अजित पवार यांचा पिचडांवर शब्दसंहार काय म्हणाले दादा काय दिली अश्वासने ? जसेच्या तसे भाषण...
अकोले (प्रतिनिधी) :-
ज्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे स्वागत. राघोजी भांगरे यांनी विनम्र आभिवादन.भारतात देवदेवतांची स्वागत करण्याची परंपरा आहे. पण, उद्याच्या काळात लोकशाहीच्या उत्सवाचे स्वागत करायचे आहे. त्यात भाजपचा आपल्याला पराभव करायचा आहे. अकोल्यात आल्यावर माझ्या परिने येथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. भंडारदरा व निळवंडे यांचे काम करण्याचे अश्वासन दिले. पण, याचे काम खऱ्या अर्थाने आपण केले आहे. मला तुम्ही उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेले. या परिसरातील पिपळगाव खांडचे काम नियमात बसत नव्हते ते खाजगी बाबीतून पुर्ण केले.
अंबित वैगरे ही कामे आपण केली. अधिकारी म्हणत होेते. नियमात बसत नाही. मी म्हटलं कसे बसत नाही. बसवायचे आहे. हे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही केले. या वयात पवार साहेब जनतेसाठी काम करतात. तरुण व महिलांसाठी आपल्याला संधी द्यायची आहे. आज ज्यांनी पक्ष बदलला त्यांना साहेबांनी काय कमी केले. मंत्रीपदे, स्थानिक स्वराज्य संस्था, विरोधी पक्षनेतेपद दिले. नगर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद तुम्हाला दिले. पवार साहेबांनी काय कमी केेले. केवळ बळ देण्यासाठी. तरी पवार साहेबांना दगा देण्याचे काम यांनी केले. मात्र, याला तोंड द्यायला तुम्ही स्थानिक पातळीवर बैठका घेतल्या. एकास एक उमेदवार द्यायचा. ते कायम ठेवा. तुम्हाला अमिष दिले जाईल. कारण, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जर माझ्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर ज्या गावच्या बोरी आहेत. त्याच गावच्या बाभळी आहेत. हे विसरु नका. काही दिवसांपुर्वी ते म्हणाले आम्ही काळा चष्मा काढला तेव्हा सत्य समोर आले. वा रे दिवट्या. ४० वर्षे सत्ता दिली. काय केले. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या भागात कारखानदारी उस भाव ३३ शे टनाने दिला आहे. संस्था चालवायच्या असतात. लुटायच्या नसतात. स्वत:च्या तुंबड्या भरायच्या नसतात.
पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली. हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. हे सरकार पोपटासारखे बोलतात. यांनी चांगली कामे केली असती तर यांच्यावर कोणी शाई फेकली नसती. कोणी यात्रांवर कडकनाथ कोंबड्या फोकल्या नसत्या. काल, यात्रा काढली तर सामान्य कार्यकर्त्यांना हुकूमशाहीने डांबले गेले. अकोलेकरांनी ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी उभे रहा. दिवसा एक, रात्री एक असे करू नका. म्हतारे तुम्हाला रडून भावनिक करतील. त्याला बळी पडू नका. नोटबंदी, कर्जमाफी, बेरोजगारी, शेतकऱ्याची फसवणूक केली. लोकांना गाजरे दाखविली. भारतात पाकचा कांदा आणत आहे. साखर आणतात. ती कशी गोड लागते. केवळ अस्मितेचा प्रश्न पुढे आणतात व दिशाभूल करतात. सरकारचे कोट्यावधी रुपये काही लोक बुडवितात व पळून जातात. मात्र, कर्जासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. गायकरांवर बोला असा आवाज जनतेतून आला तेव्हा ते म्हणाले, २१ तारखेला राष्ट्रवादीचे योग्य बटन दाबा. मग त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देऊ. अकोल्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. जे राष्ट्रवादीत आले त्यांनी एकीत रहावे. हे महत्वाचे आहे. ५४ वर्षात २ लाख ५० लाख आम्ही काढले तर ५ वर्षात २ अडिच कोटीचे कर्ज काढले. घोटाळा नाही म्हणता. मग चिक्कीचे काय झाले, सावरांचे काय झाले, खडसेंचे काय झाले, कांबळे यांचे काय झाले.? हा भ्रष्टाचार नाही तर काय?
त्यामुळे उद्याच्या काळात परिवर्तन हवे आहे. गाफील राहु नका. हलक्या कानाचे राहु नका. तुमच्यातच काही गुप्तहेर सोडले जातीत. त्यांचे काही एकू नका. आम्ही मंत्रालयात होतो तर जनतेची कामे सुटत होती. आता, त्याच मंत्रालयात लोक आत्महत्या करू लागले आहेत. १६ शे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आया बहिनींचे कुंकू पुसले. रोजगार, पोलीस भरती, कारखाने, एमआयडीसी हे प्रश्न सुटायला तयार नाही. भिमा कोरेगाव, दाभोळकर हत्याकांड, यामागचे मास्टरमाईंड काेण ?
आमचे सरकार आले तर प्रत्येक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल. असे झाले नाही. तर पवारांची औलाद नाही सांगणार, रोजगार देणार, साखर, दुध यांना योग्य भाव देणार. ज्यांना धार काढायची माहित नाही. हे बोलघेवडे आहेत. हे सरकार गडकोटांवर लग्न समारंभ व दारुच्या बाटल्या रुजू पहात आहे. आज महाराष्ट्रात फिरताना प्रश्नांवर कोणी बोलायला तयार नाही. आपलं सरकार आलं तर अकोल्यात एमआयडीसी आणू. आता मी अकोल्यात आलोय. पण २४ तारखेला मी बारामतीचा गुलाल घेणार नाही. पण, अकोल्याचा गुलाल घ्यायला येईल. मी शब्दाचा पक्का आहे. मी येणाऱ्या पाच वर्षात जास्त कामे करेल. कोणी गयावया केले तरी भावनेला बळी पडू नका. हीच विनंती आहे. उद्या मीडियाबाजीत आपण दिसलो नाही. तर समजू नका की हवा कमी आहे. आपल्याकडे कष्टाचे पैसे आहे. हारामाचे नाही. म्हणून ते उधळायचे नाही. अकोल्यातील पहिले पाणी तुम्हाला नंतर बाकी लोकांना. त्यामुळे पाण्याचा प्रश्न पुढे येऊ देणार नाही. मला कळले काही लोक अजित दादांचे भाषण काना कोपऱ्यातून एकतात. हिंमत असेल तर समोर येऊन एका असे दादांनी खडसावले. यावेळी समारोपात पत्रकार रियाज सय्यद यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली."सर्वात फास्ट"
सागर शिंदे - ८८८८७८२०१०
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६९ दिवसात १२२ लेखांचे ६ लाख ५० हजार वाचक)