शर्मिला येवलेंची "विशेष मुलाखत"; का फेकली शाई ? काय मागण्या होत्या ? पिचडांना इतका विरोध का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे !

भीत नसते मी कुणाच्या बापाला ! 

अकोले (प्रतिनिधी) :- 
                    ज्या मुलीने "मुख्यमंत्री" देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाई फेकून काही मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी कोण आहे ? कोणत्या पक्षात काम करते, आई-वडिल काय करतात ? तिचे शिक्षण काय आहे ? तिने इतका मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही धाडस का केली ? त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला हा योग्य आहे की, अयोग्य ? असे अनेक प्रश्न राज्याच्या बहुतांशी व्यक्तींच्या मनात घोळत आहे. त्यावर प्रकाश टाकण्यासाठी "रोखठोक सार्वभौमने" पुढाकार घेतला असून शर्मिला येवले यांचा मुलाखत आम्ही  आपल्यासमोर मांडत आहोत.

सप्रेम नमस्कार !! 

प्रश्न :- तुमचा परिचय काय ?
उत्तर :- होय..! मीच शर्मिला सुभाष येवले (वय २१ वर्षे) रा. इंदोरी, ता. अकोले. जि. अ. नगर. माझे शिक्षण बीएससी पुर्ण असून सद्या बीए (मराठी) फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे सुरू आहे.

प्रश्न :-  तुम्हाला हा "वारसा" कसा लाभला ?
उत्तर :- माझे अजोबा शेतकरी संघटनेत काम करत असे. त्यांच्यानंतर वडिल देखील त्याच मार्गावर पाऊले टाकत असल्याचे पाहत मी लहानची मोठी झाले. माझी आई अगस्ती साखर कारखान्यावर संचालक आहे. त्यामुळे  ज्या मातीशी आम्ही ईमान राखला. त्या मातीची चळवळ शेतकरी संघटना चालवत आहे. म्हणून मी देखील तोच वसा पुढे अविरत चालवायचा म्हणून प्रयत्न करत आहे. पिचडांसारखे सत्ता मिळविण्यासाठी निष्ठा सोडून सत्तेच्या मागे धावणारे आम्ही नाही. कारण, हे राजकारण नाही. तर, लोकशाही मार्गाने उभी केलेली न्यायात्मक चळवळ आहे.

प्रश्न :- यापुर्वी आंदोलने केली आहेत का ? 
उत्तर :- होय, महिलांचे, मुलींचे, विद्यार्थी, शेतकरी, पाणी, नोटबंदी अशा अनेक विषयांना घेऊन आंदोलने केली आहे. नोटबंदी काळात मा. खा. राजू शेट्टी यांनी मला पाहुन माझ्यातल्या व्यक्तीमत्वाला समाजसेवेची संधी दिली. मी शेतकरी संघटनेची "विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष" म्हणून कार्यरत आहे. परभणीत मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी मी स्टेजवर प्रवेश केला होता. तेव्हा देखील पोलिसांनी आम्हाला पकडून पोसील ठाण्यात नेले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आमच्या शंकेचे निरसन केले नाही. त्यानंतर काल योग आला आणि त्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा मी प्रयत्न केला.

हे सगळे सत्तेचे लालची

प्रश्न :- तुमच्या मागण्या काय होत्या ?
उत्तर :- सरकारने जे "महापोर्टल" तयार केले आहे. ते बंद करण्यात यावे. कारण, युपीएसी, एमपीएसीचा स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे प्रथमत: यादीत येऊन रातोरात ती बदलण्यात आली. त्यामुळे हा असा अपारदर्शी कारभार बंद करावा. मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे पालक आहेत. त्यांच्याकडे ग्रुहमंत्रीपद आहे. राज्यात महिला, मुली, बालके, सुरक्षित नाहीत. जे गुन्हा करतील त्यांच्यावर कायदेशिर कारवाई झाली पाहिजे. तत्काळ न्याय मिळावा म्हणून विशेष योजना राबविल्या पाहिजे. तर त्यांच्या सुरक्षेसाठी उपायोजना करण्यात याव्यात. ज्या महिला कायद्याचा दुरूपयोग करतात किंवा त्यांना खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडतात. अशी व्यक्तींवर देखील कडक कारवाई झाली पाहिजे. कारण, कोणावर अन्याय होत असेल तर तो आम्ही कदापि खपून घेणार नाही. जेव्हा "मी टू" चे वादळ आले तेव्हा समसमान चुका असणाऱ्यांचे प्रश्न आम्ही सामोपचाराने सोडविले आहे.
प्रश्न :- पिचडांच्या उमेदवारीला विरोध का ? 
उत्तर :- गेली ४० वर्षे पिचड घराण्याने तालुक्याचा विकास केला नाही. त्यांना पाच वर्षे विरोधात बसावे लागते. तर, लगेच विकास करायचा म्हणून पक्षांतर केले. त्यांनी सांगितले आणि ते लगेच मुख्यमंत्र्यांना पटले. हा किती मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी वैभव पिचड यांना असेल तर ती मला व आमच्या विचारधारेला पटणारी नाही.

