...तो "सत्य"जीत" सकता है !!!! असे वाटते "काँग्रेसच्या" तरुणांना !!!
संगमनेर (प्रतिनिधी) :-
मोदींची लाट आणि आणि देशात काँग्रसचा सुपडा साफ झाला. मात्र, महाराष्ट्रात तसे फारसे काही जाणवले नाही. मात्र, बीजेपीची "बी टिम" म्हणून ज्यांच्यावर आरोप झाला. त्या वंचित आघाडीच्या लाटेने काँग्रेसचे उरल्या सुरल्या अस्तित्वावर पाणी फिरविले आणि अवघा एक खासदार काँग्रेसचा निवडून आला. आता "पुढच्याला ठेच, मागचा शाहणा" हे ब्रिद पाठ करुन राष्ट्रवादी जागी झाली आणि स्वत: पवार साहेब मैदानात उतरले. एकीकडे अजित पवार, धनंजय मुढे, अमोल मिटकरी, डॉ. अमोल कोल्हे या तरुणांनी राज्याच्या काना-कोपऱ्यात जंग-जंग पछाडले. पडलेले झाड उभे करण्यासाठी ताकद पणाला लावली. अखेर "इडीचा डाव रडी" झाला आणि राष्ट्रवादीने प्रचाराला "स्वल्पविराम" दिला. मात्र, दादांचा कंठ दाटून आला. याचे देखील राजकीय भांडवल करून राष्ट्रवादीने सहानुभूती मिळविली. कारण, हे सरकार पाडायचेच हा चंग पवारांनी बांधला आहे. मात्र, जर गाडीची दोन्ही चाके समान चालली. तर योग्य ट्रॅकने धेय्य तत्काळ गाठता येईल. मात्र, राष्ट्रवादी आखाड्यात दंड थोपटून उभी असताना, दुसरीकडे काँग्रेसकडून राजकारणाचे सुतक पाळल्यासारखे दिसत आहे. सगळे कुपोशित नेते आखाड्यात दंड थोपटताना दिसत आहे. जर सत्ता पालट करायची असेल. तर खांद्याला खांदा लावून लढले पाहिजे. हे काँग्रेस पक्षाला कोणी सांगावे ? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे.
आता राजकारणात तरुण वर्गाची गरज आहे. तो तरुण वर्ग निव्वळ पदांना गोमाशी सारखा चिकटून बसल्याचे बोलले जात आहे. तर, ज्या काँग्रेसला घराणेशाहीचा बट्टा लागला. त्या काँग्रेस नेत्रुत्वाने अजूनही काही धडा घेतल्याचे दिसत नाही. सगळे वाटायचे ते आपल्याच घरात. कार्यकर्त्यांनी करायचे तरी काय ? बरं ज्यांना पदे दिली त्यांनी काहीतरी तरी चळवळ करणे आवश्यक आहे. पण, याच निष्क्रियतेमुळे काँग्रेसला मरगळ आली असून, त्यामुळे त्याचा तोटा उद्याच्या काळात दिसून येऊ शकतो. या एक अशक्त चाकामुळे सशक्त राष्ट्रवादीली उद्या फटका बसू शकतो. म्हणून थोरात साहेबांनी राज्याचे नेत्रुत्व म्हणून "सत्यजीत" तांबे, उत्कर्षाताई रुपवते यांच्यासह तरुणांची फौज उभी करून मैदानात उतरणे गरजेचे आहे. त्यांना चारही बाजुंनी विरोधक असून स्वत:चे बळ सोडा पण पक्षाचे बळ वाढविण्यासाठी त्यांनी तरुणांवर चढलेला गंज झटकून राज्यभर खरोखर कर्तबगार युवकांना संधी दिली पाहिजे. असे राजकीय विश्लेषकांना वाटते. एक साधे उदा. सांगायचे झाले तर....!
हा फक्त "स्टंट" झाला. परंतु या नंतर त्यांची सरकारला कोंडीत धरण्यासाठी कोणतीही आक्रमकता दिसुन आली नाही. "फेसबुक लायु" वरूनच तरुनांशी संपर्क साधण्याचा मानस त्यांनी केला. त्यामुळे ते सोशल मीडियातील नेते प्रणेते आहेत की काय !! अशी मिश्किन टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील NSUI ही देखील विद्यार्थ्यांनचा प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरत आहेत. परंतु, एकीकडे "छात्रभारती" संघटना सरकारला जाब विचारण्यासाठी आक्रमक दिसत आहे. जि. प शाळा बंदीचा निर्णय असो किंवा युवक बेरोजगारीसाठी काढलेला "लाँगमार्च", "महापोर्टल घोटाळा" या सर्व विषयी विविध कार्यलयांवरील निदर्शने करून छात्रभारताची आक्रमकता चर्चेचा विषय ठरत आहे.
