*"धामनगाव" पाटमध्ये "पिचड चले जाव" चे नारे, सभेत गदारोळ, साहेब "चालते" झाले..!


अकोले (प्रतिनिधी) :- 
              अकोले तालुक्यातील धामनगाव पाट येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांची सभा उघळून लावण्याचा प्रयत्न केला गेला. साहेब चालते व्हा असे म्हणत, डॉ. लहामटे यांचे नारे देण्यात आले.  त्यामुळे तालुक्यात प्रचंड विरोधाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहेबांना विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून या प्रकारामुळे भाजपला विरोधी वातावरण निर्माण होऊ लागले आहे. इतका विरोध कोणामुळे याचे विश्लेषण आपण करूच. मात्र, अशी परिस्थिती हताळण्यासाठी ज्या नेत्यांना साहेबांनी मलिदे खाऊ घालून मोठे केले. त्यांनी पुर्वनियोजन करणे आवश्यक होते. ते करता आले नाही. त्यामुळे, इतक्या कनिष्ठ पातळीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.

आज गावोगावी  जी परिस्थिती आहे. ती कधी नव्हे अशी दहशत जनतेची निर्माण झाली आहे. त्यामुळे, ज्या पिचड घराण्याने ४० वर्षे तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांना गावा-गावात भर सभेतून बाहेर पडावे लागते. ही सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तालुका सद्या लहामटेमय झाल्याचे दिसत असून सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभा आहे. एक विशेष बाब म्हणजे जी तालुक्यातील मोठी गावे आहेत. तेथून जनता विरोधात असल्याचे दिसत आहे.  जे पिचडांचे लाभार्थी आहेत. त्यांची लॉबी वगळता जनता त्यांच्या सोबत नाही. हे आता स्पष्ट दिसू लागले आहे. साहेब ४० वर्षे काय केले ? हेच प्रश्न पुढे येऊ लागले आहेत. आज मतदानाला ९ दिवस बाकी आहेत. असे असताना ही परिस्थिती असेल तर निवडणुकीच्या दिवशी काय परिस्थिती असेल. ! हे नव्याने सांगायला नको. फक्त हेच वातावरण टिकून ठेवण्यात लहामटे गटाला यश आले तर सोन्याहुन पिवळे होईल. असे बोलले जात आहे.