"शेवटच्या श्वासापर्यंत" मी माझे "तत्व" बलदणार नाही" !! - "मधुकर नवले"
अकोले (प्रतिनिधी) :-
तो काळ १९७८-७९ चा होता. घरात "बुवासाहेब नवले" यांच्या रुपाने "अन्यायाविरुद्ध बंडाचे वारे" आरपार वाहत होते. राज्याच्या 'नकाशावर' स्पष्ट अक्षरानी अकोले तालुक्याचे नाव दर्शविल्याचे दिसत होते. इतकी मोठी "कम्युनिष्ट चळवळ" त्यांनी गावासह तालुक्यात आणि राज्यात रुजविली होती. या गोष्टीचा माझ्यावर नकळत "प्रभाव" होताच. मात्र, स्वत:च्या "अंगभूत" गुणांनी मी बड्या-बड्या नेत्यांच्या तोंडचे "कौतुक" झालो होतो. कारण, अकोले शहराच्या "माथ्यावरच" नवलेवाडी येथे माझ्या इवल्याशा "कर्तुत्वाचा" जन्म झाला होता. त्याकाळी आम्ही तरुण मुलांनी गावात "निलकमल" नावाचे युवामंडळ सुरू केले होते. त्यातून साऊंड व मंडप डेकोरेशनचा "व्यवसाय" सुरू होता. म्हणतात ना ! "अनुवंश" आणि "अंगभूत कला" ही कितीही दडपली तरी तिचा जन्म हा नकळत "क्रुतीतून" होत असतो. असेच काहीसे माझे होते. संघटन आणि नेत्रुत्व असेल नसेल. पण, निवेदन कला ही माझ्यात ओतप्रोत भरलेली होती. सुदैव असे की, त्याकाळी "अमिन सयानी" या निवेदकाने आपल्या आवाजाच्या कौशल्याने जगाला वेड लावले होते. त्यांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांची हुबेहुब नक्कल करीत मी मनव्यक्त विहंग करीत होतो.
मात्र, मी जरी माझ्याकडे दुर्लक्ष केले होते. तरी, तमाम अकोलेकरांनी माझ्यातील सयानी यांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर लग्न, समारंभ, सांस्क्रुतीक कार्यक्रम यातून मला "दाद" मिळत गेली. आणि प्रसिद्ध निवेदक म्हणून माझ्यासारख्या शेतकरी मुलाचा चेहरा समोर आला. नाहीतर, "डोक्यावर पाटी" घेऊन अकोल्याच्या बाजारतळात "कांदे विकणारा" मी. कोण कुठला "मधू" !! तेथेच बाजारतळाच्या "दगडगोट्यांत" पाटीभर कांद्याची टोपली दहा पैशाचा कर भरुन दोन-दोन आणे जमा करत बसला असता. मात्र, 'दैवाला' ते मान्य नव्हते. कालवर ज्या बाजारतळावर कांदे विकण्यासाठी माझा "क्षीण" झालेला आवाज ग्राहकांना आळवत होता. आज तोच आवाज, त्याच बाजारतळावर लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन गुंजताना अनेकांनी पाहिला आहे. हेच कदाचित "दैवाला मान्य" होते...!! कारण, उद्याच्या वर्तमानात माझा "पक्ष" बदलला तरी, "तत्व" बदलणार नाही. हे देखील नियतीला ठाव होते. म्हणून "कर्मयोगाने" कालचा "मधु" हा जनतेच्या मनावर आजचा "मधुभाऊ" या नावाने "अभिमानास्पद" कोरला गेला.