   प्रश्न :- पिचडांच्या कडाडून विरोधाचे कारण काय ?
   उत्तर :- सत्ता होती तेव्हा गेली ४० वर्षे त्यांना पक्ष बदलु वाटला नाही आणि विकासही करू वाटला नाही. एमआयडीसीच्या नावाखाली अनेक गोरगरिब लोकांच्या जमीनी या राजकारण्यांनी लुटल्या. स्वत:ने उच्च शिक्षण संस्था उभारल्या तर नाहीच. मात्र, शिखरसंस्थेत ४० लाख रुपये घेऊन सलगी असणाऱ्या व्यक्तीला नोकरी दिल्याचे जनता बोलत आहे.  तालुक्यात एक रस्ता धड केला नाही. ते जातात ४० ते ५० लाखाच्या गाडीतून. त्यांच्या पोटातलं पाणी हालत नाही. पण, सामान्य मानसाचे काय हाल होत आहेत. हे एसीत बसून कळणार तरी कसे. ! म्हणून छोटी लेक समजा. पण मुख्यमंत्री महोदय भाजपत कोणालाही उमेदवारी द्या. ! पण, त्यांना नको. असे माझे ठाम मत आहे.

प्रश्न :- तुमच्यावर गुन्हा का दाखल केला ?
उत्तर :- माझ्यावर गुन्हा दाखल झाला. हे मला माहित नाही. परंतु, संविधानाने मला काही अधिकार दिले आहेत. त्यानुसार मी व्यक्त झाले. मला यापुर्वी १४९ ची नोटीस नव्हती. ना संपर्क केला होता. माझ्यासारख्या तरुणीवर हुकूमशाहीने गुन्हा दाखल करून हा आवाज दाबायचा प्रयत्न आहे. गुन्हा दाखल असला तरी पोलीस व सरकार माझे काहीच करु शकत नाही. (दाखल कलम :- ३३६ व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे वर्तन करणे व कलम  १८६ लोकसेवक सार्वजानिक काम करत असताना त्यांच्या कामात अटकाव आणणे)
प्रश्न :- या आंदोलनामागील हेतू काय ? 
उत्तर :- ज्यांनी अकोल्याला विकासापासून वंचित ठेवले. त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न करणे. जरी उमेदवारी मिळाली. तरी, त्यांच्या पराभवासाठी तरुणांचे संघटन बांधून जनजाग्रुती करणे, सरकारचे डोके ठिकाण्यावर आणण्यासाठी शांततामय एव्हाना आक्रमक मार्गांच्या आंदोलनांचा अवलंब करणे.
 प्रश्न :- अकोल्याचा आमदार कसा असावा असे तुम्हाला वाटते. ?
उत्तर :- अकोल्याचाच नाही. तर राज्याचे २८८ आमदार हे लोकाभिमूख असावेत. त्यांना मुलभूत गरजा आणि जनतेला भेडसावणारे प्रश्न हे स्वत:चे वाटले पाहिजे. विरोधी असो व जवळचा. तो आपला आहे. अशी आत्मियता त्याच्या अंगी असली पाहिजे. केंद्र आणि राज्य यांच्याकडून मोठा निधी आणून तालुक्याचा विकास केला पाहिजे. एक चारित्र्यसंपन्न, सुशिक्षित व लोकमान्य व्यक्ती आमदार असला पाहिजे. असे मला वाटते.

  धन्यवाद !!


-- सागर शिंदे

 ================

             "सार्वभाैम संपादक"

                 

      - सागर शशिकांत शिंदे 

              8888782010

           -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६५ दिवसात ११६ लेखांचे ६ लाख १० हजार वाचक)