"इंदुरीत पंडरी" की दारुची "फॅक्टरी"; जे "सरकारी", तेच बसे "आड्ड्यावरी"...
"इंदुरीकर", वढ "पाच" ची ..!!! |
अकोले (प्रतिनिधी) :-
कालपरवा "इंदोरी" सारख्या ठिकाणी एका "महिलेस" शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केल्याचे समजले तेव्हा मन सुन्न झाले. महिलांच्या जिवाचा 'छळ' देशाला नवा नाही. पण, कारण एकल्यानंतर "लेखणी अस्थिर" झाली. जर गावातील "दारुचे दुकान बंद" करण्याचे 'निवेदन' दिल्यानंतर महिलेस मारहाण होत असेल तर जर कोणी या तालुक्याला "पुरोगामी" म्हणत असेल तर खरे त्यांच्यावर "शस्र" का चालवू नये. असा "उग्र प्रश्न" सहज अभ्यासकांना पडतो. त्यामुळे ज्या तालुक्यात आणि गावाच्या शिवारात "पाणी लढा" आणि "डाव्या चळवळी" उभ्या राहिल्या. त्याच गावात "महिलांच्या भावनेंचा खून" होत असेल तर "धिक्कार" आहे तेथील "समाजसेवकांवर" आणि "प्रशासकीय यंत्रणेवर". असे सुर वैचारिक बैठकीतून बाहेर पडू लागले आहेत.
इंदोरीत "बाटली आडवी" करा !! |
अर्थात ज्या "नवले" आडनावाच्या "बुवासाहेबानी पुरोगामी चळवळ" उभी केली. त्याच आडनावाचे "नवले" व्यक्तीने स्रीयावरती चालून जावे. तेही कशासाठी तर "प्रपंच उध्वस्त" व्हावे म्हणून दारुचे आड्डे चालविण्यासाठी. किती मोठा "विरोधाभास" आहे हा. चळवळीचा ठेवा जतन करण्यापेक्षा त्या ठेव्यालाच "दारुच्या आड्ड्यावर" लोकं बसवू लागले आहे. याच्याइतके दुर्दैव कोठे नाही. त्यामुळे आता या तालुक्याचा काही दिवसात "बिहार" होतो की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
खरे पाहता. ज्या महिलेस मारहाण झाली. त्या व्यक्तीवर "३२३, ५०४, ५०६" कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तवात या "अदखलपात्र" गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर त्याना "न्यायालयीन परवानगी" घेऊन "कठोर कारवाई" करता येते. मात्र, यात "अदखलपात्रच" का ? आयपीसीची कोणती अन्य कलमे कशी लावून "आरोपीच्या" कशा "मुसक्या" आवळल्या जातात. हे पोलिसांना नव्याने सांगायची वेळ येत असेल तर नवलच. पण, या सगळ्यामागे कोणाचा "वरदहस्त" आहे. या गोष्टीचे मुळ शोधणे गरजेचे आहे. हा विषय ग्रामपंचायत ते बिट हवालदार यांच्यापासून पोलीस निरीक्षक यांच्यापर्यंत येऊन ठेपतो. परंतु, यांना "मलिदे" मिळतात आणि लोकांचे 'प्रपंच उध्वस्त' होतात. या "अर्थपुर्ण" तडजोडीवर पहिला घाव घातला पाहिजे. ज्या हाद्दीत "दारुचे अवैध अड्डे" चालतात. तेथील बिट अंमलदाराला "निलंबित" का करण्यात येऊ नये. आज महिलांवर हात पडला उद्या नगर तालुक्यातील १२ जणांचा जीव घेणारे "पांगरमल दारुकांड" होण्याची तुम्ही वाट पाहणार आहात का ? असे अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले आहे.
कंट्रोल टू बिट मार्शल सगळे आड्डे तात्पुरतेे बंद करा |
-- सागर शशिकांत शिंदे
(8888782010)
====================
डॉ. अजित नवले यांच्या सदराचा क्रमश: भाग ३ पुढील उद्या सकाळी प्रसिद्ध केला जाईल. भा. "कम्युनिष्ट चळवळ लाचार झाली की पिचडांनी मोडीत काढली ?. वाचत रहा "रोखठोक सार्वभौम" क्रमश:
====================
"सार्वभाैम संपादक"