"वाघापुरात" भावनेंचा "महापूर"; "मी" नाही "तुम्ही उमेदवार" म्हणून "लढा"..! बाळासाहेब थोरातांच्या "गावसभा" सुरू....

विरोधक टपून आहेत; औंदा साथ द्या !!

संगमनेर (प्रतिनिधी):- 
                       राज्याचे "काँग्रेस प्रदेश अध्यक्ष" पद मिळाल्यामुळे "जबाबदाऱ्या" खुप वाढल्या आहेत. पक्ष सोडून गेलेल्यांना "मनस्ताप" होणार आहे. ज्यांनी 'वर्षानुवर्षे' जागा आवटून ठेवल्या होत्या.  त्यांच्यामुळे जनता देखील कंटाळली होती. मात्र, "बंडखोरीमुळे" बहुतांशी जागा रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे कर्तुत्वाना युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी अनेकजण भेटायला येतात. परंतु, यामुळे संगमनेरकडे "वेळेअभावी" थोडेसे "दुर्लक्ष" होत आहे. याचाच गैरफायदा घेऊन आपल्या संस्था व "सहकाराला" असलेले "आमदारकीचे कवच" काढुन घेण्याचा प्रयत्न विरोधक करू पाहत आहे. असा टोला "विखेंचे" नाव न घेता "थोरतानी" लगावला. संगमनेरमधील प्रत्येक गावात आणि शहरात आपण विकास केला आहे. त्यामुळे  तालुक्यातील "संपूर्ण" जबाबदारी "कार्यकर्त्यांवर" आहे. माझे काम करताना "तुम्ही स्वतः उमेदवार आहे" असे समजून काम करण्याचे "निर्देश" थोरातांनी कार्यकर्त्यांना दिले.

आम्हीही येतोय गावभेटीला !!

                 ते पुढे म्हणाले की; कठीण परिस्थितून काँगेसला बाहेर कसे काढायचे. हा काँग्रेससारखा अनुभव कोणालाच नसेल, काँग्रेसच्या "कठीण काळात" मला "संधी" मिळाली आणि ती "जबाबदारी" तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी देखील उचली. याचा मला "अभिमान" वाटतो. "शैक्षणिक, समाजिक, सहकार, अर्थकारण" हे महाराष्ट्रात "सर्वात उज्वल" संगमनेरचे आहे. तेव्हा तुम्ही कुठल्याही "अमिशाला बळी पडु नका". असे कार्यकर्त्यांना विनम्र आवाहन केले.  प्रकृती ठिक नसतानाही "नियोजित दौरा" त्यांनी सुरूच ठेवला. त्यांचा "उत्साह" तरुणांना लाजवेल असा होता. जिल्ह्यातील व तालुक्यातील "मोठी-मोठी पदे" पंचकृषित असताना "जोर्वे" गटातील जिल्हा "परिषद व पंचायत समिती" व लोकसभेला विरोधात गेलेली मते चिंताजनक आहे. अशी "खंत" त्यांनी यावेळी बोलून दाखविली. गावा-गावातील "काँग्रेसचेच दोन गट" ही फार मोठी समस्या संगमनेरच्या नेतृत्वापुढे आहे. एकमेकांच्या  "जिरवा-जिरवीच्या" राजकारणात एक गट आपोआपच नाराज होऊन विरोधकांच्या गळाला लागतो. त्याचा परिणाम "थेट मतदानावर" होतो. या बाबीकडे "दुर्लक्ष" करून चालणार नाही. असे ते म्हणाले.
           यावेळी उपस्थित "अमृतवाहिनी बँकेचे संचालक" नानासाहेब शिंदे, "सहकार महर्षी" भाऊसाहेब संतुजी थोरात कारखान्याचे चेरमन माधवराव कानवडे, "राजहंस दुध संघाचे चेरमन" रणजित देशमुख, "कारखान्याचे संचालक" बाळासाहेब शिंदे, "शारदा पतसंस्थेचे चेरमन" सुनील शिंदे, "जयदुर्गा पतसंस्थेचे" चेरमन कैलास पानसरे, संजय साबळे, साबळे सर,  रमेश गफले, वाघापूर ग्रामपंचायतचे सदस्य विनोद घोलप, पोपट आव्हाड, संदिप जोर्वेकर आदि उपस्थित होते.

