"मधुकर पिचडांचे "विरोधक" कमी कसे होत गेले..! डॉ. अजित नवले
अकोले (प्रतिनिधी) :-
शिवसेनेच्या काही प्रस्तापितांनी पिचडांशी "तह" केल्यामुळे त्यांना "राष्ट्रवादीच्या रसदी" पुरत होत्या. त्यामुळे पिचडांच्या विरोधातील "संघर्ष" कमी होत गेला. मात्र, "गावगाड्यात" जे शिवसैनिक होते. त्यांनी "अँन्टी पिचड" शिवसैनिकांना न जुमानता स्थानिक पातळीवर विरोध कायम ठेवला. हिच "तळागाळातील शिवसेना" येथे "कट्टर विरोधक" म्हणून आजही कार्यरत आहे. बाकी "सद्यस्थितीत" कोण नेते कोणाच्या "ताटाखालची मांजरे" आहेत. हे नव्याने सांगायला नको. ती नावे न घेताच "जगजाहीर" आहेत. अर्थात राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी कधी रस्त्यावरच्या चळवळी केल्या नाही. फक्त विरोधी पक्षातूून जे "कट्टर विरोधक" आहेत. त्यांना "सत्तेची लालूस" दाखवून गप्प करायचे किंवा स्वत:च्या पक्षात ओढून घ्यायचे. हाच या दोन्ही पक्षांचा इतिहास आहे. यांचा वैचारिक "पिंड" नाही. मात्र, "संस्था व कारखानदारी" यांच्या माध्यमातून पक्षाला बळ द्यायचे. असेच पक्ष वाढत गेले. राष्ट्रवादी पक्षाचा विचार करता. त्यांना युवकांचे संघटन बांधता आले नाही. ठराविक तरुणांची मक्तेदारी आजही यांच्यात आढळून येेते. तर, काँग्रेसला तरुणाईचा चेहराच मिळाला नाही. याऊलट शिवसेना, मनसे यांच्याकडे तरुण तत्काळ आकर्षीत झाले. मात्र, या पक्षांनी देखील चळवळींचा पाया उभा केला नाही.

दुसरीकडे खऱ्या अर्थाने कम्युनिष्ट, मार्क्सवाद, दलित समुदाय, आदिवासी फोर्स, अल्पसंख्यांक मुस्लिम यांच्या "सामाजिक फोर्स" पुढे येत होत्या. तर एकीकडे राष्ट्रीय सेवादल, व पत्रकार यांनी खऱ्या अर्थाने चळवळी जिवंत ठेवल्या6. पण, आता जर परिवर्तन आवश्यक असेल तर या फोर्सने आयडेन्टीटी पॉलिटिक्सच्या पलिकडे जाऊन जमीन, रोजगार, अल्पलंख्यांक, महिला अत्याचार, शिक्षण यांचे प्रश्न घेऊन वैचारिक संघर्षाशी तडजोड न करता १० ते १५ वर्षे प्लॅन करुन मार्क्सवादाप्रमाणे चळवळी केल्या. तर भावी काळ हा पुन्हा पुरोगामीत्वाकडे वाटचाल करणारा असेल. असे मला वाटते.
सन २००९ नंतर सीपीएम (मार्कवादी) अकोल्याच्या राजकारणात उतरले. तेव्हा "तुळशिराम कातोरे" यांनी एसटी समाजाकडून पहिल्यांदा उमेदवारी केली. त्यांना ७ हजार २०० मतदान पडले होते. तर दुसऱ्यांदा २०१४ साली नामदेव भांगरे यांनी उमेदवारी करून ९ हजार मिळविली होती. विशेष म्हणजे २०१४ साली देशात प्रचंड मोठी "मोदीलाट" होती. तरीदेखील मार्क्सवादाच्या मतांचा आकडा वाढता होता. ही उमेदवारी देण्यामागे काही कारणे होती. एकीकडे आम्हाला "तडजोड नको" होती. तर दुसरीकडे पिचडांच्या विरोधात सगळे "संधीसाधू" उभे राहत होेते. त्यामुळे "फितुर आणि प्रस्तापित" यांना पर्याय म्हणून २००९ ते १४ या निवडणुका लढविल्या गेल्या.