भारतातील राजकीय पक्षांचा पाया, त्यांच्या रचना, जनाधाराची त्यांची वैशिष्ट्ये संघटना म्हणुन असलेली व्यक्तिमत्वे, कार्य पद्धती, संघटनेचा बंदिस्तपणा आणि लवचिकता आशा अनेक घटकांचा परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या व्यक्तींच्या निर्णयातून दिसत असतो. कितीही नाही म्हटले तरी, आपल्या पक्षपद्धतीत तुम्ही कोणत्या समाजसमूहातुन आला यावर तुम्हाला कितपत बढावा मिळणार, प्रतिनिधींत्वाची संधी मिळणार वाव मिळणार हे अवलंबून असते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष मेहबुब शेख यांनी युवकांमध्ये आपली छबी उमटवली आहे.
संगमनेर (प्रतिनिधी)
मोदींची लाट आणि आणि देशात काँग्रसचा सुपडा साफ झाला. मात्र, महाराष्ट्रात तसे फारसे काही जाणवले नाही. मात्र, बीजेपीची "बी टिम" म्हणून ज्यांच्यावर आरोप झाला. त्या वंचित आघाडीच्या लाटेने काँग्रेसचे उरल्या सुरल्या अस्तित्वावर पाणी फिरविले आणि अवघा एक खासदार काँग्रेसचा निवडून आला. आता "पुढच्याला ठेच, मागचा शाहणा" हे ब्रिद पाठ करुन राष्ट्रवादी जागी झाली आणि स्वत: पवार साहेब मैदानात उतरले. एकीकडे अजित पवार, धनंजय मुढे, अमोल मिटकरी, डॉ. अमोल कोल्हे या तरुणांनी राज्याच्या काना-कोपऱ्यात जंग-जंग पछाडले. पडलेले झाड उभे करण्यासाठी ताकद पणाला लावली. अखेर "इडीचा डाव रडी" झाला आणि राष्ट्रवादीने प्रचाराला "स्वल्पविराम" दिला. मात्र, दादांचा कंठ दाटून आला. याचे देखील राजकीय भांडवल करून राष्ट्रवादीने सहानुभूती मिळविली. कारण, हे सरकार पाडायचेच हा चंग पवारांनी बांधला आहे. मात्र, जर गाडीची दोन्ही चाके समान चालली. तर योग्य ट्रॅकने धेय्य तत्काळ गाठता येईल. मात्र, राष्ट्रवादी आखाड्यात दंड थोपटून उभी असताना, दुसरीकडे काँग्रेसकडून राजकारणाचे सुतक पाळल्यासारखे दिसत आहे. सगळे कुपोशित नेते आखाड्यात दंड थोपटताना दिसत आहे. जर सत्ता पालट करायची असेल. तर खांद्याला खांदा लावून लढले पाहिजे. हे काँग्रेस पक्षाला कोणी सांगावे ? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे.
आता राजकारणात तरुण वर्गाची गरज आहे. तो तरुण वर्ग निव्वळ पदांना गोमाशी सारखा चिकटून बसल्याचे बोलले जात आहे. तर, ज्या काँग्रेसला घराणेशाहीचा बट्टा लागला. त्या काँग्रेस नेत्रुत्वाने अजूनही काही धडा घेतल्याचे दिसत नाही. सगळे वाटायचे ते आपल्याच घरात. कार्यकर्त्यांनी करायचे तरी काय ? बरं ज्यांना पदे दिली त्यांनी काहीतरी तरी चळवळ करणे आवश्यक आहे. पण, याच निष्क्रियतेमुळे काँग्रेसला मरगळ आली असून, त्यामुळे त्याचा तोटा उद्याच्या काळात दिसून येऊ शकतो. या एक अशक्त चाकामुळे सशक्त राष्ट्रवादीली उद्या फटका बसू शकतो. म्हणून थोरात साहेबांनी राज्याचे नेत्रुत्व म्हणून "सत्यजीत" तांबे, उत्कर्षाताई रुपवते यांच्यासह तरुणांची फौज उभी करून मैदानात उतरणे गरजेचे आहे. त्यांना चारही बाजुंनी विरोधक असून स्वत:चे बळ सोडा पण पक्षाचे बळ वाढविण्यासाठी त्यांनी तरुणांवर चढलेला गंज झटकून राज्यभर खरोखर कर्तबगार युवकांना संधी दिली पाहिजे. असे राजकीय विश्लेषकांना वाटते. एक साधे उदा. सांगायचे झाले तर....!