एक उमेदवार, लाख उमेदवार !!!

         दरम्यान ना. विखे यांनी आपली भुमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे अधिक उमेदवार उभे राहण्यापेक्षा थोरातांच्या चाली भुईसपाट करायचा मानस विखेंनी आखला आहे. त्यामुळे "थोरात यांनी जोरात" प्रचार सुरु केल्याच्या चर्चा संगमनेर सोशल मीडियावर रंगल्या आहे. तसेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की; मागासवर्गीय व्यक्तींनी थोरातांच्या जातीय राजकारणाला नाकारुन वंचित बहुजन आघाडीला पसंत केले आहे. जर हेच वातावरण कायम राहिले. तर, संस्था, सहकार आणि व्यापारी यांच्या जिवावर त्यांना निवडून येणे अशक्य आहे. त्यामुळे वंचितांची मनधरणी, बहुजनांचे संघटन आणि मुस्लिम समाज्याची मते. ही आपलीसी करण्यात थोरात अपयशी ठरले तर निवडणुकीत देखील काय होईल. हे, नव्याने सांगायला नको. असे राजकीय विश्लेषकांना वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे. असे म्हटले जाते की; विरोधाला पहिली सुरूवात घरातून होते. अगदी तीच म्हण साहेबांच्या बाबतीत अगदी "तंतोतंत मिळती-जुळती" ठरली आहे. कारण, खुद्द थोरातांच्या जोर्वे गटातूनच त्यांना एका अर्थाने विरोध झाल्याचे दिसले. त्याचे प्रतिबिंब झेडपी निवडणुकीत काय झाले हे सर्वद्न्यात आहे. त्यामुळे गावातील सोडा. संपुर्ण तालुक्यात या प्रश्नावर त्यांना उत्तर शोधावे लागणार आहे. असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

माझ्यासारखं व्हायला नको.!! काळजी घ्या !!

       तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे. थोरात यांच्या खांद्यावर राज्याची धुरा दिली आहे. ती चोखपणे पार पाडण्याचे धैर्य त्यांनी अंगी बाळगले आहे. पण, त्यांनी भाषणात सांगितले की; मी उमेदवार नाही तर तुम्ही स्वत: आहेत. असे म्हणून प्रचार करा. कोणत्याही अमिशाला बळी पडू नका. सेम हेच संदेश बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. आंबेडकर यांनी स्वत:च्या मतदारसंघात तुर्तास लक्ष घालून राज्यात हेलिकॅप्टरने दौरे करीत बसले. परिणामी दोन्ही जागांना मुकावे गालले. "हातचे दिले सोडून, आणि धावत्याच्या मागे  लागले", शेवटी लोकसभेला अकोला व सोलापूर या दोन्ही मतदारसंघातून त्यांना हार पत्कारावी लागली. त्यामुळे या घटनेची पुनराव्रुत्ती होऊ नये. यासाठी साहेबांनी काळजी घ्यावी. असे त्यांच्याच समर्थकांना वाटते आहे. 
            त्यामुळे सारासार विचार करता. साहेब योग्यत्या उपायोजना करतील अशी आपेक्षा काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
==================

       -- सुशांत पावसे  

       -----------------------
             सायंकाळी वाचा
"पांढरपेशी" डॉक्टरांची "पांढऱ्या पेशींवर" कमाई..! बाप्पा यांना सद्बुद्धी दे..! सरकारी दवाखाने "व्हेंन्टीलेटरवर"..!
 ====================
             "सार्वभाैम संपादक"
                 

              - सागर शिंदे 

              8888782010

               -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५१ दिवसात ९७ लेखांचे ५ लाख ३० हजार वाचक)
----------------------