अखेर "महायुतीवर शिक्का"; अकोल्याची जागा "भाजपलाच" वैभव पिचडांचे "यादीत नाव", पहिले पाऊल "सक्सेस"..!
आमदारकीसाठी बॅटिंग सुरू..! |
अकोल्यात सगळ्यांना दाखविला बुक्का !! |
विधानसभेच्या जागावाटपात शिवसेनेने १४४ जागांची मागणी दिवाकर रावते यांच्याकरवी केली होती. त्यापैकी प्रथमता १०५ नंतर ११२ तदनंतर ११५ ते ११८ जागा देण्याची नौटंकी भाजपने केली. मात्र, शिवसेना त्यावर समाधानी राहिली नाही. अखेर १२४ जागांवर निर्णय फायनल झाला होता. तरी बारा जागांपैकी कोणत्या आणि किती जागा कोणाला द्यायच्या यावर भाजप आणि शिवसेनेमध्ये ताणाताण सुरू होती. यात मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर-मानखुर्द, उल्हासनगर जागांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. यात शिवसेनेने १३० जागांची यादी भाजपला दिली होती. त्यातील ११५ जागांबाबत भाजपची कोणतीही हरकत नव्हती. तर उर्वरित जागांबाबत आता या दोन पक्षात खल सुरू आहे. तर विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया तर पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल आदी जागांपैकी काही जागा शिवसेनेला हव्या आहेत. यातील शिवाजीनगर-मानखुर्दची जागा शिवसेनेला देण्यास भाजप तयार आहे. मात्र, औसा, वडाळा, एरवली, बेलापूर, उल्हासनगर या जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. रात्री दिल्लीत महाराष्ट्र विधानसभेवर महत्वाची बैठक संपन्न झाली. त्यात शिवसेनेला १२६ जागा देण्याचे ठरले असून १६२ जागा भाजप लढविणार आहे. यातूनच मित्रपक्षांना जागा देणार असून मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर लढण्याची अट असणार आहे. त्यामुळे १२ जागा मागणारे शिवसंग्रामचे मेटे, १५ जागा मागणारे रिपाईचे आठवले यांच्यासह अनेकांच्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे प्रुथ्वीराज चव्हाण यांचे नाव फायनल झाल्याचे बोलले जात असून काँग्रेसने १४४ उमेदवारांपैकी १०५ उमेदवारांची नावे निच्छित केली असुन ते लवकरत प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
तर दुसरीकडे सातारा लोकसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे प्रुथ्वीराज चव्हाण यांचे नाव फायनल झाल्याचे बोलले जात असून काँग्रेसने १४४ उमेदवारांपैकी १०५ उमेदवारांची नावे निच्छित केली असुन ते लवकरत प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
बाबा,साताऱ्यात तोफेच्या तोंडी..!! |
दरम्यान अकोले येथील जागावर निर्णय झाल्याचे समजते असून गेली अनेक वर्षे ही जागा शिवसेना लढवत आहेत. तरी त्यांना यश आले नाही. तसेही येथे जो पुर्वी दोन गटांचा वाद सुरू होता. गटातटाने अकोल्याचे नेते मातोश्रीवर जात होते. त्याचा वाईट पडसाद उमटताना दिसले. इतकेच काय ! तर, स्थानिक नेत्यांनी एकमेकांच्या कुरघोड्यांचे धडे वाचून दाखविले. त्यामुळे वैभव पिचड यांना सोपस्कर होईल अशी भुमिका शिवसेनेची असल्याचे दिसते आहे. हा सर्व उहापोह एका विशेष बैठकीत झाल्याची माहिती गोपनिय सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ज्या जागांचा तीढा आहे. त्या यादीत अकोल्याच्या जागेचा उल्लेख दिसला नाही. त्यामुळे त्यांना भाजपच्या उमेदवारीकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता अकोल्याचे काही शिवसैनिक गुप्त पद्धतीने पिचडांना मदत करीत होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. तर, कट्टर शिवसैनिकांसाठी काहीशी दु:खद बातमी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.युतीचा इतिहास
सन २०१९ मध्ये लोकसभेत युतीचे ४८ पैकी ४१ खासदार भाजप आणि शिवसेना निवडून आले आहे. तर विधानसभेचा "आढावा घेतला असता आघाडीचे ५५ ते ६० उमेदवार निवडून येतील असे सर्वेक्षण आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे वाटत नाही. तितके राजकीय शहानपण ठाकरे घराण्याकडे नक्कीच आहे. कारण, सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हा भाजप १२२, शिवसेना ६३, काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. स्वतंत्रपणे लढूनही भाजप आणि शिवसेनेचे १८५ आमदार निवडून आले होते. युती असती तर २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आले असते, असे युतीच्या नेत्यांनी नंतर मान्य केले होते. त्यामुळे आता २३० ते २४० पार करण्याचा मानस आखण्यासाठी मुख्यमंत्री व ठाकरे यांनी हातात हात मिळविला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७० दिवसात १२६ लेखांचे ७ लाख वाचक)