कोण आ. पिचड ? आम्ही ओळखत नाही.! पण, डॉ. लहामटे घात कराल. तर, लक्षात ठेवा ! पौलवान कडाडला
यांनी अकोल्याचं वाटुळं केलं |
चाकण (प्रतिनिधी) :-
गेली "४० वर्षे" पिचड पिता-पुत्रांनी अकोल्यात "राजकारण" केले. मात्र, त्यास कधीही "समाजकारणाचे अंग" दिले नाही. त्यामुळे तालुक्यातील तरुणांना आजही "उपऱ्यावरचं जगणं" सहन करावे लागले आहे. "आयुष्य स्टेबल" करण्यासाठी "गावची माती" सोडून "चाकणची पायपीट" करावी लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या अकोलकरांनी चाकणमध्ये डॉ. किरण लहामटे यांच्या "विधानसभेची पुर्वतयारी" या सदरात आज-माजी आणि भावी उमेदवाराची चांगलीच "खरडपट्टी" काढली. यावेळी एक पैलवानाने सगळ्यांना आखाड्यात खेचत सगळ्यांच्या विरोधात दंड थोपटले. कोण वैभव पिचड ! आम्ही ओळखत नाही. कारण, आमच्या आयुष्याचे वाटोळे झाल्याने आम्ही आजकाल मतदानच करीत नाही. पण, यावेळी डॉ. लहामटे तुम्हासाठी पहिल्यांदा मदत करू. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा.! जर "तुम्ही आमदार" झालात आणि आमचा एक जरी "कार्यकर्ता" तुमच्याकडून "खाली हात" आला तर "तुमचीही खैर नाही". असे म्हणून "अब की बार, डॉक्टर आमदार" असा नारा चाकणमध्ये देण्यात आला. यावेळी शेकडो अस्थायी अकोलेकर तेथे स्थायी रुपाने उपस्थित होते.

मातीच्या विकासासाठी हा सन्मान |
"आपलेच दात अन आपलेच ओठ" आम्ही "आदिवासी" बोलणार तरी कोणाला ? आपले दु:ख समजून घेतील म्हणून "आदिवासी भागात आदिवासी आमदार" असतो. पण, हा मतदारसंघ राखीव नसता तरी बरं झालं असतं. किमान दुसऱ्याने तरी "भावनेपोटी" आमचा विकास केला असता. येथे सर्व "स्वार्थीच" राजकारण सुरु आहे. शिक्षण नाही, आरोग्य नाही, निवारा नाही, नोकरी नाही, रोजगार नाही, दोनवेळचे अन्न नाही. दळणवळण नाही, शेती आहे तर पिक नाही, बाजारपेठ नाही, उच्चशिक्षण घेऊ वाटले तर पैसा नाही, स्कॉलरशिप मिळेल वाटलं तर आदिवासी असून समाजकल्याण जातीचा दाखला देत नाही आणि असे कितीही प्रश्न मांडले तरी त्याला उत्तर नाही. त्यामुळे बिनबोल बिऱ्हाड उचलले आणि बाहेर पडलो. जवळचे ठिकाण म्हणून चाकण गाठले. कधी आत्मियतेने वाटलेच नाही. की आपला आमदार आहे. म्हणून जाऊन मतदान करावं. प्रवासाचं भाडं खर्च करण्यापेक्षा दोन "दिवसाची मेस" लावून पोटभर जेवलो त्यात सुख वाटलं. काल अचानक डॉ. लहामटे म्हणून कोणतरी आले आणि विकास करू म्हणून गेले. तेव्हा कोठतरी वाटलं. एक सहानुभूती म्हणून आता प्रथमत: स्वखर्चाने जावं आणि मतदान करून यावं. असा साधा आणि सुटसुटीत प्रवास एका तरुणाने कथन केला.
