"भाजप उमेदवारीच्या परिक्षेत, कोण "नापास" कोण "पास" !! पिचड, भांगरे व सौ. भांगरे यांच्या मुलाखती..!

                 
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
                         "विधानसभेचे पडघम" सुरु असताना आता "भावी" आमदारांच्या "परिक्षा" सुरु झाल्या आहेत. त्यात "अकोले व संगमनेर" तालुक्यावर संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, आ. बाळासाहेब थोरातांना शह देण्यासाठी ना. विखे सरसावले आहेत. तर, आ. वैभव पिचड यांचा पराभव करण्यासाठी स्वत: पवार घराने लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे या दोन जागा "राज्याचे केंद्रबिंदू" ठरल्या आहेत. या "निवडणुक आखाड्यात" संगमनेरमध्ये "पायलीचे पंन्नास" (२४) इच्छूक उमेदवार. तर, अकोल्यातून माजी आमदार वैभव पिचड, मा. अशोक भांगरे व त्यांच्या पत्नी सौ. सुनिता भांगरे यांनी "उमेदवारीची परिक्षा" दिली आहे. आता यात कोण "पास" होतय आणि कोण "नापास" होऊन "एटीकेटीत" बसतय याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काही दिवसातच "पार्लमेंट्री बोर्डाकडून" लायबल उमेदवाराचे नाव जाहिर केले जाईल. अशी माहिती "समितीने" दिली आहे.
                   अकोले तालुक्यात वैभव पिचड यांनी "योग्य वेळी, योग्य टोला" मारत "भाजपच्या टिममध्ये" आपले स्थान "ध्रुवताऱ्यासारखे" निच्छित केले. त्यामुळे कालपर्यंत भाजपच्या मैदानात "लिडरशिप" करणारे अशोक भांगरे, सौ. भागरे व डॉ. किरण लहामटे यांना अक्षरश: "राखीव खेळाडू" म्हणून "प्रतिक्षेच्या तंबूत" बसावे लागेल. मात्र, तरी भांगरे कुटुंबाने हार मानली नाही. "जोवर माणूस रणांगण सोडत नाही. तोवर तो पराभूत होत नाही". या प्रेरणादायी वाक्याप्रमाणे भांगरे यांनी "भाजपचा संघ" सोडला नाही. अर्थात ते पिचडांचे पारंपारिक स्पर्धक आहेत. त्यांच्याकडे ठराविक अशी "व्होटबँक" आहे. आदिवासी भागावर त्याची पकड आहे. त्यामुळे आपण नक्कीच "पिचडांना शह" देऊ शकतो. हा आत्मविश्वास त्यांच्यात जीवंत आहे. म्हणून "मला नाही, तर सौ. भांगरे" यांचा तरी पक्षाने विचार करावा. अशी त्यांची भुमिका आहे.
           

कुणाला द्यावं बुवा !!

                अर्थात वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी त्यागून भाजपात प्रवेश केला. आणि अशात त्यांना उमेदवारी मिळणार नाही असे झाले तर ना. विखे यांचा तो "पराभव" ठरेल. असे जनतेला वाटते. परंतु "ईडी पिडीचे" काही राजकारण असेल तर त्याबाबत सामान्य माणूस "अनभिद्न्य" आहे. पण, आजचे भाजपची राजकीय रणनिती पाहता. असे होईल याबाबत साशंकता वाटते.
     एक बाकी नक्की, असे बोलले जाते की; भांगरे कुटुंबाचा योग्यतो विचार झाला असता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात त्यांनी जे शरद पवार साहेबांशी भेटून अंतर्गत बंड पुकारला. तो भाजपच्या "वरिष्ठ पातळीवर" जाऊन पोहचला. भांगरे यांनी कोणता "तह" केला ? याबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. जर त्यांना भेटायचे होते तर थोडा संयम बाळगायला हवा होता. त्या भेटीने उलटसुलट चर्चा होऊन त्यांच्याविषयी "जाणिवपुर्वक" निगेटीव मेसेज भाजप वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात आले. त्यामुळे जी काही संधीची सापट होती. ती देखील बुजल्याचे वातावरण़ तयार झाल्याचे बोलले जात आहे. अर्थात याचा "गौगवा" त्यांच्याच जवळच्या व्यक्तीने "स्वत:च्या स्वार्थापोटी" केल्याची चर्चा आहे. त्यामुळे "तो जवळचा" कोण ? याचा शोध त्यांनी घ्यायला हवा. कारण, "खुला दुष्मण" चागला. तितका "गोडबोल्या" वाईट. हे तपासून पाहिले पाहिजे.
        आता वैभव पिचड यांनी मुलाखत दिली असून त्यांचे काय होणार हे नव्याने सांगायला नको. पिचड यांना जर तिकीट मिळाले तर भांगरे यांची भुमिका काय असेल. हे महत्वाचे आहे. परंतु, काही "भांगरे समर्थकांना" वाटते की; पाच वर्षे "विरोधात दंड" थोपटण्यापेक्षा पक्षात राहुन किमान "राज्यात किंवा जिल्ह्यात" "गायकरांप्रमाणे" एखाद्या ठिकाणी "स्वत:चे पुनर्वसन" करून घ्यावे. कारण, आता सगळे पक्षबदल करून झालेत. फक्त "सत्तेत सन्मान" तेव्हाच मिळेल. जेव्हा "भाजपच्या मैदानावर" टिकून रहाल. मात्र, बंड पुकारला तर, "भलेभले" राष्ट्रवादी व काँग्रेस साेडून सेना-भाजपात आलेत. आणि अशा "बुडत्या जहाजात" बसून काय साध्य होईल असे वाटत नाही. त्यामुळे साहेबांनी योग्य निर्णय घ्यावा. ही साद कार्यकर्त्यांच्या गोटातून येत आहे. आता भांगरे साहेब काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
======================

-- सागर शशिकांत शिंदे

      (8888782010)

====================
उद्या वाचा भा. "कम्युनिष्टात फुट" का पडली ? आणि अकोल्यात "मार्क्सवादाचा उगम" कसा झाला ? डॉ. अजित नवले यांची क्रमश: मुलाखत. वाचत रहा "रोखठोक सार्वभौम" क्रमश:
====================
        "सार्वभाैम संपादक"
          

          - सागर शिंदे