अखेर "प्रशासन" शरद पवारांना "नतमस्तक", "ईडी" कार्यालयात जाण्यास "स्थगिती"..!
मुंबई (प्रतिनिधी) :-
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मी ED च्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला आहे. असे शरद पवार यांनी माध्यमांना सांगितले आहे. पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब करतोय असेही ते म्हणाले. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून ही विनंती करण्यात आली होती. पवार यांनी स्विकारली आहे. व ईडीच्या कार्यालयात जाण्यास तुर्तास स्थगिती दिली आहे.
कोणाची काय प्रतिक्रिया
बँक गैरव्यवहार प्रकरणी जे पुरावे आले आहेत त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.
यावेळी साहेब क्षमा करा !प्रत्येकवेळी कायदा व सुव्यवस्था राखायला तुम्ही आम्हाला सांगणार. आम्ही काही न बोलता गप्प बसणार. आजवर ठिक होते. पण, आता याची मजल थेट जाणत्या राजापर्यंत गेली आहे. त्यामुळे आता या वेळी तुम्ही म्हणालात तरी ते शक्य नाही. सगळा राष्ट्रवादी ईडीच्या कार्यालयासमोर जमनार म्हणजे जमनार. यावेळी क्षमा असावी. आ. जितेंद्र आव्हाड
गप्प राहिलो म्हणून याचा अर्थ आम्ही चुक होतो असे नाही. पण, तुमच्या हद्द पार करण्याचीही काही सिमा असते. ती तुम्ही पार केली आहे. आता आमचा संयम संपला आहे. मी ईडीच्या कार्यालयासमोर जाणार म्हणजे जाणार. तुम्ही सर्वांनी यावं. आपल्या जाणत्या राजाला साथ देण्यासाठी.
-- राहित पवार
शरद पवार यांना जाणता राजा म्हणून ओळखले जाते. त्याचा या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचे दिसते आहे. त्यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी अकोले तालुक्यात सारख कारखाना बंद पडू दिला नाही. त्यामुळे तालुक्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. ते यातून निच्छित मार्ग काढतील. - मिनानाथ पांडे.
ईडीच्या चौकशीने शरद पवार यांनी ठाम भुमिका घेतली होती. त्याला शेतकरी संघटनेने पाठबळ दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रातील ७९ वर्षीय शरद पवारांनी दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्रापुढे शरणागती पत्कारण्यास लावण्याचा इतिहास घडविला आहे.
दशरथ सावंत
भाजप सूडबुद्धीने राजकारण करीत भारतातील महत्वाच्या स्वायत्त संस्थेमध्ये हस्तक्षेप करीत आहे. राज्य सहकारी बँकेवर पवार साहेबांच्या विचारांचे संचालक मंडळ आहे. परंतु पवार साहेब कुठेही संचालक मंडळावर नाही. पवार साहेबांनचे नाव घेऊन सरकार सुडबुद्धीचे राजकारण करत आहे.पवार साहेबांना युवकांनच्या मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाने भाजप हतबल झाले आहे.अहमदनगर जिल्ह्यातून साहेबांनवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले होते.परंतु कायदा सुव्यवस्था व पवार साहेबांचा आदेश स्वीकारत कार्यकर्त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला...
अहमदनगर राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष-
राजेंद्र फाळके
शेतकरी ज्येष्ठ नेतेशरद पवार साहेबांवर जी कारवाई झाली. ती राजकीय आकसापोटी झाली आहे. राज्यात त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद व सहानुभूती लक्षात घेता हे सरकारचे षड़यंत्र होते. मात्र, जनतेला पवार साहेब नवे नाहीत. त्यांना फुकट "जाणता राजा" म्हणत नाहीत. पण, दुर्दैव असे की पुर्वीही राजे छत्रपतींना पेशवाई नडली आणि आजचे सरकार पवार साहेबांना नडू पाहत आहे. पण, आता "रयत खुळी" राहिली नाही. अखेर दिल्ली झुकली.- ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब साळवे
हा समाज पवार साहेबांवर प्रेम करतो. मात्र, त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे. जनतेचा दबदबा रोखण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्यावर हा बुमरँग झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये म्हणून पवार साहेबांना आयुक्तांनी विनंती केली. म्हणून ती मान्य केली आहे. साहेबांवर लोक जिवापाड प्रेम करतात. त्यांना पोलिसांनी कार्यालयाकडे जाऊ दिले नाही. परंतु आम्ही कोणतीही तमा न बाळगता आत गेलो. प साहेबांना सपोर्ट केला.
डॉ. किरण लहामटे
महाराष्ट्रात जे काही गेल्या वर्षांपासून चाललंय ते सर्व सुडाचं आणि षडयंत्राच कटकारस्थान होत आहे. ह्यातुन भविष्यातल्या राजकारणाला आणि लोकशाहीला आग लावण्यासाठी ह्या थिंनग्या हळु-हळु सरकार कडुन टाकल्या जात आहे त्याचाच एक भाग ईडी.
संदिप वर्पे-अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कार्यअध्यक्ष
सरकारनी ईडी रुपी बाऊन्सर टाकला पण पवार साहेबांनी त्याला सिमेपार सिक्सर फेकला. देशाच्या राजकारणा मध्ये पवार साहेबांन सारखा अष्टपैलू नेता आज तरी हयात नाही. पवार साहेबांनी आपल्या बुध्दीमत्ता व कर्तृत्वाच्या जोरावर राजकीय ,सामाजिक, संस्कृतीक, कृषी, क्रीडा या क्षेत्रात कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे.म्हणुनच लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या या सरकारने लोकशाही मुल्य जपणाऱ्या व छत्रपती, फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत आल्यापासून लक्ष केले आहे. या खेळात ते काही प्रमाणात यशस्वी देखील झाले. परंतु त्यांनी त्यांचं महाअसर असणाऱ्या ईडी कडुन राष्ट्रवादीच्या आधारस्तंभावर बाऊन्सर टाकला. परंतु ५०वर्षांचा राजकीय अनुभव निष्कलंक चारित्र्य व दूरदृष्टीच्या जोरावर पवार साहेबांनी सरकारची खेळी ओळखली व ज्या गतीने चौकशीचा चेंडु पवार साहेबांकडे आला त्याच गतीचा योग्य वापर करून पवार साहेबांनी त्याला सीमेपार फेकला. व पुन्हा एकदा पवार साहेब हे ह्या देशाचे जाणता राजे आहे हे सिद्ध केले...
-- मेहबुब शेख (युवा अध्यक्ष)ष