त्यापुर्वी म्हणजे २००५ साली अकोल्यात किसानसभेची स्थापना झाली होती. त्यातून शेतकरी, दारिद्ररेषा, पेन्शन यांच्या न्यायी हक्काची लढाई सुरू झाली. तर दुसरीकडे घरकुल, अंगणवाडी, दारिद्र्य, ग्रामपंचायत कर्मचारी, विधवांचे प्रश्न यातून चळवळ उभी रहात गेली. तद्नंतर रंगनाथ मालुंजकर, रंगनाथ भोर, विजय वाकचौरे अशा वैचारिक ठेवण असणाऱ्यांनी दुध, पाणी, कॉनॉल यांचे प्रश्न पुढे आले. त्यातून देखील मोठी चळवळ उभी केली. त्या माध्यमातून माझ्याकडे राज्याचे नेत्रुत्व आले. नंतर कारखाना, लाँगमार्च, किसान मार्च यांच्या माध्यमातून २०८ संघटना एकत्र केल्या. त्याचे देखील नेत्रुत्व करण्याचे भाग्य मला लाभले.
काही कालांतराने काळ बदलत गेला. दहा-दहा हजारांचे मोर्चे अकोल्यात निघू लागले. मात्र, त्याचे रुपांतर मतात उतरले नाही. याला स्थानिक गोष्टी जबाबदार नाहीत. तर, देश आणि राज्य पातळीचे राजकारण त्याला कारणीभूत आहे. येथे कितीही मोठे मोर्चे काढा. पण, देशात जे कोणते सरकार असेल. त्याचे धाेरण चांगले वाटले. की, सगळी चळवळ त्या पक्षाला झुकते माप देते. तेव्हा देशाच्या अस्मितेचा प्रश्न पुढे येतो. तेव्हा दारीद्री, रेशन, फायदा, योजना, शुल्लक वाटू लागतात. मी उपाशी मेलो तरी चालेल, पण देशाभिमान गहान राहता कामा नये. अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी मोर्चे गर्दीला दिसले. पण, दर्दी होण्याची वेळ आली तर. दर्दी कोणी दिसले नाही. यातूनच आयडेन्टीटी पॉलिटिक्सचा उगम झाला. राष्ट्रीय अस्मितेचे राजकारण सुरु झाले. जसे अकोल्यात खूप जणांना वाटते भाजप नको आहे. मात्र ३७० कलम रद्द केल्याने अनेकांना मंदी, नोटबंदी असे काेणतेही ईशू वाटत नाही. तर, देशात जम्मू काश्मिर कायम केल्याने आनंदाने अनेकांची "मते डायव्हर्ट" होणार आहे. अशावेळी चळवळींनी कितीही मोठे मोर्चे काढूद्या. लोक चळवळीला नाही. तर भारताच्या आस्मितेला मतदान करतील हे आम्ही जवळून अनुभविले आहे. याला पर्याय म्हणून शेतकरी अस्मिता म्हणून शेतकऱ्याचा मुलगा अशा अस्मिता पुढे आणाव्या लागतील. तरच पुन्हा पुरोगामी महाराष्ट्र उभा राहिल. नाहीतर...
संपादकीय... डॉ. अजित नवले यांच्या रुपाने अकोल्याच्या मातीला खरा चळवळीचा चेहरा मिळाला. तो ही मार्क्सवादीसारखा. कधी न तडजोड करणारा. त्यांच्यामुळे अकोल्याच्याच नाही. तर देशाच्या चळवळीचा इतिहास आपल्याला वाचायला मिळाला. "जो इतिहास विसरतो, तो कधीच इतिहास धडवू शकत नाही" असे म्हटले जाते. आणि या मातीने नेहमी इतिहास घडविणारे सुपुत्र जन्मा घातले आहे. म्हणून असे ऐतिहासिक लेख आम्ही तरुणांना प्रेरणा देण्यासाठी मांडत आहोत. कॉ. दशरथ सावंत, कॉ. शांताराम वाळुंज व कॉ. डॉ. अजित नवले या सर्वांचे सार्वभौम पोर्टलच्या व वाचकांच्या वतीने मनस्वी आभार.!!====================
"सार्वभाैम संपादक"
- सागर शिंदे
8888782010
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५० दिवसात ९६ लेखांचे ५ लाख २७ हजार वाचक)
----------------------