" पिचड साहेब..!! हाजीर हो..! तिघांना न्यायालयाचे "समन्स", आरोपांचे खंडन..!
नाशिक (प्रतिनिधी) :-
माजी आदिवासी विकास मंत्री "मधुकर पिचड" यांच्या दुसऱ्या पत्नी कमलाबाई यांच्या नावे "बोगस आदिवासी प्रमाणपत्र" तयार करून "१४ कोटींची" जमीन लुटल्याचा आरोप "न्यायप्रविष्ठ" आहे. भाजपत प्रवेश करुन तो "शमतो" कोठे, नाहीतर मुलास "आत्महत्येस प्रवृत्त" करून "सुनेचा छळ" केल्याप्रकरणी मधुकर पिचड यांच्यासह दोघींच्या विरुद्ध न्यायालयात "तक्रार" दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने पिचड यांना २ सप्टेंबर रोजी न्यायालयात हाजीर हो..! चे आदेश दिले आहेत. त्यामुळे, ऐन "निवडणुकीच्या तोंडावर" पिचडांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी "गुन्हा दाखल" होण्याची शक्यता आहे. अशी माहिती वकीलांनी दिली आहे.
पिचड यांची सून राजश्री यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, किरण मधुकर पिचड यांनी आत्महत्या केली असे असले तरी त्याना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले आहे. त्यांचा शारिरीक मानसिक छळ करण्यात येत होता. त्यांच्यानंतर माझा देखील छळ करण्यात आला. माझ्या लहान बाळासह मला घरातून काढून देण्यात आले. त्यांच्याकडून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मला संरक्षण मिळावे असे देखील राजश्री यांनी तक्रारीत म्हटले आहे. किरण पिचड यांचे आत्महत्या प्रकरणी मी २६ आॅगस्ट २०१९ रोजी पोलीस आयुक्त नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. तसेच न्याय मिळावा यासाठी नाशिक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. राजश्री यांच्या तक्रार अर्जाचा विचार करून न्यायालयाने २ नोव्हेंबर २०१९ रोजी यावर सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे या तारखेस साहेबांना पुन्हा न्यायालयाची पायरी चढावी लागणार आहे. याप्रकरणी तक्रारदाराच्या वतीने उमेश वालझाडे यांनी काम पाहिले.

"तर तो निषेध ठरेल"
जसजशी "सत्तेची लालसा" वाढत चालली आहे. तसतसे "लोकशाहीचे पैलू" निकृष्ठ होताना दिसू लागले आहे. ज्यांनी भारताच्या जडण-घडणीत मोलाची कामगिरी केली. त्या राष्ट्रपिता म्हटल्या जाणाऱ्या गांधीजींपासून तर नेहरु घराण्यापर्यंत प्रेम प्रकरणांची उकल करून भाजपने राजकारण केल्याचे आपण पाहिले. त्यामुळे, कदमांसारखे आमदार तरुणांना प्रेम प्रकरणांसाठी प्रोत्साहित करताना दिसू लागले त्याचे भांडवल आघाडीने सुरू केले. या आरोप- प्रत्यारोपात एकमेकांच्या "इज्जतीची लक्तरं" वेशीवर टांगण्यात नेत्यांनी धन्यता मानली आणि त्याहुन दुर्दैव म्हणजे जनतेने चविष्ट मसाला म्हणून ते तोंडी लावू पाहिले. पण यात "विकासाचे मुद्दे" आणि "समाजभिमूख अजेंडे" कोणी मांडायला तयार नाहीत. त्यामुळे, वैयक्तीक व कौटुंबिक विषयांवर हात घालून राजकारण करण्यापेक्षा वैकसिक विषयांचे सामाजकारण केले. तर ते जनतेला रुचेल. अन्यथा पराचा कावळा करून नको त्या गोष्टीचे भांडवल केले. तर, लोक तुमचा कावळा करतील. हे विरोधकांनी विसरु नये. असे आम जनतेला वाटते. त्यामुळे पिचड साहेबांच्या कौटुंबिक कलहाचा विषय सभा गाजविण्यात होत असेल. तर, जनता विरोधकांना डोक्यावर घेऊ शकते तर डोक्याहुन खाली आपटू शकते. हे विसरु नये. असे सुर जनतेतून येत आहेत.जो आरोप झाला आहे. तो खोटारडा आहे. याबाबत पिचड कुटुंबियांनी खंडन केले आहे. उलट काही सबळ पुरावे न्यायालयात दाखल करणार असून खरी आत्महत्या कोणामुळे केली. हे सिद्ध करून देणार आहे. प्रतिष्ठेचा विचार करता. साहेब शांत बसले होते. मात्र, जे केले नाही. ते आरोप का सहन करायचे म्हणून पिचड कुटुंबाने या घटनेला पुन्हा वळण दिले आहे.