"मजबुर कम्युनिष्ट" व "लाचार शिवसैनिक" पिचडांच्या "गळाला कसे लागले"..!! डॉ. अजित नवले...

"मार्क्सवादी पुरस्कर्ते"

अकोले (प्रतिनिधी) :-
                 जेव्हा "कम्युनिष्ट चळवळ" स्वतंत्र विचारसारणीची होती. तेव्हा अकोल्यात तिचे "प्राबल्य" होते. मात्र, स्थानिक नेत्यांनी जसजसे राज्य पातळीवरील "काँग्रेस सलगीचे धोरण" अवलंबविले. तसतसे अकोले तालुक्यात तडजोडीचे राजकारण सुरु झाले. जर एखाद्यावेळी राज्याचा काही काॅल आला. तर, देशपातळीचे मुद्दे घेऊन लढाई करायची. मात्र, "मधुकर पिचडांच्या सत्तेला आव्हाण" द्यायचे नाही. कारण, त्यांनी "मोर्चासाठी गाड्या" दिलेल्या असतात, अन्य "रसद" पुरविलेली असते, पंचायत समिती, झेडपी, कॉलेज यांच्यात प्रतिनिधित्व दिलेले असते. त्यामुळे "जेथे तडजोड आली, तेथे संघर्ष कमी होतो". हेच "तत्व" चळवळीचा नायनाट करायला पुरक ठरत गेेले.

धुरंधर राजकारणी व्यक्तीमत्व

                       या "लाचारी" पणामुळे चळवळीत "जीव" होता. मात्र "ताकद क्षीण" झाली होती. या कारणास्तव राजकीय "माजोरी" आणि "मुजोरी" वाढत गेली. पिचडांना विशेष असा कोणी विरोधक राहिला नाही. मात्र, हा सर्व प्रकार गावोगावी तरुणांच्या मनाला रुजला नाही. पाटीलकी, सावकारी, बडे घराणे हे सत्ताधाऱ्यांच्या "ताटाखालची मांजरे" होती. तरी त्यांचा "मिजास" गाव पातळीवर काही औरच होता. हाच "तोरा" तरुणाईच्या डोळ्यात "सलत" होता. म्हणून एक विरोधक म्हणून गावागावात "प्रस्तापितांना पर्याय" उभे रहात गेले. म्हणजे, १९८० ते ८५ च्या दशकात "बाळासाहेब ठाकरे" यांच्या "प्रेरणेने नव्हे" तर प्रस्तापितांना विरोध म्हणून "विडी कामगार व किसान सभा" यांच्या कार्यकर्त्यांची मुले "पर्यायी पक्ष" म्हणून शिवसेनेत दाखल झाले. तेव्हापासून ०५ हजार ते आजवर ४५ हजार मतदान यांनी "पिचड विरोधक" म्हणून शिवसेनेच्या रुपाने उभे केले. त्यानंतरच्या काळात शिवसेना ही लढाऊ फोर्स म्हणून उदयास आली. जर "प्रस्तापित पिचडांना शह द्यायचा असेल" तर सगळ्या संघटना व समित्या एक करुन प्रतिनिधीत्व करण्याचे काम शिवसेनेेने केले. मात्र, पिचडांचा पराभव करण्यात त्यांना आजवर यश आले नाही. त्याची पुटीरवादी कारणे आपल्याला माहित आहेतच.

जिंदाबाद ...! जिंदाबाद !!!

           या सर्व परिस्थितीत मी २००० पुर्वी पुण्यात शिक्षण घेत होतो. तेथे "मार्क्सवाद" प्रणित "स्टुडंण्ट फेडरेशन आॅफ इंडिया" (एसएफआय) या संघटनेचा माझ्यावर प्रभाव होतो. तेथील शिक्षण पुर्ण झाल्यानंतर आम्ही "अकोल्यात आगमन" केले. येथे "एसएफआयची" स्थापना करून "रवींद्र भवर" यांना पहिले अध्यक्ष केेले. त्यावेळी आमची "तत्व" ठाम होती. कोणत्याही "सत्ताधाऱ्यांशी तडजोड" करायची नाही. "धर्मांध व जातीय शक्तींना थारा द्यायचा नाही". कोणत्याही पक्षाची "लाचारी" स्विकारायची नाही. जे काही करायचे ते "स्वबळावर" करायचे. कोणाला "शरण" जायचे नाही. हाच खरा "मार्क्सवाद" अकोल्याच्या मातीत पहिल्यांदा आम्ही रुजविला. याचा परिणाम असा झाला की; शिवसेनेच्या मुळ अस्तित्वावर "बालंट" ओढू लागले. त्यांचे बळ कमी होतेय हे लक्षात येताच त्यांनी "सत्ताधारी" सोडून "मार्कवादावर" (एसएफआय) हल्ला केला. "शिवसेनेचे प्रभुत्व" कमी व्हायला नको म्हणून सतिश नवले, बाळा नवले यांनी आमच्यावर "हल्ले" केले. कारण, शिवसेनेच्या "जातीयवादात घुसून" त्यांच्याशी दोन हात करण्याची आमची "ताकद" होती. यावेळी दोन गट एकमेकांना गेंड्यासारखे भिडले होते. इतका "प्रखर विरोध" आम्ही निर्माण केला होता. एक वैचारीक चळवळ म्हणून आम्ही गावाेगावी वाचनालये, पथनाट्या, जनजाग्रुती, चर्चासत्र हे सुरु केले होते. ही "साक्षरता" मोडित काढण्यासाठी "आरएसएसने" गावोगावी "बजरंगदल" "विश्वहिंदू परिषद" यांच्या स्थापना करुन "मार्क्सवादाला" विरोध केला.