युवक को संधी देंगे,
|
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात हे पत्रकार परिषदेत युवकांना संधी मिळणार असे वारंवार नमुद करत असतात. परंतु, ते युवक कोण ? असा प्रश्न महाराष्ट्रापुढे नेहमी पडला आहे. आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे "युवक प्रदेश अध्यक्ष" आहेत. परंतु, त्यांना युवकांची मोट बांधण्यात यश आले नाही. तरुण युवा पिढी यांना संधी देऊन नविन "हाडामासाची" काँग्रेस उभी करायला हवी होती. परंतु तसे काही दिसुन आले नाही. तर, उलट "रक्ताच्या नात्याची काँग्रेस" उभी करण्यात थोरातांना यश आले. असे आरोप होऊ लागले आहेत.काँग्रेस मध्ये सत्यजित तांबे यांना विद्यार्थी संघटना (NSUI) मधुन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष केले. त्यानंतर युवक प्रदेश उपआध्यक्ष पद दिले. व आता काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्षपदाची धुरा हाती दिली. अनेक वेळेस संधी मिळून देखील काँग्रेसकडे ते युवकांना आकर्षित करू शकले नाही. अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून गेले. परंतु, ग्रामीण भागात ते सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडु शकले नाही. त्यांची ओळख शहरी युवा नेते अशीच ओळखली गेल्याचे बोलले जाते. ग्रामीण भागात युवकांमध्ये काँग्रेसची विचारधारा रुजूवली गेली नाही. कुशल संघटक, पक्षाची व्यापकता, पक्ष तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी जनउपयोगी आंदोलने, सामाजिक कामे करावी लागतात. परंतु, काँग्रेसची काही दिवसांपासून पक्षामध्ये मरगळच दिसत आहे. प्रदेश अध्यक्ष पदावर वर्णी लागताच सत्यजित तांबे यांनी संगमनेर तालुक्यात पेट्रोल पंपावर उज्वला योजना या पोस्टरवर पंतप्रधान मोदीनच्या फोटोला काळे फासले.
सर्वोत्तम कामगिरी !! |
भारतातील राजकीय पक्षांचा पाया, त्यांच्या रचना, जनाधाराची त्यांची वैशिष्ट्ये संघटना म्हणुन असलेली व्यक्तिमत्वे, कार्य पद्धती, संघटनेचा बंदिस्तपणा आणि लवचिकता आशा अनेक घटकांचा परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या व्यक्तींच्या निर्णयातून दिसत असतो. कितीही नाही म्हटले तरी, आपल्या पक्षपद्धतीत तुम्ही कोणत्या समाजसमूहातुन आला यावर तुम्हाला कितपत बढावा मिळणार, प्रतिनिधींत्वाची संधी मिळणार वाव मिळणार हे अवलंबून असते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष मेहबुब शेख यांनी युवकांमध्ये आपली छबी उमटवली आहे.
युवाओंके दिल के "मेहबुब" |
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांनी ही सरकारला कोंडीत धरण्यासाठी बेरोजगारीचे हत्यार बाहेर काढीत रेल रोको, रस्ता रोको विविध कार्यलयावर निदर्शने केली आहे. तरुणांचा प्रश्न हातात घेऊन ते नेहमी रस्त्यावर उतरले आहेत. त्याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होत पक्षाकडे युवकांचा कल वाढत चालला आहे. पवार साहेबानी नेहमी तळागळातील कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. पवार साहेबांची ओळख नेहमी कुशल संघटक म्हणुन राहिली आहे. याचे उत्तम उदाहरण स्व. आर. आर. पाटील आहेत. रोजगार हमी ते उपमुख्यमंत्री असा त्यांचा जीवनातील प्रवास राहिला आहे. या निवडणुकीत युवकांचे मतदान निर्णायक ठरणार आहेत. हे जाणूनच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनीही संकेत स्थळ आणि इतरही अत्याधुनिक माध्यमांतून या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केले केल्याचे दिसत आहे.
-- सुशांत पावसे |
संगमनेर (प्रतिनिधी)
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७२ दिवसात १३०ब लेखांचे ७ लाख १५ वाचक)