"१९७८ ची "पुनराव्रुत्ती" ७८ वर्षाच्या "पवारांनी" केली. तर, "आख्खे राष्ट्रवादीचे भाजपे साहेबांच्या पायी लोटांगण घालतील. "पुलोद नंतर शिराकॉम पॅटर्न"

कसे जुळवावे गे गणित !!

अकोले (प्रतिनिधी) :- 
              "आता गरज नाही, चल फुट" असली "पक्षनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा" राजकारणात पहायला मिळत आहे. ज्यांना शरद पवार यांनी बोटाला धरुन राजकारणात आणलं. त्यांनी गरज संपल्यावर कशा "टुन्नुक" उड्या मारल्या. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या. कालवर पवार साहेब "काळजात" होते आणि आता "डोक्यात" घुसू लागले. ही आमची "स्वामिनीष्ठा" होय. तर भाजपने "मेघा भरती" काय काढली आणि राष्ट्रवादीचे १९ पक्षनिष्ठ भरतीला काय उतकले.  इतकी "राजकिय कॉम्पिटीशन" पहायला मिळाली. इतकेच काय. तर, "मुख्यमंत्री" पदासाठी देखील "मैत्रीला तडे" जाऊ लागले. एकीकडे सत्तेसाठी धडपड तर दुसरीकडे जागांसाठी. त्यामुळे सगळा "सावळा गोंधळ" तयार झाला आहे. भाजपने "मुख्यमंत्री" पदासाठी "बकासुरासारखे" विरोधी पक्षाला खाल्ले. त्यामुळे पवार साहेबांसारख्या जाणत्या राजाला कळेना. की ! घड्याळाचे काटे उलटे फिरलेच कसे. त्यामुळे त्यांची "चिडचिड" वाढली. पण, वाघ म्हातारा झाला नाही. हे त्यांनी स्पष्ट करून स्वत: मैदानात येऊन विधानसभेचे कठिण जंगल पार करण्यासाठी वाट काढणे सुरू केले आहे. त्यांचे वय ७८ नाही. तर, डॉ. कोल्हे, मिटकरी व मुंढे  यांच्या "समसमान" तोलावे लागेल. इतका उत्साह दिसत आहे. जे सोडून गेले. त्यांनी लक्षात ठेवा. जर  ४० वर्षापुर्वी म्हणजे १९७८ सारखे "शस्र" पवारांनी बाहेर काढले. तर, सगळी भाजप "विरोधीपक्ष" म्हणून काम करताना दिसेल. तर, जे राष्ट्रवादीत आमदार होते. ते देखील सत्तेपासून दुर दिसतील. हा "पवार पॅटर्न" म्हणून नाद "खुळा" होईल. असे बोलले जात आहे.

ठरवलं तर दोन मिनिटाचा खेळ

            दि. १२ डिसेंबर १९४० रोजी "वर्तमानाच्या गर्भात" धुरंधर राजकारणी "जाणत्या राजाचा" जन्म झाला. त्या दिवसापासून तर आजवर ७८ वर्षाच्या काळात अनेक "चढ-उतार" त्यांनी अनुभविले आहे. हारलेल्या बाजुला पलटी मारून "बाजीगर" कसे व्हायचे. हे धडे त्यांनी राजकारणातच अनुभविले होते. म्हणून तर १८ जुलै १९७८ साली ते अवघ्या ३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण, आता त्यांना मंत्री, मुख्यमंत्री व्हायचे नाही. तर, ज्यांनी पाठीत वार केले. त्यांचे राजकारण संपवायचे आहे. तेव्हाची परिस्थिती काय होती.!! सन १९७८ साली जेव्हा आणीबाणी उठली तेव्हा महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस विधानसभेला अलिप्त लढल्या. त्यात रेड्डी काँग्रेसला ६९ जागा, इंदिरा काँग्रेसला ६२, जनता पक्षाला ९९, शेतकरी कम्युनिष्ठ पक्ष १३, माकप ०९ व ३९ जागा अपक्ष आल्या होत्या. तेव्हा जनता पक्षाला "बहुमत" सिद्ध करता आले नाही. म्हणून वसंतदादा पाटील यांनी रेड्डी व गांधी यांच्यात एकोपा करुन ७ मार्च १९७८ ला सरकार स्थापन केले होते. तेव्हा शरद पवार त्यात "उद्याेगमंत्री" होते. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे आणि वसंत दादा याचे टिपन बसत नसे. त्यांना कंटाळून  पवारांनी सर्वात मोठी चाल खेळली. त्यावेळी  ४० आमदारांसह सत्तेतून बाहेर पडले. परिणामी सरकार अल्पमतात आले.  वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाहून खाली खेचले गेली. दरम्यान (सन १९७८) जुलै महिन्यात विधीमंडळाचे "पावसाळी अधिवेशन" सुरू होते. पवार साहेबांच्या या अचानक निर्णयामुळे अवघ्या साडेचार महिन्यात सरकार पायऊतार झाले.

