"गांधींचा" मार्ग, "काँग्रेसचा" झेंडा, "इंग्रजांची" जेल, अन् त्यातून जन्म "कम्युनिष्टचा"..!!
मधुकर नवले |
अकोल्याच्या मातीला कधी "रक्ताचा सुगंध" नाही. मात्र, देश, तत्व आणि हक्काची चळवळ उभी करण्यासाठी "बलिदान" देण्याची ज्वलंत परंपरा आहे. त्यामुळे, अकोल्याला खऱ्या अर्थाने "पुरोगामी" आणि "डाव्या विचारांचा" तालुका ही "उपाधी" लागली आहे. यात "सिंहाचा वाटा" जर कोणाचा असेल. तर तो, प्रथमत: "नवलेवाडी" गावचा आहे. कारण या गावच्या "इतिहासाची पाळमुळं" १८१९ च्या "मामलेदार" वधाच्या "विद्रोहात" दडलेली आहेत. कारण, तो कोण्या व्यक्तीचा "वध" नव्हता. तर, तो एका "अपप्रव्रुत्तीचा" नाश होता. पुढे हीच ओळख "डाव्या चळवळीने" कायम ठेवली होती. कारण, सन १९४० साली "व्यक्तीगत चळवळ"च्या माध्यमातून गांधींच्या मार्गाने "स्वातंत्र आंदोलनाची" पहिली मशाल बुवासाहेब नवले यांनी पेटविली. स्वातंत्र्यासाठी केलेल्या या आंदोलनात अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात, पी. जी. भांगरे यांच्यासह नवलेवाडीची २७ लोकं जेलमध्ये हाेती.
स्वा. सेनानी बुवासाहेब नवले |
एक गोष्ट प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते की, हे सर्व लोक जेलमध्ये जाताना "काँग्रेसचा" झेंडा घेऊन आत गेले होते. मात्र, येताना त्यांच्या खांद्यावर लाल बावटा झळकत होता. त्या चार भिंतीच्या आत. अकोलेकरांनी "प्रचंड कळा" सोसल्या. तेथे काँग्रेसचे विचार नव्हते. तर, जी कोणी मंडळी आत होती. त्यांनी केडर काॅम्प प्रमाणे प्रत्येकाच्या रक्तात देशाच्या ज्वलंत प्रश्नाची मशाल पेटती केली होती. "धर्मनिर्पेक्ष" आणि "सार्वभौम" विचारसारणी, तसेच संसदीय स्वातंत्र्यासह अनेक प्रश्नांतून मुक्तीचे स्वातंत्र कसे हवे आहे. हे काळजावर कोरले गेले आणि १९४२ ला बाहेर येताना "कम्युनिष्ट" नावाचे "वैचारिक बाळकडू" पिऊन सगळे काॅम्रेड बाहेर पडले. तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय "कम्युनिष्ट" पक्षाचा "जन्म" झाला. तेव्हा पी.जी भांगरे आणि बुवासाहेब नवले यांनी प्रथम "कम्युनिष्टाचं बीज" या काळ्या मातीला "अर्पन" केले. त्या रोपट्याला जोपासताना बुवासाहेब नवले यांनी प्रचंड यातना सहन केल्या आहेत.
१९४५ साली "टिटावळा" येथे "भव्य शेतकरी मेळावा" आयोजित केला होता. त्यात पहिले किसान सभेेचे अध्यक्ष म्हणून बुवासाहेब नवले यांना सन्मान देण्यात आला. हा त्यांचा नव्हे. तर, आज मातीत राबणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांचा तो सन्मान होता. त्यामुळे इतिहासाची पाने उलगडताना नवलेवाडीची छाती नक्कीच रुंदावते. तेव्हा स्रीया जात्यावर गीत गायच्या. "आज रक्तानं रंगला गं बाई. माझा, लाल बावटा". तर "चावडीवर मैफिल बसायची आणि महिला इतिहासाला साद घालत म्हणायच्या. "किसान सभा ही आमुची भक्ती गं, किसान सभा आमुची माऊली गं"; "आम्ही वारकरी- मार्क्सवादाचे वारकरी"..!!! इतकी "आत्मियता आणि प्रेम" प्रत्येक उंबऱ्यात नांदत होते.
