"पिचडांनी" कारखान्याचा "राजिनामा" द्यावा ! "माझ्या आईने" पक्षपात केेलेला नाही..! शर्मिला येवले

 राजिनामा मागणारे हे कोण !!

अकोले (प्रतिनिधी) :- 
              शर्मिला येवले या "पिचड" घराण्याच्या विरोधात बोलतात. त्यांची "आई" अगस्ती सहकारी साखर कारखाना येथे पिचड साहेबांच्या  पक्षातून "संचालक" आहे. त्यामुळे त्यांनी "कारखान्याचा राजिनामा" द्यावा. असे भाजप कार्यकर्त्यांना वाटते आहे. तशी "वाल्गना" सोशल मीडियावर देखील केली जात आहे. यावर उत्तर देताना शर्मिला येवले म्हणाल्या की; माझी आई "पिचडांच्या कोठ्यातून" नाही. तर  सर्वपक्षीय पॅनल उभा करण्याचे ठरले होते. त्यात  शिवसेना दोन, जुनी भाजप प्रणित तीन तर "शेतकरी संघटनेच्या दोन जागा. तर अन्य माजी राष्ट्रवादी आमदार पिचड यांच्या बाकी जागा अशा २० उमेदवारांनी लढा दिला होता. यातून माझी आई मनिषा येवले ही आठ हजार मतांनी निवडून गेली होती. तिने शेतकरी संघटना पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे "राजिनामा" देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. परंतु, ज्या पिचड साहेबांना "राष्ट्रवादी" म्हणून लोकांनी कारखान्यात सत्ता दिली. त्यांनी गद्दारी करून भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे एक "नैतिक जबाबदारी" म्हणून कारखान्याचा "राजिनामा" द्यावा. असे मत येवले यांनी "रोखठोक सार्वभौम" समोर मांडले आहे. अर्थात ही मागणी सोशल मीडियातून केली जात आहे. वैयक्तिक कोणी राजिनाम्यासाठी संपर्क साधला नाही. त्यामुळे, ज्यांना संपुर्ण द्न्यान नाही. त्यांच्यासाठी माझे मत मांडले आहे.

                  शेतकरी संघटनेचे काम करीत असताना मला काही गोष्टी खटकत गेल्या. म्हणून मी चळवळीत उतरले. अर्थात "पिचड घराण्याशी" माझे "वैर" नाही. परंतु, अकोले तालुक्याचा "विकास" झाला नाही. हे "वैर सरकार आणि लोकप्रतिनिधी" म्हणून आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. माझ्या आंदोलनाला विरोध म्हणून काही "सोशल मीडियात" भाऊंचे "चमचे" ढवळाढवळ करीत आहेत. माझी आई "मनिषा येवले" ही कारखान्यात "संचालक" आहे. त्यांनी प्रथमत: राजिनामा द्यावा आणि मग मुलीने विरोधात बोलावं. असे प्रश्न मीडियातून समोर येत आहे. पण, सगळ्या अकोलेकरांना मी सांगू इच्छिते की; माझी आई ही "सर्वपक्षीय पॅनल" मधून सन २०१६-१७ च्या निवडणुकीत ८ हजार मतांनी निवडून गेली आहे. तीचा "राष्ट्रवादीच्या शिटचा कोणताही संबंध नाही . तर, शेतकरी संघटनेच्या पक्षातून निवडून गेली आहे.  त्यामुळे, त्यांनी राजिनामा द्यावा असे कोणाला वाटत असेल.
     
              तर, प्रथमत: ज्यांनी ज्यांनी राष्ट्रवादीच्या कोठ्यातून निवडणुक लढविली. ते अद्याप "मुग गिळून" आहेत. नगरपंचायत मध्ये देखील १९ नगरसेवक राष्ट्रवादी प्रणित आहे. त्यानी प्रथमत: राजिनामे देऊन फेर निवडणुकांना सामोरे जावे. जसे साताऱ्यात "उदयनराजे भोसले" यांनी खासदारकीचा राजिनामा दिला. तेथे कदाचित याच विधानसभांच्या सोबत "पोटनिवडणुका" लागतील. तसे हे लोकप्रतिनिधी का करत नाहीत. ? यांना "सत्तेची लालसा" आहे. "सेनापती सत्तेसाठी" भाजपात गेले. मग "मावळे" हातची सत्ता सोडतील तरी कशी. ही "गोचिड यंत्रणा" शेतकरी संघटनेच्या विचारधारेला मान्य नाही. जेव्हा मा. खा. राजू शेट्टी साहेब आम्हाला "राजिनामा" द्या. असे आदेश काढतील. तेव्हा कुठलाही विचार आम्ही करणार नाही. पण, हे कोण ? आम्हाला राजिनामा द्या म्हणणारे ? असा माझा "रोखठोक सवाल" आहे.
         ज्या जनतेने पिचड यांना "शरद पवार" यांचे खंदे समर्थक म्हणून कारखाना हातात दिला. ते आज भाजपात गेले आहे. त्यामुळे "पवारांचे खाऊन, भाजपची टाळी" वाजवायची. हे सगळी जनता पहात आहे. आणि ते कोणाला मान्य नाही. त्यामुळे, येणाऱ्या काळात जनता "ज्याची त्याला, योग्य जागा" दाखवून देईल. यात काही शंका नाही. असे मत शर्मिला येवले यांनी मांडले.
         

-- सागर शिंदे

===================

"अजरामर व्यक्तीमत्व"


 ================


             "सार्वभाैम संपादक"

                 

      - सागर शशिकांत शिंदे 

              8888782010

           -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६६ दिवसात ११७ लेखांचे ६ लाख २० हजार वाचक)