सत्तेसाठी शांतता घ्या !!!

               दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी यांनी शिवसेने सारखा "जातीयवादी" पक्ष सोबत घेऊन त्यांना "कॉलेज कमिट्या" आणि "सत्तेत सहभागाचे" लालूस देऊन त्यांची "मुस्कटदाबी" केली. तेव्हा देशपातळीवर "राममंदिर" आणि "शेंडी आणि दाढी" यांचे राजकारण सुरू होते. हा देश "वैचारिक त्यागातून" उभा राहिला आहे. अशी आमची भुमिका होती. याला "प्रतिवाद" म्हणून "आरएसएसने" बजरंगदलाला पुढे केले होते. त्यामुळे त्यांनी "डॉ. अजित नवले को जलादो" ! असे म्हणत बॅनर जाळले होते. मात्र, तरी सीपीएम थांबली नाही. उलट गावागावात एसएफआयच्या शाखा ओपन होऊ लागल्या. याच काळात शिवसेना विरोधात जायला नको. म्हणून पिचडांनी चाल खेळली. कारखाने, कॉलेज, मार्केट कमिट्या, झेडपी, पंचायत समित्या. यांच्यात "ठराविक नेत्यांना स्थान" दिले. शिवसेना हा कट्टर विरोधक राहणार नाही. यासाठी त्यांना लाचार करुन ठेवले.

साहेब ! कम्युनिष्ट बरोबर संपविले..! "कानमंत्र"!

               जसे कम्युनिष्टांना संपविण्यात आले. तसे तह करुन "बिनविरोध निवडणुका" घ्यायच्या आणि आवाज उठविणाऱ्यांना "मुसके घालायचे" या धाेरणाने शिवसेना कमकुवत होत गेली. या प्रकारामुळे सामान्य कार्यकर्त्यांची घुसमट झाली. शिवसेना म्हणजे "कुंपनच शेत खाऊ लागले". असाच प्रकार अकोल्यात दिसून आला. त्यामुळेच  "शिवसेनेचे बडे नेते" पिचडांच्या "प्रलोभनाला बळी" पडले आहेत. म्हणून काहीही झाले तरी ते पिचडांच्या विरोधात "पराकोटीचा पंगा" घ्यायला तयार नाहीत. हे उघड-उघड दिसते आहे. या सर्वांमध्ये, काल कम्युनिष्टातून शिसेनेत गेलेला प्रस्तापितांचा "कट्टर विरोधक" तरुण आजही जाग्यावर आहे. वरिष्ठ पदाधिकारऱ्यांनी कितीही "लाचारी" पत्कारुद्या. तरी देखील "शिवसैनिक" म्हणून तो गावातील "प्रस्तापितांच्या विरोधात" दंड थोपटण्यास ठाम उभा आहे.
  क्रमश: भाग ४

-- सागर शशिकांत शिंदे

      (8888782010)

====================
या सदराचा क्रमश: भाग ४ पुढील अंकात प्रसिद्ध केला जाईल."शिवसेनेच्या प्रस्तापित लाचार नेत्यानंतर, कार्यकर्त्यांनी घुसमट कशी झाली; तरी त्यांनी शिवसेना जिवंत कशी ठेवली, डॉ. नवले यांचा राजकारणात प्रवेश ?. वाचत रहा ५ लाख २५ हजार वाचकांचे "रोखठोक सार्वभौम" क्रमश:
====================
        "सार्वभाैम संपादक"
          

          - सागर शिंदे