एक उत्क्रुष्ठ निवेदक म्हणून उठत्या-बसत्या प्रतिष्ठीत व्यक्तींमध्ये माझी चर्चा होत होती. त्याकाळी म्हणजे १९७९ साली विधानसभा निवडणुकांचे नुकतेच वारे वाहु लागले होते. तेव्हा कॉ. सक्रुभाई मेंंगाळ यांचा प्रचार करताना मला एक नामी संधी चालुन आली. शेतकऱ्यांविषयी "जन्मजात आत्मियता" असल्यामुळे मला "कोणत्या पक्षाचा झेंडा" हाती घ्यावा, हा प्रश्न कधीच पडला नाही. लाल निशान हाती घेऊन तो रंग रक्तात कसा मिसळला काहीच कळले नाही. तर, निवेदकाचा स्वाभाव, आवेशात जाऊन "वक्ता" म्हणून कसा पुढे आलो. हे देखील उमजले नाही. पण, हे सामाजिक काम करता-करता हाच माझ्या "राजकिय जिवणाचा उगम" असावा असे मला वाटते. कालचा "निवेदक" आजचा "कार्यकर्ता" झाला होता. १९७८-७९ च्या काळात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या होत्या. तेव्हा कॉ. कारभारी उगले व भाऊसाहेब पाटील यांचा प्रचार मी अगदी जोमाने केला. त्यानंतर १९८१ ला मी कम्युनिष्ट पार्टीचा सदस्य झालो. रक्तात भिनलेली चळवळ मला शांत बसू देत नव्हती. काळानुरुप माझ्या कार्याला इतकी गती मिळत गेली. की, १९८३ साली कम्युनिष्ट पक्षाचा तालुका सेक्रेटरी म्हणून माझी नियुक्ती झाली.
यावेळी, मधुकर पिचड हे तालुक्याचे आमदार होते. तर शेतकरी नेते म्हणून दशरथ सावंत यांचे नाव सन्मानाने "अग्रस्थानी" होते. तेव्हा पाट-पाणी लढा, विडी कामगार, शेतीचे प्रश्न हे ऐरणीवर होते. त्यावर सावंत यांनी प्रचंड मोठी चळवळ उभारली होती. आणि तेव्हा सावंत साहेबांचा "उजवा हात" म्हणून माझे नाव "अग्रभागी" होते. आजवर अकोल्याच्या चळवळीत कधी नव्हे इतका "जनाधार" १९८३ ते ९० या काळात आम्हाला मिळाला होता. या सर्व लढ्यात आम्ही यशस्वी झालो होतो. म्हणून एक "लोकमान्य कार्यकर्ता" म्हणून मला समाजाने स्विकारले होते. मात्र, माझ्या मनात एक "खंत" कायम नांदत होती. ती म्हणजे, येथे विडी कामगार चळवळ मोठ्या प्रमाणात होती. त्या तुलनेत शेतकऱ्यांच्या न्यायी हक्काचा लढा कमी होता. जर कम्युनिष्ट पक्षाला येथे बळ द्यायचे असेल. तर, शेतकऱ्यांचे प्रश्न उभे करून त्यांना न्याय देणे. या मागणीवर मी ठाम होतो. हळुहळू माझी विचारधारा प्रगल्भ होत गेली. सर्वव्यापी प्रश्नांवर मी वैचारिक ठेवा मांडत होतो. मात्र, कम्युनिष्ट पार्टीची जी तत्व आणि पत्थ्य होती. त्याला माझ्याकडून कधीही गालबोट लागणार नाही. याची मी कटाक्षाने काळजी घेत होतो. या पक्षीय जबाबदारी बरोबरच मुरलीधर नवले (१९७३) व बुवासाहेब नवले (१९७९) यांच्या पश्चात नवलेवाडी गावची देखील खूप मोठी जबाबदारी माझ्यावर होती. कारण, त्यांच्या खांद्यावरील लाल बावटा मी माझ्या खांद्यावर घेतला होता. संघटना वाढविणे आणि त्यातील प्रगल्भता व प्रखरता जिवंत ठेवणे हे माझ्यासमोरील आव्हान होते. ते मी पेलण्यात यशस्वी झालो होतो. असे म्हटल्यास काहीच हरकत नाही. असे मला वाटते.
क्रमश: भाग २
शब्दांकन (सागर शिंदे)
जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर मो. क्र. ८८८८९७५५५५ (मधुकर नवले) साहेबांना फोन करून शुभेच्छा देऊन
प्रतिक्रिया कळवा.
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७१ दिवसात १२७ लेखांचे ७ लाख वाचक)