काऊंट...डावून.....सुरू


           अर्थात पवार साहेबांनी सत्तेसाठी दादांच्या "विश्वासाला तडा" दिला. त्यात सुशिलकुमार शिंदे देखील भागिदार होते. या सगळ्यांनी मिळून "समाजवादी काँग्रेसची" निर्मिती केली. त्याचे अध्यक्ष दादासाहेब रुपवते होते. या सर्वांनी "जनतादलाशी" बैठक घेऊन आजच्या "भाजपच्या पाठींब्याने" सरकार स्थापन केले. तेव्हा एस. एम. जोशी यांनी पवारांचे स्वागत करुन नेतृत्व मान्य केले होते. अखेर, १८ जुलै १९७८ रोजी "पवार प्रणित भाजपची सत्ता" महाराष्ट्रात आली. यात समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप व कम्युनिष्ठ पक्ष यांनी मिळून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन करुन वयाच्या ३८ वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. दरम्यान, केंद्रात पुन्हा काँग्रेस आले आणि जनतापक्षात फुट पडली. परिणामी १७ फेब्रुवारी १९८० साली राष्ट्रपतींनी पुलोद सरकार बरखास्त करून तेथे "राष्ट्रपती राजवाट" लागू केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात १९८० ला पुन्हा निवडणुका झाल्या तेव्हा शरद पवारांच्या "समाजवादी काँग्रेस" पक्षाचे "आजच्या राष्ट्रवादी सारखे "हाल बेहाल झाले. तेव्हा अब्दुल रेहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तब्बल ६ वर्षे पवार साहेब "विरोधी पक्ष" म्हणून कार्यरत होेते.

हे शक्य आहे राव !

           आता या इतिहासाचे आजच्या काळात सरळ-सरळ विश्लेषण केले तर काय सारांश निघतो. हे आपल्या लक्षात येईल की, आज भाजप स्वबळावर लढविण्याचे नारे देऊ लागले आहे. का ? तर केवळ जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदासाठी. तर शिवसेना देखील याच गोष्टीसाठी भाजपला डिवचाळत आहे. याचाच फायदा घेत जर युती तुटली. तर भाजप जड असली तरी शिवसेना कमी नाही. त्यामुळे भाजप सर्वात मोठा पक्ष नक्कीच असेल. मात्र, कोणाचीही एकहाती सत्ता येईल असे राज्यात वातारण नाही.  त्यामुळे, महायुतीत खोडा घालून  शिवसेना अलिप्त लढली तर... सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व मित्रपक्ष यांनी ठाकरे यांना पाठबळ देऊन महाराष्ट्रात "शिराकॉम" चे सरकार स्थापन होईल. परिणामी भाजपकडे जास्त आमदार असले. तरी, "हतबलतेने" विरोधीपक्ष म्हणून बसावे लागेल. याचा सर्वात मोठा फायदा राष्ट्रवादीला असा असेल की; ज्यांनी सत्तेच्या लालसेपटी भाजपत प्रवेश केला. ते पुन्हा लंकेची पार्वती होतील. असे झालेच तर राज्याच्या इतिहासात पुन्हा एक मोठी नोंद होईल.