मी शब्द देतो ! अकोल्यात रोजगार आणेल.. |
अर्थात एक गोष्ट या थोडक्या संवादाहुन लक्षात आली. की, पिचड साहेबांनी ठराविक "मराठाशाही" जवळ करून त्यांची "लेकरंबाळं" उभी केली. मात्र, जे आदिवासी त्यांना माय-बाप मानतात. त्यांचे मात्र प्रचंड हाल हाताना दिसत आहे. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून पुढे येऊ लागल्या आहेत. हे दु:ख अद्न्यानात असणाऱ्यांना नाही. तर द्न्यान असून अन्याय होतोय हे दिसत असून तो सहन करणाऱ्यांच्या मनात खदखदत असल्याचे दिसते आहे. हिच प्रचिती चाकण येथे डॉ. लहामटे यांच्या दौऱ्यात दिसून आली.
गेल्या काही दिवसांपुर्वी टिटवाळा येथे काही अकोलेकर पावसाळ्याचे पीडित झाले होते. तेथे "माणूस" म्हणून डॉ. लहामटे धावून गेले. आणि एक रोजगाराचा प्रश्न म्हणून चाकण येथे संघटन केले. त्यावेळी त्यांनी हा विचार केला नाही. की; तेथे मतदार किती आहे. त्यांचा फायदा किती आहे. पण, तेथपर्यंत जाऊ वाटले. ही "आत्मियता" आहे. माणूस एखाद्याच्या दु:खाला काय घेऊन गेला हे महत्वाचे नाही. तर, तो "सांत्वन" करायला गेला. यात "डोंगराएवढं" समाधान आहे. त्यामुळेच डॉ. लहामटेंनी जनमानसांच्या "मनावर अधिराज्य" गाजवायला सुरुवात केली आहे. हाच "झांजावात" कायम ठेवला तर तो त्यांना नक्की "विधानसभेत" पोहचवेल असे जाणकारांना वाटते आहे.
घात कराल तर लक्षात ठेवा ! गाठ पैलवानाशी आहे ! |
सद्या पिचड साहेबांच्या विरोधात प्रचाराची "सुप्त धुळवड" उठत आहे. लोक स्पष्ठ बोलत नाही. पण, "कानोकान"..."आता बदल हवा" ! अशी वाक्य "निवडणुकीत रंग भरू लागली" आहेत. तर, पैलवान मंडळींनी "कोण वैभव पिचड" ! असे म्हणून आखाडा गरम केला आहे. त्यामुळे उद्याच्या विधानसभा निवडणुकीत "जनता" वर्सेस "प्रस्तापित" अशीच लढत पहावयास मिळणार आहे. हे वातावरण असे असले तरी. "साहेबांचे कार्यकर्ते" अद्याप "हवेतच" असून मैदानात कोणी यायला तयार नाहीत. हे वातावरण असेच राहिले तर, "वन साईड" निवडणुक होऊन "डॉक्टर पैलवान" होऊन बाजी मारतील असे जाणकारांना वाटते आहे.
अर्थात जनता उताविळ असली तरी परिस्थिती अद्याप "युती निर्णयापर्यंत" तशी नाही. त्यामुळे आम्ही वेळोवेळी विश्लेषण मांडत राहु. वाचत रहा ४७ दिवसात फक्त ८९ बातम्यांच्या जोरावर ५ लाख वाचकांचे लोकप्रिय पोर्टल "रोखठोक सार्वभौम" !!
=======================
- सागर शशिकांत शिंदे
(संपादकीय)
=======================
"पुण्यात मेजवाणी"
विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायीक, आणि गोर-गरिबांच्या "हक्काचे ताट" मिळण्याचे एकमेव ठिकाण. साईनिवास बिल्डींग, कॅनॉल रोड, कर्वेनगर. "हॉटेल शिवराय" पुण्यात "एकही माणूस उपाशी रहायला नको" हेच आमचे "उद्दीष्ट"..!
मो. 9975990980
कल्पीत विजय वाकचौरे
=====================