"हाप" चड्डीवाले "सामाजिक सौदार्य" मोडीत काढण्याची मला "भिती" वाटते !! कॉ. डॉ. अजित नवले
येथून नवी चळवळ उभी होते !! |
गो बॅक गोरे (इंग्रज) |
नवले कंपनी काराग्रुहात बंद असताना राज्यातील भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे लोक तेथे स्थानबद्ध होते. एक "देशाभिमानाची वैचारिक बैठक" नवले यांच्या संपर्कात आली आणि खऱ्या अर्थाने "सीपीआयच्या रोपट्याचा "उदय" अकोल्यात उभा राहु लागला. बुवासाहेब नवले बाहेर आले आणि "कम्युनिष्ट" विचारधारेचे कार्यकर्ते उभे राहु लागले. त्यानंतर सन १९४५ साली टिटावळा येथे "स्थापना परिषदेचे" आयोजन करण्यात आले होते. तेव्हा अकोल्याहुन ही "नवले फौज" मजल-दरमजल करीत पायी थेट टिटावळ्यात पोहचली. तेथे बुवासाहेब नवले "महाराष्ट्र किसान सभेचे पहिले अध्यक्ष" म्हणून नियुक्त झाले आणि "किसान सभेचा पहिला चेहरा" इतिहासाच्या पानावर छापला गेला.
तेव्हा "विडी" शॉक होता, आता "ईडी" धाक आहे ! |
दरम्यान याच काळात नवलेवाडी, सुगाव, औरंगपूर अशा अनेक ठिकाणी "भिकूसा विडी" कामगार कारखाने उभे राहिले. या कर्मचाऱ्यांच्या न्यायी हक्कासाठी येथे कामगार युनियन उदयास आल्या आणि तेथून पुढे अकोल्यात "लाल बावटा" रस्त्यावर दिसू लागला. मग "किसान सभा व कामगार युनियन या "समाजवादी चळवळीने" तालुक्यात "एकोपा" घडवून आणला. कधीही जात, धर्म व दंगली होणार नाही. अशी "समाजव्यवस्थेची पेरणी" केली. म्हणून आजची "जातीयवादी शिवसेना" देखील भाषणे ठोकताना "पुरोगामी" चळवळ म्हणते. हे त्या लोकांचे श्रेय आहे. हेच "सामाजिक शहानपण" त्या चळवळींनी उभे केले आहे. यालाच "डावी चळवळ" म्हटले आहे.
"जिंदाबाद"............."जिंदाबाद"...!!! |
अर्थात काही लोकांकडून "वाल्गना" केली जाते. की, आजच्या आणि तत्कालिन बदलाला "त्याकाळच्या चळवळी जबाबदार" आहेत. मात्र, मी त्याला "बिल्कुल सहमत" नाही. असे वाटणाऱ्यानी जरा "इतिहासाची पाने" उघडून पहावी. याला "संकुचित द्रुष्टीकोणातून" न पाहता. व्यापक अर्थाने पाहिले पाहिजे. किसान सभा, भा. कम्युनिष्ट, कामगार युनियन हे सर्व "लोप पावण्यात" काही स्थानिक कारणे असतीलही. मात्र, त्यापेक्षा "अंर्तराष्ट्रीय" धोरणे" आणि "अनपेक्षीत घडामोडी" देखील विचारात घेतल्या पाहिजे. त्यामुळे या चळवळी हळुहळू "उतारवयाकडे" झुकत गेल्या. त्याचा फटका राज्यासह अकोले तालुक्याला मोठ्या प्रमाणावर बसला आणि पहिल्यांदा येथे "सौम्य कम्युनिष्ट" पक्ष आणि "उग्र मार्कवादी" पक्ष असे (सीपीआय व सीपीएम) असे दोन गट उदयाला आले. क्रमश:...
-- सागर शशिकांत शिंदे
(8888782010)
====================या सदराचा क्रमश: भाग २ पुढील अंकात प्रसिद्ध केला जाईल. भा. "कम्युनिष्टात फुट" का पडली ? आणि अकोल्यात "मार्क्सवादाचा उगम" कसा झाला ?. वाचत रहा "रोखठोक सार्वभौम" क्रमश:
====================
"सार्वभाैम संपादक"