेतकरी आत्महत्या करत होते. ते पाप तुम्ही महाराष्ट्रामध्ये केलं. तेव्हा तुमच्या डोळ्यात "पाणी" का आलं नाही ? आज तुमच्या "पापाचा घडा"भरून आला आणि ते फेडायची वेळ आली. तेव्हा तुम्ही राडताय ही गोष्ट फक्त इडीच्या केसवर थांबणार नाही. तर दोन वर्षे थांबा ज्या-ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आणले. ज्या-ज्या लोकांनी महाराष्ट्रच्या पुढचं भविष्य ५० वर्षे अंधारात ठेवलं ते अडीच वर्षामध्ये हे सर्व "जेलमध्ये" जाणार आहे. असे सुतोवाच डॉ. विखे यांनी भर सभेत दिले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेली अवहेलना आणि हेळसांड विखे कुटुंब विसरता-विसरेनासे झाले आहे. जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा बारामतीचे भांडवल करून लोणीच्या वाड्याचे सरदार शब्दशस्राचे वार करताना दिसत आहे. लोकसभेला नगर दक्षिण जागा मागणारे "बालक" आणि जागेचे "पालक" यांच्यात जुगलबंदी झाली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे संपुर्ण राष्ट्रवादी संपविण्याचा घाट घालण्यापेक्षा एक "बालहट्ट" पुरविला असता तर आज "बारामतीला" रडण्याची वेळ आली नसती. असेच संबोधीत करून डॉ. सुजय विखे यांनी थेट शरद पवार यांना आपल्या अजेंड्यावर घेतले. अर्थात संगमेरात जागा "काँग्रेसची", विरोधक "शिवसेनेचा" आणि प्रचारक "भाजपचा" येऊन टिका "राष्ट्रवादीच्या" नेत्यावर होते. यातून जनतेला व्यक्तीदोष दिसून आला. मात्र, निवडणुक म्हणजे "लोकांच्या खांद्यावर" बंदूक ठेऊन "आपला निशाना" साधायचा. असे होत नसेल तर ते राजकारण कसले. !! त्यामुळे डॉक्टरांनी थोरांतांचा ताप तपासायचा तर ते बारामतीलाच सुया टोचत बसले. अशी टिका राष्ट्रवादीच्या जाणकारांनी केली.
लै मनावर घ्यायचं नाही यांचं !! |
तेथे विरोधक तुम्ही का आम्ही आहे !! |
२४ पर्यंत थांबा !! मग कळेल |
दरम्यान सुजय विखे यांनी थोरातांवर निशाने साधण्याऐवजी पवारांना जास्त टारगेट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे काही नाराज कार्यकर्ते नवले यांना अतर्गत सपोर्ट करणार होते. त्यांच्या निष्ठेचे आॅपरेशन डॉक्टरांकडून झाल्याने राष्ट्रवादीच्या तरुणांनी नाराजी व्यक्त केल्याचे पहायला मिळाले. "वेळ फार "बलवान" असतो". प्रत्येकावर वेळ येते असे म्हणून निष्ठावंतांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीचे कुटाळे हे नवलेंच्या यशासाठी तारक ठरेल की मारक !! हे लवकरच लक्षात येईल. असे जाणकारांना वाटते आहे.
-- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ८१ दिवसात १६६ लेखांचे ९ लाख ५० हजार वाचक)