त्याकाळी "कम्युनिष्ट" लोकांच्या मनावर "अधिराज्य" गाजवत चालला होता. मात्र, भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे (सीपीआय) नेते बी. टी. रणदिवे यांनी एक ठराव मांडला होता. त्यांचे मत होते की, जर भारतात आपल्याला "कम्युनिष्टचे सरकार" आणायचे असेल. तर, "सशस्र" क्रांती करावी लागणार आहे. याला दाखले देताना. ते, "सोव्हिएय रशियाची" उदाहरणे देत असत. तर, त्यांना विरोध म्हणून श्रीपाद डांगे यांनी मत मांडले की; "संसदीय शासन पद्धतीत" "मतपेटीच्या" माध्यमातून कम्युनिष्ट सरकार सत्तेत आणू. याला ते दाखले देताना ते म्हणाले. "लुंबिनी" येथे "राहिनी" नदीच्या पाण्याहुन वाद झाला. तेव्हा राजा "शुद्धोधन" राजपुत्र बुद्ध हा "शाक्य" कुळाकडून तर दुसरीकडून "कोली" सामाज होता. तेव्हा सोनापतीने एक ठराव मांडला. की, बळजबरी करून सशस्र समाज्यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करायचे आणि नदीचे सगळे पाणी आपण घ्यायचे. याला भगवान गौतम बुद्धींनी नकार दिला. हा प्रश्न चर्चेने सुटेल, तत्व आणि मानवी मुल्यांना पायंदळी तुडवून एखादी वस्तू हस्तगत करणे हे योग्य नाही. मात्र, त्यांच्या मताला बहुमत आले नाही. अखेर, वैराग्याने त्यांनी राजवैभव व कुटुंबाचा त्याग केला. व जंगलात निघून गेले. त्या नंतर पुन्हा अडिच वर्षात हा वाद ऐरणीवर आला आणि चर्चेत्मक विषयातून पुढे मार्ग काढण्याचे ठरविण्यात आले. सांगायचे तत्पर्य असे की, सशस्र क्रांतीने विकोप होतो. तर वैचारिक क्रांतीने व्यक्ती समिप येतात. त्यामुळे तात्पुरता डांगे यांचा वैचारीक लढा दुर्लक्षीत करण्यात आला. आणि बी. टी. रणदिवे यांच्या "मार्क्सवादाचा" अनेकांनी "पुरस्कार" केला. ही चळवळ उभी राहते कोठे नाहीतर. सरकारने यावर बंदी आणली. त्यामुळे भाऊसाहेब थोरात, बुवासाहेब नवले यांना "भुमिगत" होऊन चळवळ करावी लागली. मात्र, कालांतराने मार्क्सवादावरील बंदी उठविण्यात आली. याच काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी कर्जमाफी व सावकार विरोधी चळवळ उभी केली होती. त्याचे प्रतिनिधीत्व मुरलीधर नवले, सक्रु मेंगाळ, किसन हांडे, कुशाबा नवले यांनी केले. ती देखील चळवळ इतिहासाने नोंदून घेतली.त्यानंतर भारतीय कम्युनिष्ट पार्टी, मार्क्सवादी पार्टी, फॉर्वड ब्लॅक, क्रांतीकारी सामजवादी पक्ष या सर्वांनी मिळून आपले एकच निशान ठेवले. तो म्हणजे लाल बावटा होय. त्यानंतर मार्क्सवाद आक्रमक होत गेला. तर सीपीआय मवाळच होता. या दरम्यान पश्चिम बंगाल, त्रिपरा, केरळ येथे मार्क्सवादी पक्षाने हुकूमत गाजविली. तर केरळमध्ये फक्त सीपीआय टिकून होता. कालांतराने सीपीआयने तडजोडीचे राजकारण सुर केले. त्यामुळे विरोधाची धार कमी-कमी होत गेली. काँग्रेस पक्षाशी मिळते जुळते घेतले. मात्र, जनता पक्षाशी कधीच लागते-जुगते झाले नाही. १९५८ च्या काळात तर पंडित नेहरुंवर जनसंघाने अविश्वासाचा ठराव आणला होता. तेव्हा, तो संमत होऊ नये म्हणून सीपीआयच्या ६२ खासदारांनी नेहरुंना पाठींबा देत ठराव उधळून लावला होता. असे अनेक इतिहास भुतकाळात दडून बसले आहेत. मात्र, आज दैव असे की, ज्या कम्युनिष्टातून मी उभारलो, ज्याने जनसंघाला तळत्या तलवारी सारखा विरोध केला. त्यातला मी एक आहे. परंतु, सगळी तत्व बाजुला सारुन त्याच भाजपात आम्ही प्रवेश केलाय. ही बाब मी सहज स्विकारली असे कोणाला वाटत असेल. तर, कदाचित मधुकर नवले त्यांना उमगलाच नाही..! असेच म्हणावे लागेल.
क्रमश: भाग ४
-------------------------प्रियवाचक
क्षमा असावीकारण, मधुकर नवले साहेबांचे दोन भाग मी लावले. परंतु काही कारणास्तव तीसरा भाग दोन दिवस लावू शकलो नाही. कदाचित तो लागला असत नसता. तो भाग वेगळा. परंतु, आपण केलेले फोन, मेसेज व वैचारिक बैठकीतील "प्रतिसाद" यांची "मागणी" लक्षात घेता. मी पुढील "दोन" भाग "प्रकाशित" करीत आहे. उशिरा मिळाल्याने "दिलगिरी" व्यक्त करतो. "भाऊंनी" जे काम केलय आणि जो प्रेमाचा "गोतावळा" जमा केला आहे. कदाचित हे त्याचे "फलित" असावे.
धन्यवाद !!
==============
प्रिय मित्रांना !! "सार्वभौम" पार्टलची प्रत्येक बातमी करताना किती "कळा" सोसाव्या लागतात. "रात्र-रात्र डोळ्यात तेल घालुन, अभ्यास करून, अनुषंग शोधून, सिक्वेन्स लावून तीन ते चार तासानंतर एका लेखाचा "जन्म" होतो. म्हणून "कॉपीपेस्ट" करताना विचार करावा. ही विनंती.
क्रमश: भाग 3
शब्दांकन (सागर शिंदे)
जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर मो. क्र. ८८८८९७५५५५ (मधुकर नवले) साहेबांना फोन करून शुभेच्छा द्या. व
प्रतिक्रिया कळवा.
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७३ दिवसात १३० लेखांचे ७ लाख २५ हजार वाचक)