आमचं कसं ! पवार साहेब करतील तसं 

                  
          यासाठी महायुती होते की नाही. यावर बहुतांशी गोष्टी डिपेंड आहे. पवार साहेबांनी १९७८ साली भाजपची (जनतादल) साथ घेऊन सरकार स्थापन केले होते. आता शिवसेनेची साथ घेऊन भाजप पाडले तर बिघडलं कोठे ?
                    आता या इतिहासाचे आजच्या काळात सरळ-सरळ विश्लेषण केले तर काय सारांश निघतो. हे आपल्या लक्षात येईल की, आज भाजप स्वबळावर लढविण्याचे नारे देऊ लागले आहे. का ? तर केवळ जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदासाठी. तर शिवसेना देखील याच गोष्टीसाठी भाजपला डिवचाळत आहे. याचाच फायदा घेत जर युती तुटली. तर भाजप जड असली तरी शिवसेना कमी नाही. त्यामुळे भाजप सर्वात मोठा पक्ष नक्कीच असेल. मात्र, कोणाचीही एकहाती सत्ता येईल असे राज्यात वातारण नाही.  त्यामुळे, महायुतीत खोडा घालून  शिवसेना अलिप्त लढली तर... सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व मित्रपक्ष यांनी ठाकरे यांना पाठबळ देऊन महाराष्ट्रात "शिराकॉम" चे सरकार स्थापन होऊ शकते. परिणामी भाजपकडे जास्त आमदार असले. तरी, "हतबलतेने" विरोधीपक्ष म्हणून बसावे लागेल. याचा सर्वात मोठा फायदा राष्ट्रवादीला असा होईल की; ज्यांनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपत प्रवेश केला. ते पुन्हा लंकेची पार्वती होतील. असे झालेच तर राज्याच्या इतिहासात पुन्हा एका "शिराकॉम" (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे) ची नोंद होईल.

तुम्ही ठाम रहा फक्त, मुख्यमंत्री तुमचाच

          यासाठी महायुती होते की नाही. यावर बहुतांशी गोष्टी डिपेंड आहे. आणि ती होऊ द्यायची कि नाही. हा गणिमी राजकारणाचा विषय आहे. पण, पवार साहेबांनी १९७८ साली भाजपची (जनतादल) साथ घेऊन पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) सरकार स्थापन केले होते. आता शिवसेनेला साथ देऊन "शिराकॉम" (शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे) स्थापन करून भाजप व पवार साहेबांना काळजात ठेऊन फुटीर आमदार विरोधीपक्षात बसविले तर बिघडलं कोठे ? असे झाले तर, "साप भी मरजाऐं, और लाठी भी ना टुंटे" असे चित्र पहावयास मिळेल.
        अर्थात हे वाटते तितके सोपे नाही. भाजप काय उन्हाने म्हतारा झालेला पक्ष नाही. आरएसएसचे हजारो चाणक्य त्यांच्या दिमतीला आहे. एकवेळी थोडे झुकते माप ठेवायचे. मात्र, शिवसेेनेला नाराज करायचे नाही. त्यामुळे केंद्रात देखील शिवसेनेला सन्मान दिला आहे. भाजप शिवसेनेपेक्षा पवार साहेबांच्या राजनितील घावरते. हे महाराष्ट्राला नव्याने सांगायला नको. आता एक शेवटची गोष्ट ती म्हणजे भाजपला पायउतार करण्यासाठी वंचित आघाडी भाव खाऊन गेली. अशा वेळी भाजपला काही आमदारांची गरज पडली तर वंचितने भाजपला पाठिंबा दिला तर कोणाला नवल वाटू देऊ नका. अर्थात "शिराकॉम" या सर्व जर, तरच्या गोष्टी आहेत. हे होणे शक्य नाही. तरी ते अशक्य देखील नाही. असे विश्लेषकांना वाटते.

 --  सागर शिंदे - ८८८८७८२०१०

 ===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६९ दिवसात १२२ लेखांचे ६ लाख ५० हजार वाचक)